अत्याधुनिक अभ्यासक्रमांतून रोजगार संधी

झटपट नोकरी केंद्रस्थानी ठेवून कला शाखेतील अत्याधुनिक अभ्यासक्रम राज्यातील महाविद्यालयांत उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार कला क्षेत्रातील शिक्षणानंतर नोकरीच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. फोटोग्राफी, भाषाव्यवहार, भाषाकौशल्य व प्रसारमाध्यमांतील कौशल्ये, मायक्रोेसॉफ्ट ईआरपी डायनॅमिक कोर्स, मॉल मॅनेजमेंट, एमबीए, केटरिंग आणि हॉटेल मॅनेजमेंट असे विविध अभ्यासक्रम सुरू  करण्यात आले आहेत. दहावी, बारावीनंतर किंवा पदवीनंतरही हे कोर्स करता येतात.
………………………………………..

पेंटिंग (Painting):

ड्रेस डिझायनिंग, बेडशिट्स, साडी पेंटिंग, क्लॉथ पेंटिंग.

फोटोग्राफी (Photography):

स्वत:चा व्यवसाय करू शकता अथवा वृत्तपत्रे, मासिके, सिनेक्षेत्रातही करिअरच्या संधी आहेत.

मायक्रोेसॉफ्ट ईआरपी डायनॅमिक (Microsoft ERP Dynamic) :

या कोर्सचा उपयोग खासगी कार्यालयांमध्ये डेटा स्टोरेज अथवा अन्य कामांसाठी होतो.

एमबीए (MBA):

उत्तम व्यवस्थापनासाठी प्रत्येक क्षेत्रात याची गरज आहे.

इव्हेंट मॅनेजमेंट व केटरिंग (Event Management & Catering) :

लग्न समारंभाप्रमाणेच पार्टी, छोटे समारंभ, गेट टुगेदर यासाठीही इव्हेंट मॅनेजरची मदत घेतली जाते.

भाषाव्यवहार, भाषिक कौशल्य व प्रसारमाध्यमे :

हा विषय एम.ए.मराठी अभ्यासक्रमात आहे. आकाशवाणी, वर्तमानपत्रे, जाहिरात, निवेदक, संहिता लेखक, माहितीपट लेखन, मुद्रितशोधक, प्रकाशन संस्थांमध्ये संधी आहेत.

नाट्य (Drama) :

स्पॉटबॉय, लाइट्समन, प्रॉडक्शन, स्टेज डेकोरेशन, नेपथ्य, कथालेखक यामध्ये संधी.

संगीत (Music) :

खासगी कार्यक्रमांत गाण्याच्या मैफली होतात. चित्रपटांतही गायनाच्या संधी आहेत. शिवाय संगीत शिक्षकही होता येते.
Posted in Career Opportunity.