Botany

बी.एससी.ला बॉटनी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना पदवीनंतर शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बॉटनी, बायोटेक्नॉलॉजी, हॉर्टीकल्चर, क्लिनिकल सायन्स आदी विषयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम करता येतात. बॉटनीतील विविध विषयांवर विद्यार्थ्यांना पीएच.डी. करता येते. देशातील अनेक विज्ञान संशोधन संस्थांमध्ये संशोधन करण्याचीही विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध आहे. डाएटीशियन आणि न्यूट्रीशनचा अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांना पदवीनंतर करता येतो.
विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी कोणती तयारी करावी?
बॉटनी विषय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना झाडांची तोंडओळख हवी. त्यांनी विविध झाडांची माहिती जमवली पाहिजे, जेणेकरून पुढे त्यांना हा अभ्यासक्रम सोपा जाईल आणि विविध पर्याय उपलब्ध होत जातील. मशरूम कल्टीवेशन, प्लांट टीशू कल्चर, फ्लॉवर अ‍ॅरेंजमेंट, फूड प्रिझर्व्हेशन, लॅण्ड स्केपिंग आदी विषयांतील अ‍ॅड ऑन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करतील.
Posted in Courses s, SCIENCE.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *