सीबीएसई बोर्डाची दहावी व बारावीची परीक्षा 5 मार्चपासून

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गांच्या परीक्षा 5 मार्चपासून सुरू होणार आहेत. दहावीची परीक्षा 5 मार्चला सुरू होणार असून 4 एप्रिलला संपणार आहे, तर बारावीची परीक्षा 5 मार्चला सुरू होऊन 12 एप्रिलपर्यंत चालणार आहे. सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

 

दहावीला 16 लाख 38 हजार 552 विद्यार्थी बसले आहेत, तर 11 लाख 86 हजार 144 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) हा दहावीचा पहिला पेपर आहे, तर बारावीचा पहिला पेपर इंग्रजी विषयाचा आहे.

Posted in Career News.