चालू घडामोडी (२२ सप्टेंबर २०१७)

हबल दुर्बिणीला आढळल्या धूमकेतूसारख्या जुळ्या उल्का

● हबल अंतराळ दुर्बिणीने सौर प्रणालीच्या लघुग्रहाच्या पट्ट्यात वेध घेताना शास्त्रज्ञांना प्रत्यक्षात एकमेकांभोवती भ्रमण करणार्‍या दोन उल्का आढळून आल्या आहेत.
● धूमकेतूसारखी वैशिष्ट्ये असलेल्या उल्कामध्ये एक तेजस्वी केंद्रबिंदु (ज्याला कोमा म्हणतात) आणि लांब धूळची शेपूट असल्याचे आढळून आले आहे.
NASA च्या पृथ्वीच्या जवळ असलेल्या बाबींचा वेध घेण्यासाठीच्या कार्यक्रमामधून हा शोध लागला आहे. याला उल्का 300163 (2006 VW139) असे नाव देण्यात आले आहे.

—————————————————————-

प्रसिद्ध अभिनेत्री शकिला यांचे निधन

● ‘बाबूजी धीरे चलना…..’ या गाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री शकिला यांचे निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या.
● 50, 60 च्या दशकात चित्रपटसृष्टी गाजवणार्‍या अभिनेत्री शकिला या ‘हातिम ताई’ (1956), ‘आर पार’ (1954), ‘CID’ (1956), ‘श्रीमान सत्यवादी’ (1960), ‘चायना टाउन’ (1962) आणि अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसून आल्या.
—————————————————————-
ब्रिटीश मार्क ब्युमोंट याने 78 दिवसांत जगाला प्रदक्षिणा घातली

● ब्रिटिश सायकलस्वार मार्क ब्युमोंट याने 78 दिवस, 14 तास आणि 40 मिनिटे इतक्या कालावधीत जगाला प्रदक्षिणा घालून नवा गिनीज विक्रम केला आहे.
● त्याने 2015 साली न्यूझीलंडच्या अँड्र्यू निकोल्सनचा 123 दिवसांचा विक्रम मोडला. 80 दिवसांमध्ये 18,000 मैल (29,000 किलोमीटर) सायकलने प्रवास करून ग्रहाला प्रदक्षिणा घालण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा विक्रम मोडला.
● मार्क दिवसातून 18 तास सायकल चालवीत होता आणि प्रवासादरम्यान त्याने पोलंड, रशिया, मंगोलिया, चीन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका पालथे घातले.
—————————————————————-
‘बोट लॅब’च्या साहाय्याने ब्रह्मपुत्रा नदीचा अभ्यास केला जाणार

● ब्रह्मपुत्रा नदीचा संपूर्ण अभ्यास करण्यासाठी जैवतंत्रज्ञान विभाग एका नौकेवर प्रयोगशाळा उभी करणार आहे.
● प्रस्तावित जहाज ‘ब्रह्मपुत्रा बायोडायव्हर्सिटी बायोलॉजी बोट (B4)’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या नौकेवर बैठकीसाठी दोन मोठ्या खोल्या आणि एक सुसज्जित प्रयोगशाळा तयार करण्यात येणार आहे.
● संशोधक नदीच्या विविध पात्रातले नमुने गोळा करणार, पाण्याच्या गुणवत्तेसंदर्भात चाचण्या घेणार आणि नदीतील जैवविविधतेचा अभ्यास करणार.

—————————————————————-

राजस्थानमध्ये ‘वस्‍त्र 2017’ महोत्सवाचे उद्घाटन

● 21-24 सप्टेंबर 2017 या काळात राजस्थानच्या सीतापुरा (जयपुर जिल्हा) येथील जयपुर एक्झिबिशन अँड कन्व्हेंशन सेंटर येथे ‘वस्‍त्र’ या सहाव्या आंतरराष्ट्रीय वस्त्र व कपडे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘वस्त्र’ महोत्सव:
● ‘वस्त्र’ महोत्सव राजस्थान राज्य औद्योगिक विकास व गुंतवणूक महामंडळ मर्यादित (RIICO) आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (FICCI) यांच्याकडून संयुक्‍त रूपाने आयोजित केला जातो. सन 2012 पासून राजस्थान शासनाच्या समर्थनाने हा महोत्सव आयोजित केला जात आहे.

——————————————————————–
आंतरराष्ट्रीय स्तरावर रविना रवींद्र म्हात्रे हिला सुवर्ण यश 

● रविना रवींद्र म्हात्रे हिने आपल्या कराटे क्रीडा नैपुण्यातून प्राप्त केलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशातून एक नवा वस्तुपाठ महिलांच्या समोर ठेवला आहे.
● सध्याच्या काळात महिलांनी स्वसंरक्षणाकरिता दुस-यावर अवलंबून राहण्यापेक्षा त्याकरिता स्वत:च सिद्ध झाले पाहिजे, अशी भूमिका पेणमधील कारमेल हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणा-या रविना रवींद्र म्हात्रे हिची आहे.
● अथक मेहनतीने रविनाने इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये यश संपादन करून सिल्व्हर, गोल्ड पदके जिंकू नरायगडचे नाव उंचावले असून त्याकरिता तिने पाचवीपासून स्वसंरक्षणाच्या विचारातूनच कराटे या खेळाची निवड केली आणि पुढे याच खेळाची तिला आवड निर्माण झाली.
● सातत्यपूर्ण सरावातून रविनाने शालेय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पारितोषिके मिळविली आहेत, परंतु मे २०१७ मध्ये काठमांडू (नेपाळ) येथे झालेल्या इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेकरिता तिची निवड झाली.
● तिने या स्पर्धेत एक सिल्व्हर, दोन ब्रांझ मेडल्स मिळवून यश संपादन केले असून गतवर्षी जानेवारी २०१६ मध्ये तामिळनाडूमध्ये झालेल्या ‘नॅशनल थांग-ता चॅम्पियनशिप’ मध्ये तिने प्रत्येकी एक सिल्व्हर आणि गोल्ड मेडल संपादन करून आपल्या यशाची चढती कमान अबाधित राखली आहे.

—————————————————————-
राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ
● राज्य सरकारकडून गुरूवारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली असून १ जानेवारी २०१७ पासून ही पगारवाढ लागू होणार आहे.
● यापैकी ऑगस्टपासूनचा वाढीव महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपात दिला जाईल तर त्यापूर्वीच्या ७ महिन्यांमधील वाढीव महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे द्यायचा, याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे.
● राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घटस्थापनेचा मुहूर्त फलदायी ठरला असून यापूर्वी एप्रिल महिन्यातही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सात टक्क्यांची वाढ करण्यात आली होती.
● काही दिवसांपूर्वीच केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनाधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये १ टक्क्याने वाढ करण्यात आली होती ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि ६१ लाख निवृत्त वेतनधारकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
● त्यावेळी महागाई भत्ता १३२ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला असून आता त्यामध्ये आणखी चार टक्क्यांची भर पडली असून राज्य सरकारचे तब्बल १६ लाख कर्मचारी आणि ६ लाख निवृत्ती वेतनधारकांना वाढीव महागाई भत्त्याचा फायदा होणार आहे.
—————————————————————-

