IBPS : Specialist Officers

स्पेशालिस्ट ऑफिसर्सची पदे

बँकेमध्ये दैनंदिन कामासाठी लिपिक व प्रोबेशनरी ऑफिसर्सबरोबरीनेच विविध विषयातील स्पेशालिस्ट ऑफिसर्सची आवश्यकता असते. 20 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांत स्पेशालिस्ट ऑफिसर्सची निवड करण्यासाठी एकच सामायिक परीक्षा घेतली जाते.

माहिती तंत्रज्ञान अधिकारी

वयोमर्यादा : किमान 20 वर्षे, कमाल 30 वर्षे.

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान या विषयातील पदवी वा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक.

कृषी क्षेत्र अधिकारी

वयोमर्यादा : किमान 20 वर्षे, कमाल 30 वर्षे.

शैक्षणिक पात्रता : कृषी वा त्यासंबंधीत क्षेत्रातील पदवीधर (हॉर्टीकल्चर, पशुवैद्यकीय, डेअरी सायन्स, कृषी अभियांत्रिकी, फिशरीज सायन्स वगैरे)

राजभाषा (हिंदी) अधिकारी

वयोमर्यादा : किमान 20 वर्षे, कमाल 30 वर्षे.

शैक्षणिक पात्रता : एम.ए. (हिंदी) तसेच पदवीस्तरावर इंग्रजी विषय घेतलेला असणे आवश्यक किंवा एम.ए. (संस्कृत) तसेच पदवीस्तरावर हिंदी व इंग्रजी विषय घेतलेले असणे आवश्यक.

विधी (लॉ) अधिकारी

वयोमर्यादा : किमान 20 वर्षे, कमाल 30 वर्षे.

शैक्षणिक पात्रता : विधी विषयातील पदवी आवश्यक

तांत्रिक (टेक्निकल) अधिकारी

वयोमर्यादा : किमान 20 वर्षे, कमाल 30 वर्षे.

शैक्षणिक पात्रता : इंजिनियरींगमधील खालील विषयातील पदवी आवश्यक

(सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/प्रॉडक्शन/मेटलर्जी/ इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्स/ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी/टेक्सटाईल/ केमिकल) किंवा बी.फार्मसी.

मनुष्यबळ विकास (एच.आर.)/कार्मिक (पर्सोनेल) अधिकारी

वयोमर्यादा : किमान 20 वर्षे, कमाल 30 वर्षे.

शैक्षणिक पात्रता : पदवीधर व खालील विषयांपैकी किमान एका विषयात ए.आय.सी.टी.ई. मान्यताप्राप्त संस्थेतून पदव्युत्तर पदवी वा पदविका प्राप्त असणे आवश्यक. (पर्सोनेल मॅनेजमेंट/इंडस्ट्रीयल रिलेशन्स/मनुष्यबळ विकास/ सोशल वर्क/ लेबर लॉ) किंवा बिझनेस मॅनेजमेंट/ॲडमिनीस्ट्रेशनमधील पदवी किंवा पदविका (मनुष्यबळ विकासातील स्पेशलायझेशनसह)

माहिती तंत्रज्ञान अधिकारी (स्केल-2)

वयोमर्यादा : किमान 21 वर्षे, कमाल 30 वर्षे.

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान या विषयातील पदवी वा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक. किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक.

विधी (लॉ) अधिकारी (स्केल – 2)

वयोमर्यादा : किमान 20 वर्षे, कमाल 30 वर्षे.

शैक्षणिक पात्रता : विधी विषयातील पदवी आवश्यक. किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक.

चार्टड अकाऊंटन्ट (स्केल -2)

वयोमर्यादा : किमान 21 वर्षे, कमाल 30 वर्षे.

शैक्षणिक पात्रता : सी.ए.

फायनान्स एक्झिक्युटिव्ह (स्केल -2)

वयोमर्यादा : किमान 25 वर्षे, कमाल 30 वर्षे.

शैक्षणिक पात्रता : एम.बी.ए. किंवा पी.जी.डी.बी.एम. (ए.आय.सी.टी.ई. मान्यताप्राप्त)

अनुभव : फायनान्शियल इन्स्टिटयूट किंवा बँकेत इंडस्ट्रीयल प्रोजेक्टसचे क्रेडिट. ॲपरायझल करण्याचा कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव आवश्यक.

पणन (मार्केटिंग) अधिकारी

वयोमर्यादा : किमान 20 वर्षे, कमाल 30 वर्षे.

शैक्षणिक पात्रता : एम.बी.ए. (मार्केटिंग) किंवा 2 वर्षांचा पी.जी.डी.बी.एम / पी.जी.डी.बी.ए. किंवा मार्केटिंग मधील मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी वा पदविका अभ्यासक्रम आवश्यक.

लेखी परीक्षा

लेखी परीक्षा ऑनलाइन घेतली जाईल. चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील.

परीक्षेसाठी 2 तासाचा कालावधी असते. परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असते.

लेखी परीक्षा (राजभाषा व विधी अधिकारी पदांसाठी) :

राजभाषा अधिकारी / विधी अधिकारी पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेमध्ये तर्कशक्ती (रिझनिंग), इंग्रजी, सामान्य ज्ञान (विशेषत: बँकिंग संदर्भात), व्यावसायिक ज्ञानाची परीक्षा या विषयांचा समावेश असतो. वरील प्रत्येक विषयासाठी प्रत्येकी 50 प्रश्न विचारले जातात. तर्कशक्ती, इंग्रजी व सामान्य ज्ञान या विषयांमध्ये उमेदवाराने केवळ उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अंतिम निवडीमध्ये या विषयांचे गुण ग्राह्य धरले जात नाहीत. केवळ व्यावसायिक ज्ञानाच्या विषयाचे 50 प्रश्न (80 गुण) हेच अंतिम निवडीमध्ये ग्राह्य धरले जातात.

लेखी परीक्षा (अन्य पदांसाठी) :

राजभाषा व विधी अधिकारी या पदांव्यतिरिक्त अन्य पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश होतो. तर्कशक्ती (रिझनिंग), इंग्रजी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्युड, व्यावसायिक ज्ञानाची परीक्षा या विषयांवर प्रत्येकी 50 प्रश्न विचारले जातात. तर्कशक्ती (रिझनिंग), इंग्रजी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्युड या विषयांमध्ये उमेदवाराने केवळ उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अंतिम निवडीमध्ये या विषयांचे गुण ग्राह्य धरले जात नाहीत. केवळ व्यावसायिक ज्ञानाच्या विषयाचे 50 प्रश्न (80 गुण) हेच अंतिम निवडीमध्ये ग्राह्य धरले जातात.

मुलाखत :

लेखी परीक्षेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखतीसाठी एकूण 100 गुण असतात. खुल्या वर्गातील उमेदवाराला मुलाखतीमध्ये किमान 40 टक्के तर राखीव वर्गातील उमेदवाराला किमान 35 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे.

अंतिम निवड :

उमेदवारांची निवड करताना लेखी परीक्षेतील गुणांना 80 टक्के वेटेज असेल तर मुलाखतीतील गुणांना 20 टक्के वेटेज असेल. मुख्य परीक्षा व मुलाखतीतील एकत्रिक गुणांनुसार उमेदवारांची निवड केली जाते.

लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत देखील आय.बी.पी.एस. घेते. लेखी परीक्षा व मुलाखतीमधील गुणांनुसार गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर आय.बी.पी.एस. राष्ट्रीयकृत बँकांमधील राज्य/केंद्रशासित प्रदेशानुसार उपलब्ध पदांची संख्या जाहीर करते. यामध्ये राखीव जागांचाही उल्लेख असतो. गुणवत्ता यादीतील उमेदवारांकडून त्यांना कोणत्या बँकेत नोकरीसाठी प्राधान्यक्रम हवा आहे हे विचारले जाते. लेखी परीक्षा व मुलाखतीमधील गुण, उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम व बँकेतील रिक्त जागांची संख्या या माहितीच्या आधारे बँकेच्या वतीने नोकरीसाठी यशस्वी उमेदवाराला कॉल लेटर पाठविले जाते. राष्ट्रीयकृत बँकात विविध संवर्गात निवड झालेल्या उमेदवारांना उच्च पदापर्यंत जाण्याची संधी मिळतात.

IBPS : Clerk

लिपिक संवर्ग

शैक्षणिक पात्रता :

मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर. तसेच ज्या राज्यासाठी उमेदवार प्राधान्य देणार आहे त्या राज्याची भाषा त्याला येणे आवश्यक आहे. (उदा. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा येणे गरजेचे आहे.)

वयोमर्यादा :

किमान वयोमर्यादा 20 वर्षे असून खुल्या वर्गासाठी कमाल वयोमर्यादा 28 वर्षे आहे. (अनुसूचित जाती/जमातींसाठी 33 वर्षे, ओबीसींसाठी 31 वर्षे इतकी आहे.)

