Biotechnology

दैनंदिन आयुष्यातील विविध क्षेत्रांमध्ये बायोटेक्नॉलॉजी या शाखेचा उपयोग होत असल्याने या शाखेत शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध आहेत. बारावीनंतर बायोटेक्नॉलॉजी हा विषय विद्यार्थ्यांना निवडता येतो. बी.एससी. तसेच इंजिनीअरिंगमधील विद्यार्थ्यांना हा पर्याय उपलब्ध आहे. तसेच आता विद्यार्थ्यांना बायोटेक्नॉलॉजीमध्ये पाच वर्षांचा इन्टीग्रेटेड अभ्यासक्रम उपलब्ध झाला आहे. पुढे प्लांट बायोटेक्नॉलॉजी, अ‍ॅनिमल बायोटेक्नॉलॉजी फर्मेंटेशन टेक्नोलॉजी, जेनेटिक इंजिनीअरिंग, मॉलेक्यूलर बायोलॉजी, बायो इन्फर्मेटिक्स, ड्रग डिझायनिंग, क्लिनिकल रिसर्च अशा अनेक आधुनिक क्षेत्रांचा अभ्यास करता येतो. पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतरही भारतात शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी कोणती तयारी करावी?
हा विषय पुढे हवा असेल तर बारावीला गणित विषय असणे आवश्यक असते. उद्योगजगताची गरज बघून हा विषय नव्या पद्धतीने मांडण्यात आला आहे, हे विद्यार्थ्यांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे. हा संशोधन विषय आहे. तेव्हा अभ्यास करण्याची तयारी हवी.

Posted in Courses s, SCIENCE.