ईडन गार्डन्सने २६ वर्षानंतर अनुभवली ‘वन-डे’ हॅटट्रिक
● भारताकडून वन-डे सामन्यात हॅटट्रिक घेणारा कुलदीप तिसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी भारताकडून चेतन शर्मा आणि कपिल देव यांनी वन-डे सामन्यात हॅटट्रिक घेतली होती.
● ईडन गार्डन्सच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवनं ऑस्ट्रेलिन संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिल्या हॅटट्रिकची नोंद केली.
● यष्टिरक्षक मॅथ्यू वेड, अॅश्टन अॅगर आणि पॅट कमिन्सला माघारी धाडत कुलदीप यादवनं २६ वर्षांपूर्वीच्या कपिल देव यांच्या आठवणीला उजाळा दिला.
● ४ जानेवारी १९९१ मध्ये ईडन गार्डन्सच्या मैदानावर आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कपिल देव यांनी हॅटट्रिक घेतली होती, त्यांनी श्रीलंकेच्या रोशन महानमा, रुमेश रत्नायिके आणि सनथ जयसूर्या यांना तंबूचा रस्ता दाखवला होता.
● भारताने हा सामना ७ गडी राखून जिंकला होता. कपिल देव यांच्यापूर्वी चेतन शर्मा यांनी विदर्भ असोसिएशनच्या म्हणजेच नागपूरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात असा पराक्रम केला होता.
● कुलदीपने पहिल्या वन-डे सामन्यातही लक्षवेधी खेळी केली होती. या सामन्यात त्याने सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस स्टोयनिस यांना तंबूचा रस्ता दाखवत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते.
—————————————————————-

चालू घडामोडी (१५ सप्टेंबर २०१७)

‘एमआरयूसी’च्या अध्यक्षपदी आशिष भसीन

● ‘साउथ एशिया डेन्सू एजीस नेटवर्क’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भसीन यांची संस्थेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. ही निवड २०१७-१८ या वर्षासाठी आहे.

● माध्यम सर्वेक्षणात अग्रेसर असलेल्या ‘मीडिया रिसर्च यूझर्स काउन्सिल’ (एमआरयूसी) या संस्थेच्या उपाध्यक्षपदी ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांची निवड करण्यात आली आहे.

● मुंबईत १३ सप्टेंबर रोजी झालेल्या ‘एमआरयूसी’च्या सभेत पवार यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. पवार या आधी ‘एमआरयूसी’च्या संचालक मंडळात प्रकाशकांचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते.

● तसेच इंडियन रीडरशिप सर्व्हे (आयआरएस) हे भारतातल्या वृत्तपत्र वाचकांचे सर्वांत मोठे आणि सर्वांत विश्‍वासार्ह सर्वेक्षण ‘एमआरयूसी’च्या वतीने केले जाते.

● ‘एमआरयूसी’ गेल्या दोन दशकांपासून माध्यम क्षेत्रातील विविध पैलूंवर शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करत आहे.
—————————————————————
२०२४-२०२८ च्या ऑलिम्पिकसाठी यजमान शहरांची निवड 

● २०२४ आणि २०२८ सालच्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी यजमान शहरांची निवड करण्यात आले असून २०२८ साठी पॅरिस, तर २०२८ साठी लॉस एंजेलिसच्या नावावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं शिक्कामोर्तब केलं.

● पेरुची राजधानी लिमामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून लागोपाठ दोन ऑलिम्पिकची यजमान शहरं एकाचवेळी जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ होती.

● याआधी पॅरिसमध्ये १९२४ साली ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यानंतर नेमक्या शंभर वर्षांनी फ्रान्सच्या राजधानीत पुन्हा ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात येईल.

● २०२० साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा जपानमधील टोकियो शहरात घेतल्या जाणार आहेत.

● लॉस एंजेलिसमध्ये याआधी १९३२ आणि १९८४ साली ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे २०२८ साली लॉस एंजेलिसमध्ये तिसऱ्यांदा ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात येईल.
—————————————————————

बन की-मून यांच्याकडे IOC एथीक्स कमिशनचे प्रमुखपद

● संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी महासचिव बन की-मून यांची नियुक्ती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) एथीक्स कमिशनचे अध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे.

● ही नियुक्ती युसूफा नडिया यांच्या जागेवर करण्यात आली आहे.

● दक्षिण कोरियाचे बन की-मून यांनी सन 2007-2016 या काळात संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख म्हणून कार्य केले होते.

काय आहे IOC एथीक्स कमिशन ?

● क्रीडा क्षेत्रात नीतीमत्ता आणि उत्तम प्रशासनाच्या पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी IOC ने एथीक्स कमिशनची स्थापना केली. हे आयोग नीतिमत्तेसंबंधी नियम निश्चित करते आणि नीतिमत्तेचे उल्लंघन झाल्यास तक्रारींचा तपास घेऊन शिक्षा प्रस्तावित करते.
—————————————————————
NASA चा  कॅसिनी अंतराळयानाचा प्रवास संपला

● 20 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर, NASA च्या कॅसिनी अंतराळयानाचा प्रवास 15 सप्टेंबर 2017 रोजी संपुष्टात आला आणि ते शनी ग्रहाच्या वातावरणात कोसळले.

● प्रक्षेपणानंतर कॅसिनीने 4.9 अब्ज मैलाचा (7.9 अब्ज किलोमीटर) प्रवास केला आणि शनीला जवळजवळ 300 वेळा प्रदक्षिणा घालून 453,000 हून अधिक छायाचित्रे आणि 635 गीगाबाईट्सची वैज्ञानिक माहिती गोळा केली. कॅसिनीने सहा चंद्र शोधले तसेच शनीच्या भोवती असलेल्या पट्ट्याचा वेध घेतलेला आहे.

● आतापर्यंत कॅसिनीला सोडून फक्त तीन अंतराळयानांनी शनीच्या शेजारच्या वातावरणात प्रवास केलेला आहे. त्यामध्ये 1979 सालचे NASA चे पायोनियर-11 आणि 1980 सालचे व्हॉयेजर-1 आणि व्हॉयेजर-2 यांचा समावेश आहे.
—————————————————————
ब्रिटनमध्ये 10 पौंडाची नवी प्लास्टिकची नोट चलनात 

● ब्रिटनमधील सर्वात प्रसिद्ध लेखिका जेन ऑस्टिन यांचे चित्र असलेली 10 पौंड मूल्य असलेली एक नवी प्लॅस्टिक बँकनोट ब्रिटनमध्ये चलनात आणली गेली आहे.

● ब्रिटनमधील सर्व नोटांवर राणीचे छायाचित्र छापलेले असते. आतापर्यंत राणी व्यतिरिक्त नोटांवर छापण्यात आलेल्या महिलांमध्ये वैद्यकीय संशोधक फ्लोरेन्स नाइटिंगेल आणि सामाजिक सुधारक एलिझाबेथ फ्राय यांच्या नंतर जेन ऑस्टिन या तिसर्‍या महिला आहेत.
या नव्या नोटाचे वैशिष्ट्य म्हणजे ही बनावट नोट ओळखण्यास मदत करते. यावरील उठावदार ठिपकांमुळे अंध आणि अंशतः अंध असलेल्या व्यक्तींना नोट ओळखण्यास मदत होते.
—————————————————————
बॅडमिंटनपटू साई प्रणिथ आणि समीर वर्मा BWF क्रमवारीत पहिल्या 25 मध्ये

● भारतीय बॅडमिंटनपटू साई प्रणिथ आणि समीर वर्मा यांनी नव्या BWF क्रमवारीताच्या पुरुष एकेरी यादीत अनुक्रमे 16 वे आणि 25 वे स्थान प्राप्त केले आहे.

● तर महिला एकेरी यादीत बॅडमिंटन पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी आपले अनुक्रमे चौथे आणि 12 वे स्थान कायम राखलेले आहे.
महिला दुहेरी जोडीच्या यादीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी ही जोडी 25 व्या स्थानावर घसरली. तसेच जेरी चोप्रा आणि सिक्की यांची मिश्र दुहेरी जोडी 20 व्या स्थानावर कायम आहे.
—————————————————————

चालू घडामोडी (१८ ऑगस्ट २०१७)

GST अंतर्गत डोंगराळ राज्यातल्या कारखान्यांना अर्थसंकल्पीय सहाय्य मंजूर

● वस्तू आणि सेवा कराअंतर्गत (GST) जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि सिक्कीमसह ईशान्येकडील राज्यामधील पात्र औद्योगिक कारखान्यांना अर्थसंकल्पीय सहाय्य प्रदान करण्याच्या योजनेला मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने मंजूरी दिली आहे.

● GST आधी, या प्रदेशातील ज्या कारखान्यांना केंद्रीय अबकारी करात सूट मिळत होती, अशा कारखान्यासाठी 1 जुलै 2017 ते 31 मार्च 2027 या निश्चित काळात 27,413 कोटी रुपयांचे अर्थसंकल्पीय सहाय्य देण्यास मंजूरी मिळाली. या निर्णयामुळे ईशान्येकडील 4284 पात्र कारखान्यांना याचा लाभ होण्याचे अपेक्षित आहे

● भारत सरकारने ईशान्य औद्योगिक व गुंतवणूक संवर्धन धोरण (NEIIPP), 2007 आणि जम्मू-कश्मीर, उत्तराखंड व हिमाचल प्रदेश सारख्या विशेष दर्जाच्या राज्यांसाठी अर्थसंकल्पीय सहाय्य देण्याचे सुरू करत होती.

● याचा खास लाभ म्हणजे व्यावसायिक उत्पादनास सुरुवात झाल्यानंतर प्रथम दहा वर्षात उत्पादन शुल्कात सूट मिळत होती. GST लागू झाल्यानंतर उत्पादन शुल्काचे नियम रद्द केले गेले.

————————————————
2017-18 वर्षात अल्पकालीन पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना आधार अनिवार्य आहे : RBI

● भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) व्यावसायिक बँकांना सूचित केले आहे की, वर्ष 2017-18 मध्ये शेतकऱ्यांना अल्पकालीन पीक कर्ज घेण्याकरता खात्याशी आधार कार्ड जोडणे अनिवार्य करणे.

● सर्व सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील अनुसूचित व्यावसायिक बँकांना लघुकालीन पीक कर्जांसाठी व्याज सहाय्य योजनेवर अधिसूचना जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना त्यांच्या खात्यात व्याजासंबंधी लाभ हस्तांतरित केला जातो.

● केंद्र सरकारने काही अटींनुसार वार्षिक 7% व्याजदराने तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्पकालीन पीक कर्जासाठी वर्ष 2017-18 साठी व्याज सहाय्य योजनेची अंमलबजावणी करण्यास मंजूरी दिली होती. योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना 2% व्याज सवलत दिली जाणार आहे.
————————————————
“माध्यमिक आणि उच्च स्तर शिक्षण कोष” तयार केला जाणार आहे

● माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी “माध्यमिक आणि उच्च स्तर शिक्षण कोष (MUSK)” नावाने सार्वजनिक खात्यामध्ये एकल स्थायी कॉर्पस निधी तयार करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने आपली मंजूरी दिली आहे.

● कोषासंबंधी व्यवहारांचे व्यवस्थापन मनुष्यबळ विकास मंत्रालय पाहणार आहे.

मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या बाबी :

● माध्यमिक आणि उच्च स्तर शिक्षण कोषात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण कराची शिल्लक रक्कम जमा केली जाईल. यामधील निधीला देशभरातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांसाठी उपयोगात आणल्या जाईल.

● मनुष्यबळ विकास मंत्रालय निर्धारित प्रक्रियेनुसार आवश्‍यकता पडल्यास माध्‍यमिक व उच्‍च शिक्षणाच्या कोणत्याही कार्यक्रम/योजनेसाठी निधिचे वाटप करू शकते.

● कोणत्याही वित्‍तीय वर्षात शालेय शिक्षण व साक्षरता विभाग आणि उच्‍च शिक्षण विभाग यांच्याकडून राबविण्यात येणार्‍या योजनांवरील खर्च सुरुवातीला सकल अर्थसंकल्पीय सहाय्याने (GBS) संपूर्ण केले जाईल आणि GBS च्या रकमेचा उपयोग झाल्यानंतरच MUSK मधून खर्चासाठी निधि दिला जाणार.
● MUSK मधील निधि बिन-व्याजी आधारित संरक्षित निधिच्या स्वरुपात केला जाईल.

MUSK मागील पार्श्वभूमी :

● मूलभूत आणि प्रारंभीक शिक्षणाच्या क्षेत्रात विकासासाठी 10 व्या पंचवर्षीय योजनेदरम्यान सादर केलेल्या अर्थसंकल्पात 1 एप्रिल 2004 पासून सर्व केंद्रीय करांवर 2% शिक्षण शुल्‍क आकारल्या गेले. त्यानंतर वित्‍त अधिनियम 2007 च्या कलम 136 अन्वये ‘’माध्‍यमिक व उच्‍च शिक्षण उपकर’’ नामक सर्व केंद्रीय करांवर 1% उपकर आकारल्या गेले. त्यानंतर जुलै 2010 मध्ये निधीच्या उपयोगानंतर शिल्लक रकमेसाठी MUSK संबंधी प्रस्‍ताव मंत्रालयाने सादर केला.

————————————————

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय पुरस्कार जाहीर

● सन 2014-15 आणि 2015-16 वर्षांसाठीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि डॉ. एस.आर. रंगनाथन कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर करण्यात आले.

● 2014-15 या वर्षाच्या पुरस्कारांसाठी राज्यभरातून 19 ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवकांची राज्यस्तरीय निवड समितीने निवड केली आहे.

● तसेच 2015-16 सालासाठी एकूण 13 ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवकांची निवड करण्यात आली आहे.

● वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान लाभावे यासाठी ग्रंथालयांना पुरस्कार दिला जातो.

● ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, या ग्रंथालयांकडून जनतेला चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे हा यामागील उद्देश आहे.

————————————————
भारतीय लष्करासाठी लढाऊ हेलिकॉप्टर्सला मंजूरी

● भारतीय लष्करासाठी 4,168 कोटी रुपये खर्च करून सहा ‘अ‍ॅपाचे’ लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या प्रस्तावास संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील ‘डिफेन्स अ‍ॅक्विझिशन कौन्सिल’च्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

● प्रभावी युद्धसज्जतेसाठी लढाऊ हेलिकॉप्टर मिळावीत ही लष्कराची फार काळापासूनची प्रलंबित मागणी होती. ही ‘अ‍ॅपाचे’ हेलिकॉप्टर मिळाल्यावर लष्करास तशा प्रकारची हेलिकॉप्टर प्रतणच उपलब्ध होतील.

● तसेच नौदलाच्या युद्धनौकांसाठी 490 कोटी रुपये खर्च करून दोन गॅस टर्बाईन खरेदी करण्याच्या प्रस्तावासही ‘डीएसी’ने मंजुरी दिली.
जनतेच्या शिफारशीने मिळणार पद्म पुरस्कार :

● विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रजासत्ताक दिनी भारत सरकारतर्फे जाहीर होणारे ‘पद्म’ पुरस्कार यापुढे देशातील जनतेच्या शिफारशींवरून दिले जातील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

● निती आयोगाने उद्योजकांसाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आतापर्यंत ‘पद्म’ पुरस्कारांसाठी निवड विविध मंत्रालयांच्या शिफारशींच्या आधारे केली जात असे. केंद्र सरकारने यात थोडी सुधारणा करून केवळ सरकारी शिफारशीचे बंधन काढून टाकले आहे. यापुढे देशातील कोणीही नागरिक ‘पद्म’ पुरस्कारासाठी नावांची ऑनलाइन शिफारस करू शकेल.

तसेच या बदलामुळे प्रसिद्धीच्या झोतात न राहता काम करणार्‍या खर्‍या ‘हीरों’च्या कामाचे योग्य मूल्यमापन होईल, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, प्रत्येक नागरिक आपल्या परीने देशासाठी काही तरी करू शकतो आणि तो तसे करत असतो असा आमच्या सरकारचा दृढ विश्वास आहे व म्हणूनच देशाला बलवान करण्यासाठी नागरिकांच्या या बलस्थानांचे एकत्रीकरण करणार आहे.

————————————————
शेतकरी संघटनेचे नेते वसंतराव आपटे कालवश

● शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते वसंतराव गणेश आपटे यांचे 17 ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.

● सराफी व्यवसाय सांभाळून त्यांनी आयुष्यभर शेतकर्‍यांसाठी लढा दिला.

● समाजवादी विचारसरणीचा त्यांच्यावर पगडा होता. साने गुरुजींचाही त्यांच्यावर मोठा प्रभाव होता.

● सिद्धेश्वर साखर कारखान्याचे ते उपाध्यक्ष आणि संचालक होते.

● तसेच अंत्रोळी येथे नानासाहेब अंत्रोळीकर यांच्या साथीने त्यांनी गावकर्‍यांसाठी दूध संस्था सुरू केली.

चालू घडामोडी (१७ ऑगस्ट २०१७)

भारत-अमेरिका 2×2 मंत्रिस्तरीय संवाद परिषद स्थापित करण्यास सहमत

● भारत-प्रशांत महासागराच्या प्रदेशात शांती आणि स्थिरता वाढविण्यासाठी धोरणात्मक सल्लामसलतीसाठी एक नवीन 2×2 मंत्रिस्तरीय संवाद परिषद (2-by-2 ministerial dialogue) स्थापन करण्यास भारत आणि अमेरिका यांनी मान्य केले आहे.

● भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जूनमधील अमेरिका दौऱ्यादरम्यान संरक्षण व परराष्ट्र मंत्र्यांशी संबंधित ही परिषद स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला होता. मात्र याची घोषणा भारताच्या स्वातंत्र्यदिना निमित्त 15 ऑगस्टला करण्यात आली.

● याशिवाय भारताने अमेरिकेमधून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची आयात करण्यासंबंधी करार केला आहे आणि याची पहिली खेप अमेरिकेच्या टेक्सासमधून या आठवड्यात निघणार आहे.
——————————————————–
भारत सरकारने RIL आणि BP वर $264 दशलक्षचा दंड आकारला

● भारत सरकारने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्याच्या भागीदारांना वर्ष 2015-16 मध्ये पूर्व किनारपट्टीलगतच्या KG-D6 क्षेत्रातून लक्ष्यित नैसर्गिक वायूचे उत्पादनाच्या कमी उत्पादन घेतल्या प्रकरणी $264 दशलक्षचा (सुमारे 1700 कोटी रुपये) नवा दंड ठोठावला आहे.

● किंमतीबाबत झालेल्या नुकसानीमुळे सरकारचा नफ्यातील भाग म्हणून अतिरिक्त $175 दशलक्षचा दावा केला आहे.

● यासह 1 एप्रिल 2010 पासून आतापर्यंत रिलायन्स आणि त्याचे भागीदार ब्रिटनची BP Plc आणि कॅनडाची निको रिसोर्स कंपनी यांच्यावर आकारण्यात आलेला एकूण दंड $3.02 अब्जवर पोहचलेला आहे.

● निश्चित मर्यादेनुसार, दिवसाला 80 दशलक्ष स्टँडर्ड क्युबिक मीटरचे (mmscmd) उत्पादन घेतले जाण्याचे ठरविण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात उत्पादन दरवर्षांला कमी घेतले गेले आणि आता ते 4 mmscmd पर्यंत घसरलेले आहे.
——————————————————–
नेदरलँड्सविरुद्धच्या मालिकेत भारतीय पुरुष हॉकी संघाचा विजय

● अॅम्सटरडॅम (नेदरलँड्स) येथे खेळण्यात आलेल्या दोन सामन्यांच्या हॉकी सामन्यांच्या मालिकेत भारतीय पुरुष हॉकी संघाने जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकाच्या नेदरलँड्सचा 2-1 असा पराभव केला.

● भारतीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व मनप्रीत सिंग याने केले. गुरजंत सिंग आणि मनदीप सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. गुरजंत सिंगचा तो पहिला आंतरराष्ट्रीय गोल होता.
——————————————————–

इजिप्तच्या पुरातत्त्वतज्ज्ञांनी तीन प्राचीन थडगी शोधून काढली

● जवळपास 2,000 वर्षापूर्वीची तीन थडगी नव्यानेच दक्षिण इजिप्तमध्ये शोधली गेली आहेत. पुरातत्त्वतज्ज्ञ अली अल-बकरी यांच्या नेतृत्वात चमूने हा शोध घेतला.

● मिनाया प्रांतात अल-कमीन अल-सारवाही येथे जमिनीखाली खोलवर ही थडगी आढळून आलीत. त्यात मानवी चेहरे कोरलेली थडगी आढळून आली आहे.

● शिवाय लहान मुलासह सहा दफन केलेल्या कबरी आढळून आल्या आहेत. यावेळी प्रथमच सहारा वाळवंटाच्या प्रदेशात लहान मुलाची प्राचीन कबर सापडली आहे.

——————————————————–
सुरक्षेसंबंधी जी-7 आंतरिक मंत्र्यांची परिषद इटली आयोजित करणार

● सुरक्षेसंबंधी मुद्द्यांवर जी-7 देशांच्या आंतरिक मंत्र्यांची शिखर परिषद इटलीमध्ये आयोजित केली जाणार आहे. ही परिषद बहुदा ऑक्टोबर महिन्यात आयोजित केले जाईल.

काय आहे  जी-7 समूह?

● 1975 साली प्रथम फ्रान्स, जर्मनी, जपान, ब्रिटन, इटली आणि अमेरिका या सहा देशांनी जी-6 समूहाची स्थापना केली. पुढे 1976 साली कॅनडा यात सामील झाले आणि समूहाचे नाव जी-7 समूह करण्यात आले.

●  जी-7 समूहामध्ये कॅनडा, जपान, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि अमेरीका हे देश आहेत. पुढे यात यूरोपियन यूनियन सामील झाले.

● आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मार्गदर्शक तत्वानुसार, या समूहाच्या सदस्यत्वासाठी उच्च निव्वळ राष्ट्रीय संपत्ती आणि उच्च मानव विकास निर्देशांक असणे आवश्यक आहे. सध्या इटली जी-7 चे अध्यक्षपद भूषवित आहे.
——————————————————–
शांतता क्षेत्र जाहीर करण्याचा अधिकार राज्य सरकारला 

● राज्य सरकारच्या विनंतीवरून केंद्र सरकारने ध्वनिप्रदूषणाच्या नियमांत सुधारणा केल्याने ‘शांतता क्षेत्र’ घोषित करण्याचा अधिकार सरकारला मिळाल्याची माहिती सरकारने उच्च न्यायालयाला दिली.

● मात्र, नियमांत सुधारणा केल्याने जो परिसर राज्य सरकार ‘शांतता क्षेत्र’ म्हणून अधिसूचित करेल त्याच परिसराला ‘शांतता क्षेत्र’ म्हणून गणण्यात येईल, असे सरकारने न्यायालयात स्पष्ट केले.

● सुधारित नियमानुसार ‘शांतता क्षेत्र’ जाहीर करण्याचा अधिकार राज्य सरकारला देण्यात आला आहे, असे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाला सांगितले.

● केंद्र सरकारची अधिसूचना 10 ऑगस्टपासून अमलात आली. मात्र, सरकारने अद्याप राज्यातील एकही ठिकाण ‘शांतता क्षेत्र’ म्हणून जाहीर केलेले नाही. त्यामुळे सद्यस्थितीत राज्यात एकही ‘शांतता क्षेत्र’ नाही, असे कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले.

● उत्सव काळात ध्वनिक्षेपक रात्री 10 ऐवजी मध्यरात्रीपर्यंत वापरण्याची सवलत देण्याची तरतूद या नियमांत आहे. ही सवलत वर्षभरातील केवळ 15 दिवसच दिली जाऊ शकते. हे 15 दिवस ठरविण्याचा अधिकार सरकारला आहे; परंतु सुधारित नियमांनुसार सवलतीचे 15 दिवस ठरविण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे.

