सैनिकी शाळा, एनडीएमध्ये मुलींनाही मिळणार प्रवेश!

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मुलींना सैनिकी शाळा आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये (एनडीए) प्रवेश देण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकार विचार करीत आहे. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी लोकसभेत नुकतीच ही माहिती दिली. याबाबत स्थायी समिती आणि अनेक सदस्यांनी सूचना दिल्याचे ते म्हणाले.

भामरे म्हणाले, मुलींच्या सैनिक शाळा आणि एनडीए प्रवेशाबाबत प्रस्ताव विचाराधीन आहे. सद्यःस्थितीत २६ सैनिकी शाळा अस्तिवात असून, अशाच प्रकारच्या आणखी २१ शाळांना मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय सैनिकी शाळा सुरू करण्यासाठी मंत्रालयात आलेल्या ६४ प्रस्तावांवर विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.