ART

COMMERCE

SCIENCE

TECH COURSES

Success Talks

मी शेतकरी कुटुंबातला. वडील शेतात राबायचे तर आई गृहिणी. दोन्ही मोठे भाऊ सैनिक. त्यामुळे माझ्या रक्तातच देशप्रेम वाहात होते. दहावीला मला ६४ तर बारावीला ७९ टक्के गुण मिळाले. करिअरच्या सुरुवातीच्या काळात लवकर स्थायी होण्यासाठी मी डी.एड. केले; पण नोकरी लागेना. म्हणून भावांप्रमाणे आपणही देशसेवा करावी, असे मला वाटायला लागले. मी त्या दिशेने प्रयत्नही सुरू केले. सुरुवातीला नागपुरात १० वर्षे कॉन्स्टेबल होतो. अलीकडेच मी पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण केली. लवकरच पोलीस विभागात अधिकारी म्हणून रुजू होणार आहे.
पीएसआय
गणेश मुंडे
पदवीनंतर मला प्रथमतः शिक्षकाची आणि नंतर तलाठ्याची नोकरी लागली. दोन्ही पदांवरील नोकरीचा अनुभव घेतल्यानंतर आपण देशसेवेत जावे, असे मला वाटले. मुुख्य म्हणजे, पहिल्याच प्रयत्नात मी पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण झालो. सध्या मी जालना येथे पीएसआय पदावर कार्यरत आहे. मी मूळचा नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव येथील. वडील फुलंबरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक तर आई गृहिणी. मला दोन बहिणी आहेत. वडिलांनी मला लहानपणापासूनच अभ्यासाची गोडी लावली.
पीएसआय
विशाल बोडखे
एव्हाना स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजी माध्यमातून शिकणारे विद्यार्थीच यशस्वी होतात, असा गैरसमज आहे. मात्र हे तितकेसे खरे नाही. माझे दहावीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत मराठी माध्यमातून झाले. त्यानंतर एम.एस्सी. केले आणि एमपीएससीही उत्तीर्ण केली. सध्या मी सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबाद येथे कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहे. अभ्यासातील सातत्य आणि प्रबळ आत्मविश्वासाच्या बळावर मी हे यश मिळविले. दरम्यान, मी डी.एड.ची परीक्षाही उत्तीर्ण केली.
कनिष्ठ लिपिक
गीता बरवाल