——————————————————–
प्रतापसिंह पाटणकर यांना राष्ट्रपतिपदक जाहीर 

● मूळचे तडवळे संमत कोरेगाव (ता. कोरेगाव) येथील रहिवाशी व सध्या नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर यांना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल राष्ट्रपतिपदक जाहीर झाले आहे.

● श्री. पाटणकर यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण तडवळे संमत कोरेगाव, तर महाविद्यालयीन शिक्षण कोरेगाव येथील डी.पी. भोसले महाविद्यालयात झाले.

● पुढील शिक्षण पुण्यात झाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या परीक्षेतून 1984 मध्ये श्री. पाटणकर यांची पोलिस उपअधीक्षकपदी नियुक्ती झाली.

● नंदुरबार, अहेरी व नवी मुंबई येथे त्यांनी या पदावर सेवा केली. 1997 मध्ये त्यांची पोलिस अधीक्षकपदी पदोन्नती झाली.

● पोलिस अधीक्षकपदी हिंगोली, सिंधुदुर्ग, पुणे रेल्वे, समोदशक रा.रा.पो.बल गट क्रमांक 11 नवी मुंबई, पोलिस उपायुक्त झोन 3 नागपूर. 2017 मध्ये पदोन्नती झाल्याने अपर पोलिस आयुक्त ठाणे शहर, नागपूर शहर व जानेवारी 2017 पासून नागपूर परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षकपदावर आजपर्यंत कार्यरत आहेत.

● तसेच श्री. पाटणकर यांना यापूर्वी पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह, कठीण सेवापदक (नक्षलग्रस्त भागात काम केल्याबद्दल), आंतरिक सुरक्षा पदक मिळालेले आहे.

——————————————————–

चालू घडामोडी (१५/१६ ऑगस्ट २०१७)

नवे ‘इंजेक्टेबल टिश्यू पॅच’ हृदयाला दुरूस्त करण्यास मदत करू शकते

● कॅनडाच्या टोरंटो विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी टपाल स्टॅम्पपेक्षा अगदी लहान असे नवे ‘इंजेक्टेबल टिश्यू पॅच’ विकसित केले आहे, जे हृदयाला दुरूस्त करण्यास मदत करू शकते. छातीचा भाग उघडल्याशिवाय दुरूस्त करणारे ऊतकांचे पॅच (संकलन) एका लहान सुईने शरीरात टाकण्यासाठी हे एक तंत्र विकसित केले गेले आहे.

● हृदयाच्या ऊतकांच्या लहान पॅचला ‘एंजियोचीप (AngioChip)’ असे नाव दिले आहे, ज्यात स्वतःच्या रक्तवाहिन्या आणि हृदयाची पेशी आहेत.

● रेडिसिकच्या प्रयोगशाळेत माइल्स मॉन्टगोमेरी या पीएचडी संशोधकाने जवळजवळ तीन वर्षांच्या संशोधनानंतर हे पॅच विकसित केले आहे.

पॅच कसे काम करते?

● हे पॅच एखाद्या पट्टीप्रमाणे स्वतःला स्वरूप देते आणि नष्ट झालेल्या पेशींची जागा घेते. यामुळे शस्त्रक्रियेची गरज भासत नाही. यामुळे शरीरामधील प्रकेयेवर कोणताही फरक पडत नसल्याचे उंदीर व डुकरांवर करण्यात आलेल्या प्रयोगात आढळून आले.

या तंत्राची गरज का आहे?

● हृदयविकाराच्या झटक्यामुळे किंवा इतर आरोग्यासंबंधी कारणामुळे नष्ट झालेल्या आणि ओपन-हार्ट शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या हृदयाच्या ऊतकांना (heart tissue) दुरूस्त करण्यासाठी ऊतकांची सहसा गरज असते.

● हृदयविकाराच्या झटक्यानंतर, ओपन-हार्ट सर्जरीसारख्या हल्लीच्या प्रक्रियेमुळे कदाचित हृदयाच्या कार्यामध्ये बाधा येऊन धोका निर्माण होतो.

—————————————————————–
‘सी प्लेन’ची चाचणी भारतात होणार

● जपानी कंपनीने सी प्लेन तयार केले असून, चाचणीसाठी भारताची निवड केली आहे.

● कंपनीने परवानगीसाठी भारतीय नागरी उड्डयन मंत्रालयाशी संपर्क साधला. या चाचणीत सुरक्षेची चाचपणीही करण्यात येईल.

● पूर्व किनारा किंवा इतर किनाऱ्यावर ही चाचणी घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री अशोक गजपती राजू यांनी दिली.

● एअर इंडियाच्या मिहानमधील एमआरओमध्ये पहिल्यांदाच स्पाईट जेट या खासगी कंपनीच्या विमान दुरुस्ती सेवेच्या लोकार्पणासाठी ते शहरात आले होते.

● देशातील हवाई वाहतुकीतील ही सर्वांत मोठी कंपनी आहे. या कंपनीला तोटातून बाहेर काढण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.

● कंपनीबाबत निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठित केली.

—————————————————————–

‘भारत-ASEAN युवा परिषद’ भोपाळमध्ये आयोजित

● 14-19 ऑगस्ट 2017 दरम्यान चालणार्‍या ‘भारत-ASEAN युवा परिषद’ चे आयोजन भोपाळतर्फे करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि बाह्य व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी केले.

● परिषद असोसिएशन ऑफ साउथईस्ट एशियन नेशन्स (ASEAN) च्या 25 व्या वर्धापनदिनाला चिन्हांकित करीत आहे.

● ASEAN ही दहा दक्षिण-पूर्व आशियाई राज्यांचा समावेश असलेली एक प्रादेशिक संस्था आहे, जी आंतरसरकारी सहकार्याला प्रोत्साहन देते आणि त्यांच्या सदस्यांमध्ये आर्थिक एकात्मता प्रदान करते.

● 8 ऑगस्ट 1967 रोजी इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड यांनी याची स्थापना केल्यापासून, याचे सभासदत्व ब्रुनेई, कंबोडिया, लाओस, म्यानमार (बर्मा) आणि व्हिएतनाम यांना देण्यात आले.

—————————————————————–
गोरखालँड विवाद

● गोरखालँड विवाद हा दार्जिलिंग आणि कालिंपोंग जिल्ह्यांमध्ये, विशेषत: याचा डोंगराळ भागात, बोलीभाषेवरून नागरिकांमध्ये राजकीय हेतूने झालेला उद्रेक आहे. दार्जिलिंग हा पश्चिम बंगालचा उत्तरेकडील जिल्हा आहे आणि चीन-भारतीय सीमेवरून 441 किलोमीटर अंतरावर स्थित आहे.

● भारतीय घटनेच्या 8 व्या अनुसूचीत नेपाळी भाषेला दार्जिलिंग आणि सिक्कीमची अधिकृत भाषा म्हणून सामील करण्यात आले आहे. या प्रदेशातून भारतीय लष्करात नियुक्त होणार्‍या तुकडीला गोरखा म्हणून ओळखले जाते.

● पश्चिम बंगाल राज्य सरकारने संपूर्ण राज्यात शालेय शिक्षणात तीन भाषा शिकविण्यासंबंधी सूत्र प्रस्थापित करण्याचे ठरविले. या अंतर्गत, इयत्ता दहावीपर्यंत बंगाली भाषेला सक्तीचे केले जाणार आहे, मात्र विद्यार्थ्यांना या विषयाची परीक्षा द्यावी लागणार नाही आहे.

● पश्चिम बंगाल सरकारच्या या निर्णयामुळे गोरखा जातीय संस्कृती आणि सामाजिक-आर्थिक हितसंबंधांना धोका असल्याचे मानले जात आहे. तसेच पश्चिम बंगालच्या या डोंगराळ प्रदेशात नेपाळी ही अधिकृत भाषा असूनही बंगालीला सक्तीचे केल्या प्रकरणी आंदोलन सुरू झाले. शिवाय, सीमावर्ती प्रदेश असल्याने विकासाच्या दृष्टीने हा प्रदेश नेहमीच वादीत असतो.

● पश्चिम बंगाल सरकारने आपला वादग्रस्त आदेश मागे घेतला आहे. मात्र 1986-88 साली प्रदेशाला राज्य दर्जा देण्यासंबंधी जुन्या मागणीला पुन्हा एकदा गोरखा जनमुक्ती मोर्चाने पुढे मांडले आहे.

● या प्रदेशातील संस्कृतीला जपण्यासाठी आणि वैशिष्ट्य अबाधित ठेवण्याकरिता ही मागणी केली जात आहे. या आंदोलनात बिमल गुरुंग यांच्या नेतृत्वात गोरखा जनमुक्ती मोर्चाने (GJM) आघाडी घेतली.

—————————————————————–

रंगमंचावरील अभिनेत्री शोभा सेन यांचे निधन

● संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेती, रंगमंचावरील जेष्ठ अभिनेत्री शोभा सेन यांचे कोलकातामध्ये वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले.

● सेन यांनी बेथ्यून महाविद्यालयातून पदवी प्राप्त केल्यानंतर गणनाट्य संघात प्रवेश केला आणि “नबन्ना” नाटकात प्रमुख भूमिका वठवली.

● नंतर 1943-54 या काळात पीपल्स थिएटर ग्रुपमध्ये ‘बॅरिकेड’, ‘टिनर तलोयार’ आणि ‘तितूमी’ या नाटकात अभिनय केला. तसेच त्यांनी मृणाल सेनच्या ‘एक अधुरी कहाणी’ आणि ‘एक दिन प्रतिदिन’, गौतम घोषच्या ‘देखा’ आणि बासू चटर्जीच्या ‘पसंद अपनी अपनी’ या चित्रपटात काम केले.

—————————————————————–

धावपटू उसेन बोल्टची निवृत्ती

● जमैकाचा जगप्रसिद्ध धावपटू उसेन बोल्ट याने क्रीडाजगतातून आपली निवृत्ती घेतली आहे. लंडनमधील 2017 विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत पुरूषांच्या 4×100 मीटर रिले शर्यतीनंतर बोल्टने आपली निवृत्ती जाहीर केली.

● बोल्टने आपल्या कारकि‍र्दीत 8 वेळा ऑलिम्पिक विजेता आणि 11 वेळा विजेता ठरला. त्याने एकूण 23 सुवर्ण, 5 रौप्य आणि 1 कांस्य पदकांची कमाई केलेली आहे.

● बोल्ट हा 100 मी., 200 मी. आणि 4×100 मी. प्रकारात सलग तीन वेळा ऑलिम्पिक विजेता ठरणारा एकमेव खेळाडू आहे.

—————————————————————–

सर्बियाच्या गोल्डन ग्लॉव्ह महिला मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताला 10 पदके

● सर्बियातील व्होज्वोदिना येथे खेळल्या गेलेल्या ‘गोल्डन ग्लॉव्ह वुमन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2017’ स्पर्धेत भारतीय मुष्टियोद्धानी दोन सुवर्णपदकांसह 10 पदके प्राप्त केलेली आहेत.

● ज्योती (51 किलो) आणि वनलाल्हारीतपूई (60 किलो) यांनी सुवर्ण जिंकले. अंजली (48 किलो), साक्षी (54 किलो), अश्था (69 किलो) आणि अनुपमा (81 किलो) यांनी रौप्य मिळवले. तसेच चार कांस्य पदके भारताला मिळाली.

 

—————————————————————–

‘इंडिया डे’ महोत्सव जोहान्सबर्गमध्ये आयोजित

● भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमधील झू लेक रिजॉर्ट येथे 13-14 ऑगस्ट 2017 रोजी ‘इंडिया डे’ महोत्सव आयोजित करण्यात आला.

● भारतीय कलेचे प्रदर्शन घडविणारा ‘इंडिया डे’ महोत्सव इंडिया क्लब द्वारा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी परदेशी आणि दक्षिण आफ्रिकन-भारतीय कलाकारांद्वारे संगीत आणि नृत्य कलेचे प्रदर्शन करण्यात आले.

—————————————————————–

नोव्हेंबरमध्ये भारत-चीनचा प्रथम IMMSAREX सागरी सराव आयोजित

● हिंद महासागराच्या बंगालच्या उपसागरात नोव्हेंबर 2017 मध्ये भारतीय नौदल आणि चीनचे पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्ही यांच्यात ‘IMMSAREX’ या सागरी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.

● इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम (IONS) येथे अध्यक्षपदावर असलेल्या बांग्लादेशच्या अध्यक्षतेखाली हा प्रथम आंतरराष्ट्रीय सागरी शोध व बचाव सराव (IMMSAREX) आयोजित करण्यात आला आहे.

● IONS चे सदस्य आणि निरीक्षक देशांची जहाजे आणि विमाने यात सहभाग घेणार आहेत.

● IONS हा हिंद महासागराची सीमा असलेल्या देशांचे एक प्रादेशिक मंच आहे, ज्यामध्ये सदस्य देशांचे नौसेनाप्रमुख आपापल्या देशाचे प्रतिनिधीत्व करतात.

● याची स्थापना फेब्रुवारी 2008 मध्ये झाली. याचे सध्या 23 सदस्य आणि 9 निरीक्षक आहेत. 2014 साली स्वीकारलेल्या ठरावानुसार IMMSAREX आयोजित केले गेले आहे.

—————————————————————–

2021 सालापर्यंत लंडनची जगप्रसिद्ध ‘बिग बेन’ घड्याळ बंद राहणार

● लंडन (इंग्लंड, ब्रिटन) येथील 19 व्या शतकातील जगप्रसिद्ध क्लॉक टॉवर ‘बिग बेन’ हे घड्याळाच्या आवश्यक दुरुस्ती कार्यासाठी पुढील आठवड्यापासून चार वर्षांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

● ‘बिग बेन’ला वेस्टमिन्स्टर राजवाड्याच्या ‘एलिझाबेथ टॉवर चे नियमित ठोके म्हणून अधिकृतपणे ओळखले जाते. ही ‘ग्रेट बेल’ 157 वर्षांपासून दर तासाला ठोके देते. येथील घंटी 13.7 टन वजनी आहे. टॉवरची उंची 96 मीटर इतकी आहे.

● 1859 साली हे टॉवर लोकांसाठी उघडण्यात आले. याची स्थापत्यकला शैली ही गॉथिक रिव्हायवल आर्किटेक्चरची आहे. यापूर्वी 1983 आणि 1985 साली प्रमुख पुनर्रचनात्मक कार्ये केली गेली होती.

—————————————————————–

मूत्रपिंडासंबंधी रोगावरील औषधाला नाटको फार्माला USFDA ची मान्यता

● भारताच्या नाटको फार्मा कंपनीला मूत्रपिंडासंबंधी रोगाच्या अंतिम टप्प्यात उपचारासाठी लॅनथानम कार्बोनेटच्या चावून घ्यायच्या गोळ्यांचा अमेरिकेच्या बाजारपेठेत व्यापार करण्यासाठी अमेरिकन अन्न व औषधी प्रशासन (USFDA) ने परवानगी दिली आहे.

● कंपनीचे लॅनथानम कार्बोनेट या शिर डेव्हलपमेंट कंपनीच्या फॉसरेनॉल गोळ्यांच्या समतुल्य आहे, जे रुग्णांमध्ये फॉस्फेटचे द्रव्य कमी करण्यास मदत करते.

● नाटकोने फॉसरेनॉल गोळ्यांच्या समतुल्य गोळी तयार करण्यासाठी अमेरिकेच्या लुपिन कंपनीसोबत 1 सप्टेंबर 2008 रोजी एक करार केला होता.

