Arts

कल्पकता हा मनुष्याचा स्थायीभाव. मानवी सौंदर्यदृष्टी विकसित होण्यासाठी निसर्गाचा मोठा वाटा आहे. निसर्गातील वैविध्यपूर्ण बाबींचा तसेच इतिहास, साहित्य, नृत्य, गायन, वादन, चित्रकला, शिल्पकला, नाट्यशास्त्र, रंगशास्त्र इत्यादींचा दैनंदिन जीवनात होणारा प्रभाव आणि या कलाक्षेत्रातून मानवी मानसिकतेचे संवर्धन करण्याची विलक्षण शक्ती असणारी कला ही अभ्यास शाखा आहे.


वाचन, चिकाटी, धैर्य आणि विविधता याची आवड असणाऱ्या विद्यार्थांसाठी कला शाखा ही सुवर्णसंधी आहे.

सर्जनशीलता

सर्जनशीलता हा या क्षेत्रात यशस्वी होण्याचा पाया आहे. सातत्याने नवनिर्मिती करून समाजात कीर्तीच्या शिखरावर विराजमान करणारी ही एकमेव शाखा आहे. निरीक्षणशक्ती, मांडणीक्षमता, भाषेचे सौंदर्य जाणण्याची वृत्ती व विवेकपूर्ण संहितानिर्मितीची क्षमता प्राप्त विद्याथ्र्यांना हमखास यश देणारी ही कला शाखा आहे.

व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण

बारावी (कला) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कला शाखेतील पदवी अभ्यासक्रमाची खालील दोन भागांत विभागणी करता येऊ शकेल. १२ वी (कला) शाखेतील पदवी अभ्यासक्रम ज्यामध्ये देशी वा विदेशी भाषा विषयांसह तसेच सामाजिक शास्त्रांचे विषय घेऊन कला शाखेतील पदवी प्राप्त करता येते. १२ वी कला उत्तीर्ण झाल्यानंतर इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांतून पदवी प्राप्त करून विद्यार्थी विविध व्यावसायिक क्षेत्रांत प्रवेश करू शकतात.

भारतात कलेचा विकास

सुरुवातीपासूनच भारतात सांस्कृतिक वैविध्य असल्यामुळे कलाक्षेत्रात चौफेर व नावीन्यपूर्ण प्रगती केली आहे. भारत देश हा कला शाखेसाठी माहितीचा खजिना राहिलेला आहे. देशविदेशातून अनेक अभ्यासक कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमासाठी येथे येतात.

कला शाखेतील पदवी अभ्यासक्रम

१२ वी कला वा विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याना कला शाखेतील पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. साधारणत १२ वी कला शाखेनंतर भाषा विषय घेऊन किंवा सामाजिक शास्त्रे घेऊन वा व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन विद्यार्थी पदवी शिक्षण पूर्ण करू शकतो.

विविध भाषांमध्ये पदवी

मराठी, संस्कृत, उर्दू, गुजराती, सिंधी, पाली, इंग्रजी, अर्धमागधी, रशियन, जर्मन, फे्रंच, जपानी, स्पॅनिश, अरेबिक, ललित कला, नाट्यशास्त्र, संगीत, राज्यशास्त्र, सामान्य प्रशासन, इतिहास, भूगोल, लायब्ररी, शिक्षण, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, शारीरिक शिक्षण अशा विषयांमध्ये पदवी प्राप्त करता येते.

Posted in ARTS, Courses a.