निवड प्रक्रिया :

पहिला टप्पा (पूर्व परीक्षा) –

पूर्व परीक्षा 100 गुणांची घेतली जाते.

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ असून परीक्षा संगणकावर ऑनलाईन घेतली जाते.

   अभ्यासघटक                    प्रश्नसंख्या           गुण                    कालावधी

1) इंग्रजी भाषा                       30                       30                       1 तास

2) न्यूमरिकल ॲबिलिटी        35                       30

3) रिझनिंग ॲबिलिटी            35                       30


एकूण                                    100                     100

पूर्व परीक्षेतून एकूण जागांच्या 20 पट उमेदवारांची निवड मुख्य परीक्षेसाठी केली जाते.

दुसरा टप्पा (मुख्य परीक्षा)

मुख्य परीक्षेमध्ये 200 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असते.

ही प्रश्नपत्रिका ऑनलाईन (संगणकीकृत) असते. यासाठी कालावधी 2 तासांचा असतो.

   अभ्यासघटक                                        प्रश्नसंख्या           गुण                    कालावधी

1) इंग्रजी भाषा                                             40                      40                        2 तास

2) सामान्य ज्ञान                                         40                      40

3) क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्युड                         40                       50

4) टेस्ट ऑफ रिझनिंग                                40                       50

5) कॉम्प्युटर नॉलेज                                    40                       20

पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश म्हणजेच 0.25 इतके गुण कमी केले जातील.

अंतिम निवड –

उमेदवारांची निवड मुख्य परीक्षेतील गुणांवरून केली जाईल.

लिपिक वर्गासाठी मुलाखती घेतल्या जात नाहीत.

संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक असते. मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधील वर्ड एक्सेल, पॉवरपॉइंट आदी सॉफ्टवेअर वापरता येणेही गरजेचे असते.

 

IBPS : Probationary Officer & Management Trainee

प्रोबेशनरी ऑफिसर व मॅनेजमेंट ट्रेनी

शैक्षणिक पात्रता :

कोणत्याही विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर

वयोमर्यादा : किमान 20 वर्षे व कमाल 30 वर्षे

(ओ.बी.सी.साठी कमाल वयोमर्यादा 33 वर्षे तर अनुसूचित जाती/जमातीसाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे)

निवडप्रक्रिया :

पहिला टप्पा (पूर्व परीक्षा) –

पूर्व परीक्षा 100 गुणांची घेतली जाते.

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ असून परीक्षा संगणकावर ऑनलाइन घेतली जाते.

अभ्यासघटक                      प्रश्नसंख्या               गुण                    कालावधी
1) इंग्रजी भाषा                          ३०                        ३०                           1 तास
2) क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्युड       ३५                       ३५
3) टेस्ट ऑफ रिझनिंग              ३५                       ३५
—————————————————————————–
एकूण                                         १००                   १००

पूर्व परीक्षेतून एकूण जागांच्या 20 पट उमेदवारांची निवड मुख्य परीक्षेसाठी केली जाते.

दुसरा टप्पा (मुख्य परीक्षा) –

मुख्य परीक्षेमध्ये 200 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असते. ही प्रश्नपत्रिका ऑनलाईन (संगणकीकृत) असेल. यासाठी कालावधी 2 तासांचा असतो.

अभ्यासघटक                प्रश्नसंख्या          गुण                 माध्यम                                     कालावधी

इंग्रजी भाषा                      40                    40                  इंग्रजी                                           2  तास

सामान्य ज्ञान                   40                     40           इंग्रजी आणि हिंदी

क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्युड    50                     50           इंग्रजी आणि हिंदी

टेस्ट ऑफ रिझनिंग           50                     50           इंग्रजी आणि हिंदी

कॉम्प्युटर नॉलेज               20                    20           इंग्रजी आणि हिंदी

——————————————————————————————————————–

एकूण                                 200                 200

पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश म्हणजेच 0.25 इतके गुण कमी केले जातील.

तिसरा टप्पा

मुख्य परीक्षेच्या दोन्ही भागांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना तिसऱ्‍या टप्प्यांत मुलाखतीसाठी बोलावले जाते.

मुलाखतीसाठी एकूण 100 गुण असतात.

खुल्या वर्गातील उमेदवाराला मुलाखतीमध्ये किमान 40 टक्के तर राखीव वर्गातील उमेदवाराला किमान 35 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.