—————————————————————–
पी. बी. बालाजी – टाटा मोटर्सचे मुख्य वित्तीय अधिकारी

● टाटा मोटर्स समूहाने त्यांचे नवीन मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून पी. बी. बालाजी यांना नियुक्त केले आहे. बालाजी नोव्हेंबर 2017 पासून आपल्या पदाचा कार्यभार सांभाळतील.

● बालाजी हे एक जागतिक वित्त व्यावसायिक आहेत आणि त्यांना वित्त क्षेत्रात कॉर्पोरेट क्षेत्रात दोन दशकांचा अनुभव आहे. त्यांनी 1995 सालापासून जगभरातील विविध कंपन्यांमध्ये काम केले आहे.

● सध्या ते 2014 सालापासून हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये मुख्य वित्तीय अधिकारी पदावर आहेत.

—————————————————————–

प्रथमच ऑकलंडचे ‘वॉर म्युझियम’ भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रंगात उजळले

● 15 ऑगस्ट 2017 रोजी भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, प्रथमच न्यूझीलंडमधील ऑकलँडचे ‘वॉर म्युझियम’ हे भारतीय राष्ट्रध्वजातील तिहेरी रंगाच्या प्रकाशझोताने प्रकाशमान करण्यात आले.

● याप्रसंगी संग्रहालयात सांस्कृतिक व अन्न महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आणि संग्रहालयाच्या पार्श्वभूमीवर उत्स्फूर्त नृत्य कार्यक्रमासह संगीत मैफिली झाल्या.

● ऑकलँडचे ‘वॉर म्युझियम’ हे न्यूझीलंडचे सर्वात महत्वाच्या संग्रहालयांपैकी एक आणि युद्ध स्मारकांचे संग्रहालय आहे. 28 नोव्हेंबर 1929 रोजी उघडले गेले. येथे न्यूझीलंडचा इतिहास तसेच लष्करी इतिहास प्रदर्शित केला आहे. निओ-क्लासिसिस्ट शैली ही या बांधकामाची स्थापत्य शैली आहे

 

चालू घडामोडी (१२/१३ ऑगस्ट २०१७)

ISRO कडून पृथ्वी निरीक्षणासाठी ‘हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग सॅटलाइट’ विकसित

● भविष्यातील उपग्रहांच्या दृष्टिकोनामधून, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) प्रथमच परिपूर्ण असा ‘हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग सॅटलाइट (HySIS)’ विकसित केला आहे. हा उपग्रह सुमारे ६०० किमी दूर अंतराळात पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला जाईल.

● उपग्रहाची संरचना स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटर, अहमदाबादने केली आहे आणि इलेक्ट्रॉनिक चिप ISRO च्या सेमी-कंडक्टर प्रयोगशाळा, चंदीगड येथे तयार केली आहे.

● पृथ्वीचे परिपूर्ण निरीक्षण करण्यासाठी हा उपग्रह अंतराळात सोडण्यात येणार आहे. प्रक्षेपण योजना अजून निश्चित नाही.

● हायपरस्पेक्ट्रल (hyspex) इमेजिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेतून ६३० किमी दूरवरून ५५ स्पेक्ट्रल किंवा कलर बँडमधून पाहू शकतो.

● ISRO ने विकसित केलेली ‘ऑप्टिकल इमेजिंग डिटेक्टर अॅरे’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या इलेक्ट्रॉनिक चिपचा वापर करून हा उपग्रह तयार करण्यात आला आहे. ही चिप १००० x ६६ पिक्सेलमध्येही वाचू शकते.

● हा उपग्रहामध्ये प्लेन-व्हॅनिला ऑप्टिकल इमेजर हे उपकरण बसवलेले आहे. उपग्रह लष्करी पाळतीसोबतच पर्यावरण, पिके, तेल आणि खनिजांचा शोध घेण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

● IMS-1 (मे २००८) हा भारताचा पहिला ८३ किलो वजनाचा प्रयोगात्मक उपग्रह होता. चंद्रावरील खनिजांचा शोध घेण्यासाठी २००८ साली चंद्रयान-१ मध्ये हायपरस्केट्रल कॅमेरा बसविण्यात आला.
● RISAT-1 आणि 2 : ढग आणि अंधारात पाहू शकणारा मायक्रोवेव्ह किंवा रडार इमेजिंग उपग्रह

—————————————————

भारतामधील ब्रिटनची व भारतीय विद्यापीठे 5 सौर ऊर्जा केंद्रे उभारणार

● भारतामध्ये कार्यरत असलेल्या ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांसह ब्रिटनची व भारताची 12 विद्यापीठे 5 सौर ऊर्जा केंद्रांची उभारणी करणार आहेत.

● दुर्गम भागात या विद्यापीठांना आवश्यक असलेल्या ऊर्जेच्या निर्मितीसाठी ब्रिटनच्या (यूके) सरकारच्या ग्लोबल चॅलेंजेस रिसर्च फंड (GCRF) ने 7 दशलक्ष पाउंडचे अनुदान उपलब्ध करून दिले आहे.

● हे अनुदान ‘सनराइज’ या नवीन सौर प्रकल्पाचा भाग आहे. ‘सनराइज’ अंतर्गत प्रिंटेड फोटोव्होल्टाइक सेल्स आणि नवीन उत्पादन प्रक्रिया विकसित करून भारतात सौर-उत्पादनांची निर्मिती केल्या जात आहे. यासाठी स्वानसी विद्यापीठाच्या ‘SPECIFIC’ प्रकल्पाचा आधार घेतला जाईल.

—————————————————

भारत सरकारचे 2022 सालापर्यंत 60 GW पवन ऊर्जा क्षमतेचे उद्दिष्ट

● भारत सरकारने 2022 सालापर्यंत देशात 60 गिगावॅट (GW) पवन ऊर्जा क्षमता प्रस्थापित करण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य निश्चित केले आहे.

● सध्या देशात प्रस्थापित एकूण पवन ऊर्जा क्षमता 32.5 GW पेक्षा अधिक आहे आणि निश्चित केलेले लक्ष्य गाठण्यासाठी सुमारे 5500 मेगावॅट (MW) पवन ऊर्जा क्षमतेची जोडणी आवश्यक आहे.

—————————————————
लोकसभेत राज्य बॅंका (निरसन व दुरुस्ती) विधेयक मंजूर

● संसदेच्या लोकसभेने राज्य बॅंका (निरसन व दुरुस्ती) विधेयक 2017 ला मान्यता दिली आहे.

● हे विधेयक लागू केल्यानंतर SBI (सहाय्यक बॅंका) कायदा 1959, स्टेट बँक ऑफ हैदराबाद कायदा 1956 यांना रद्द करणार आणि SBI च्या पाच सहाय्यक बँकांच्या SBI मध्ये विलीनीकरणासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा 1955 मध्ये बदल केले जाणार.

● भारताच्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये स्टेट बँक ऑफ बिकानेर व जयपूर (SBBJ), स्टेट बँक ऑफ हैदराबाद (SBH), स्टेट बँक ऑफ मैसूर (SBM), स्टेट बँक ऑफ पटियाला (SBP) आणि स्टेट बँक ऑफ त्रावणकोर (SBT) या SBI च्या सहाय्यक बँका तसेच भारतीय महिला बँक (BMB) या बँकाच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे SBI ला जागतिक स्तरावर शीर्ष 50 बँकांच्या यादीत 45 वे स्थान मिळण्यास मदत होणार.

—————————————————
भारत आणि अमेरिका वैश्विक उद्योजकता शिखर परिषदेचे आयोजन करणार

● 28-30 नोव्हेंबर 2017 या काळात हैदराबादमध्ये होणार्‍या ‘वैश्विक उद्योजकता शिखर परिषद (Global Entrepreneurship Summit) 2017’ चे सहआयोजन भारत आणि अमेरिका करणार आहेत.

