मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस: ‘टेक्नोलॉजी ट्रान्सफॉर्मेशन’ पुरस्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कर्तृत्वाने एक प्रभावी, स्वच्छ व कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे. ते राज्याला विकासाच्या योग्य दिशेने नेत आहेत. त्यांच्या याच कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन तंत्रज्ञान क्षेत्रातील सुप्रसिद्ध कंपनी ‘ऑरेकल’नं त्यांचा सन्मान केला आहे.  

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असामान्य दृष्टी आणि नेतृत्व गुणांमुळे त्यांना ‘टेक्नोलॉजी ट्रान्सफॉर्मेशन’ हा पुरस्कार देऊन ‘ऑरेकल’नं त्यांचा गौरव केला आहे.
  • ‘ऑरेकल’चे सीईओ साफ्रा कार्ट्स यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • ‘ऑरेकलकडून मिळालेला पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक सेवांमध्ये तंत्रज्ञानातील नवकल्पनांचा विचार करुन त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी केल्याच्या प्रयत्नांना मिळालेल्या मान्यता आहे.
  • आपले सरकार, स्मार्ट सिटी, गाव जोडणी योजना, महाडीबीटी, महानेट, सीसीटीव्ही, आधार कायदा यांसारख्या अनेक योजना आणि धोरणांमध्ये तंत्रज्ञान परिवर्तन घडून आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने जलयुक्त शिवार, नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प, आयआयएम यासारखे प्रकल्प राबवले जात आहेत.
  • राज्यातील १४००० ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडण्यात आल्या असून उर्वरित ग्रामपंचायती जोडण्याचं काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. राज्यातील प्रत्येक तहसील आणि शाळांचे डिजीटायझेशन करण्याचे काम करत आहे,

२०१६ मध्ये  नागपूरमधील ५ खेड्यांचे डिझिटायझेशन‘  

  • २०१६ मध्ये नागपूर जिल्ह्यामधल्या पाच खेड्यांच्या ग्रामपंचायतींचे ‘डिझिटायझेशन’  करण्यात आले. त्याशिवाय ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींना २०१८ अखेरपर्यंत ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत झालेल्या ११व्या आंतरराज्य परिषदेमध्ये दिली.

ऑप्टिकल फायबर

  • ऑप्टिकल फायबर म्हणजे अत्यंत वेगाने माहिती एकीकडून दुसरीकडे नेण्यासाठीची काचेची तार. म्हणजेच आधी ऑप्टिकल फायबर वापरून तारांचे जाळे निर्माण करायचे आणि या जाळ्याचा वापर बिनतारी इंटरनेटची वेगवान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करायचा असे यामागचे तंत्रज्ञान आहे. म्हणजेच आपण सगळे वापरत असलेल्या इंटरनेटमध्ये ऑप्टिकल फायबरची भूमिका खूप मोठी आहे. शहरांमध्ये रस्त्यांखालून दूरसंचार कंपन्यांनी अशा ऑप्टिकल फायबर्सची जाळी विणलेली असते.
Posted in Awards, CURRENT AFFAIRS.