अंतिम निवड

उमेदवारांची निवड करताना मुख्य परीक्षेतील गुणांना 80 टक्के वेटेज असेल तर मुलाखतीतील गुणांना 20 टक्के वेटेज असेल. मुख्य परीक्षा व मुलाखतीतील एकत्रिक गुणांनुसार उमेदवारांची निवड केली जाते.

TET दरवर्षीच; मात्र केव्हा होणार शिक्षक भरती?

नागपूर: राज्यात गेल्या सात वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. 2009 च्या शिक्षण कायद्यानुसार रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे असतानाही भरती झालेली नाही. त्यामुळे आजघडीला राज्यभरातील शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांची 15 हजार 423 पदे रिक्त आहेत. लाखो बेरोजगार उमेदवार भरतीकडे डोळे लावून बसल्याने शासनाने त्वरित शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याची गरज आहे.

2010 पासून भरती नाही
राज्यात प्राथमिक शिक्षकांची 2 लाख 73 हजार 843 पदे मंजूर असून सध्या 2 लाख 58 हजार 520 शिक्षक कार्यरत आहेत. रिक्त असणाऱ्या 15 हजार 423 पदांसाठी तातडीने भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी बेरोजगार उमेदवारांकडून जोरदारपणे केली जात आहे. जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक पदे भरण्यासाठी मे 2010 मध्ये सीईटी परीक्षा झाली. त्यावेळी राज्यात सुमारे 14 हजार शिक्षक पदे भरण्यात आली. त्यानंतर मात्र भरती झालेली नाही.

रिक्त पदांची संख्या वाढली
दरम्यान, 2013 पासून आरटीई कायद्यानुसार शिक्षक निश्‍चिती करण्यात आली. त्यावेळी अनेक ठिकाणी शिक्षकांची पदे अतिरिक्त झाली. या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा घोळ गेली तीन-चार वर्षे सुरूच आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण झाल्याशिवाय शिक्षक भरती करण्यात येऊ नये असे आदेश शासनाने दिल्याने भरती प्रक्रिया थंडावली होती. गेल्या सात वर्षांत शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने रिक्त पदांची संख्या वाढली आहे.

शिक्षक भरती प्रक्रिया केव्हा होणार ऑनलाईन?
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण सेवक भरतीसाठी चाचणी परीक्षा घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने 30 मे 2017 ला घेतला आहे. शिक्षक भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी शासन पवित्र (PAVITRA-Portal for Visible to ALL Teachers Recrutment) ही संगणकीय प्रणाली विकसित करणार आहे. शिक्षण आयुक्‍त यांच्याकडे ही प्रणाली विकसित करण्याची जबाबदारी दिली आहे. ही प्रणाली विकसित झाल्यानंतरच शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत गती येण्याची शक्‍यता आहे.

लाखो बेरोजगार प्रतीक्षेत
शिक्षक पदासाठी आवश्‍यक शैक्षणिक पात्रता असलेले लाखो उमेदवार राज्यात आहेत. २०१३ पासून राज्य शासनाने टीईटी सुरु केली. शिक्षक पात्रता परीक्षेस (टीईटी) सुमारे सहा लाखांवर उमेदवार बसले होते. मात्र अद्याप शिक्षक भरती न झाल्याने ही बेरोजगारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लाखोंच्या संख्येने हे बेरोजगार शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत आहेत.

यावर्षी २२ जुलैला होणार टीईटी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने येत्या २२ जुलैला टीईटी घेणार असल्याचे घोषित केले आहे. या परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतु, यापूर्वीचे टीईटी उत्तीर्ण उमेदवार अजूनही नोकरीपासून वंचित असल्याने शिक्षक भरती केव्हा होणार हा प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत आहे.

SSC Recruitment 2017 – 2221 Posts.

SSC Recruitment 2017 | SI ASI Job Vacancies Details:

Organization Name: Staff Selection Commission (SSC).

Employment Category: Central Govt Jobs.

Total No. of Vacancies: 2221.

Job Location: All Over India.

Details:

Sub-Inspector in Delhi Police/Male: 616
Sub-Inspector in Delhi Police/ Female: 256

Sub-Inspector (GD) in CAPFs/Male: 697
Sub-Inspector (GD) in CAPFs/Female: 89

ASI (Executive) in CISF/Male: 507
ASI (Executive) in CISF/Female: 56

The last date for receipt of application :15 May 2017, until 5pm.

Educational Qualification: (As on 01.01.2017)
Candidates who have completed Any Degree or equivalent from a recognized Institute are Eligible to apply SSC Recruitment 2017.

Last Date To apply : 15 may 2017.

Last Date to pay fees : 18 may 2017.