● जगभरातून आलेल्या प्रेरणादायक उद्योजकांना आणि गुंतवणूकदारांना गुंतवणूक, भागीदारी आणि सहकार्य अशा सहा क्षेत्रात नवीन संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने जागतिक स्वरूपाचे दर्शन घडविणे हे GES चे उद्दिष्ट आहे. परिषदेदरम्यान कार्यशाळा, प्रदर्शने, चर्चासत्रे, स्पर्धा, सल्लात्मक चर्चा आयोजित केल्या जातात.

—————————————————
लोकसभेत ‘वेतन संहिता विधेयक 2017’ मांडले गेले

● केंद्र सरकारने लोकसभेत चर्चेसाठी ‘वेतन संहिता (Code on Wages) विधेयक 2017’ मांडले आहे.

● हे विधेयक 40 कोटी असंघटित क्षेत्रातील कामगारांना लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने “सार्वत्रिक किमान वेतन” निश्चित करण्यास केंद्र सरकारला सशक्त करणार.

● हे विधेयक वेतन देय करणे कायदा 1936, किमान वेतन कायदा 1948, लाभांश देय करणे कायदा 1965 आणि समान मोबदला कायदा 1976 या चार कायद्यांना एकत्र करणार.
—————————————————

बचत खात्याच्या ग्राहकांसाठी ICICI बँकेचे झटपट क्रेडिट कार्ड

● ICICI बँक या भारतातील सर्वात मोठ्या खासगी बँकेने प्रथमच बचत खात्याच्या डिजिटलरीत्या उपलब्ध असलेल्या ग्राहकांसाठी ‘झटपट क्रेडिट कार्ड’ सादर केले आहे.

● बँक ग्राहकांना तात्काळ क्रेडिट कार्ड नंबर प्रदान करणार, ज्याच्यामधून प्रत्यक्ष कार्डची वाट न पाहता ग्राहक ऑनलाइन शॉपिंग सुरू करू शकतात. ग्राहकांसाठी पतमर्यादा 4 लाखांपर्यंत निश्चित केली आहे.

● एप्रिल ते जून या तिमाहीत ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड व्यवहारात आकडा आणि मूल्य यामध्ये अनुक्रमे 49% आणि 52% इतकी वाढ झाली. त्यांच्या क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक कर्ज यामध्ये 39% इतकी वाढ झाली. याला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ही सेवा सुरू केली आहे.
—————————————————
जूनमध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकात 0.1% ने घट

● औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) यात मोजण्यात येणार्‍या भारताच्या उत्पादनात जून 2017 मध्ये 0.1% ने घट झाली आहे. जून 2013 पासून ही घट पहिल्यांदाच झाली आहे.

● विभिन्न अशा 22 उद्योगांपैकी आठने वाढ दर्शवली आहे. औषधे आणि फर्निचर उद्योगांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आणि त्यानंतर तंबाखू आणि लेदर उत्पादने उद्योगात वाढ दिसून आली आहे.

● भांडवली वस्तू उत्पादन जूनमध्ये 6.8% पर्यंत घसरले आहे. तसेच उत्पादन क्षेत्रात -0.4% ची नकारात्मक वाढ, खनिकर्म उत्पादनात 0.4% ची वाढ, वीज निर्मितीत 2.1% पर्यंत वाढ आणि ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादन क्षेत्रात 2.1% ने घट झाली आहे.

—————————————————
SEBI ने सिक्युरिटीजच्या निधिपालाच्या ऑनलाइन नोंदणी सुरू केली

● सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने व्यवसाय सोयीस्कर करण्यासाठी सिक्युरिटीजच्या निधिपालाच्या (custodians) ऑनलाइन नोंदणीसाठी एक यंत्रणा सुरू केली आहे.

● या यंत्रणेमधून निधिपालाची नोंदणी आणि त्यांना इतर नियामकविषयक दस्तऐवज सादर करण्यास मदत होणार आहे.

● सिक्युरिटीजच्या निधिपालांना ‘नियुक्त डिपॉझिटरी भागीदार (Designated Depository Participant -DDP)’ म्हणून मान्यता मिळवणे आवश्यक असते आणि त्यासाठी SEBI कडे अर्ज करावा लागतो.

● निधिपाल समभाग आणि इतर मालमत्ता भौतिक किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरुपात प्राप्त करतात.

—————————————————
आशियाई शॉटगन स्पर्धेत नेमबाज माहेश्वरी हिला कांस्यपदक

● भारताची नेमबाज माहेश्वरी चौहान हिने अस्ताना, कझाकस्तान येथे आयोजित ‘एशियन शॉटगन चॅम्पियनशिप 2017’ स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.

● यासोबतच, माहेश्वरी चौहान ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला महिलांच्या स्कीट प्रकारात वैयक्तिक पदक मिळवून देणारी पहिली महिला बनली आहे. स्पर्धेच्या याच प्रकारात चीनच्या मेंग वेईने सुवर्णपदक आणि थायलंडच्या सुतिया जीवचालोयम्मितने रौप्य जिंकले. याशिवाय माहेश्वरी, रश्मी राठोड आणि सानिया शेख या चमूने सांघिक रौप्यपदक जिंकलेले आहे.

● आशियाई शॉटगन स्पर्धेचे आयोजन एशियन शुटिंग कॉन्फेडरेशनकडून केली जाते. या स्पर्धेला 1967 साली सुरूवात झाली आणि दर चार वर्षांनी याचे आयोजन केले जाते.
—————————————————

दवेंदर कांग : IAAF स्पर्धेच्या भालाफेक अंतिमसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय खेळाडू

● लंडन येथे आयोजित ‘IAAF वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2017’ मध्ये दवेंदर सिंग कांग हा भालाफेक अंतिमसाठी पात्र ठरला आहे. अंतिमसाठी 12 खेळाडूंची निवड झाली आहे.

● दवेंदर सिंग कांग हा IAAF च्या जागतिक स्पर्धेत भालाफेक क्रीडाप्रकारात अंतिमसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

● वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप ही इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशन (IAAF) द्वारा आयोजित केली जाणारी द्वैवार्षिक स्पर्धा आहे. पहिल्यांदा 1983 साली खेळली गेली.

चालू घडामोडी (११ ऑगस्ट २०१७)

व्यंकया नायडू यांनी घेतली उपराष्ट्रपती पदाची शपथ

● व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपती पदाची ११ ऑगस्ट २०१७ ला शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपती पदाची शपथ दिली.

● व्यंकय्या नायडूंनी आंध्र प्रदेशच्या नेल्लूरपासून नवी दिल्ली असा मोठा राजकीय प्रवास केला असून देशाच्या दुसऱ्या मोठ्या घटनात्मक पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली.

● भारताचे तेरावे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ घेतली .

● उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मतदानासाठी १४ खासदार अनुपस्थित होते. त्यामुळे ७८५ पैकी ७७१ खासदारांनीच मतदान केले. एनडीएचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांना ५१६ मते मिळाली.

——————————————————
विराज डबरे याला युवा कबड्डीपटूला राष्ट्रीय पुरस्कार

● युवकांच्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत नेपाळच्या संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावण्यात या खेळाडूचा मोठा वाटा होता. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला राष्ट्रीय कबड्डीपटूचा किताब दिला गेला.

● बदलापूरजवळील जांभळे गावात राहणार्‍या विराज डबरे याला लहानपणापासून कबड्डीची आवड होती. ही आवड पूर्ण करत असताना त्याने गावातील संघातूनच सरावाला सुरुवात केली, जांभळे हे गाव कबड्डीपटूंचे गाव म्हणून ओळखले जाते. त्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या वरिष्ठ खेळाडूंकडून त्याला चांगले मार्गदर्शन मिळाले.

● विराजच्या खेळाची दखल घेत त्याची राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली, त्यानंतर, लागलीच २१ वर्षांखालील भारतीय संघातही त्याची निवड निश्चित झाली, तसेच त्याची चमकदार कामगिरी पाहून १९ वर्षांखालील युवकांच्या महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली, पुढे त्याने या संघाचे कर्णधारपदही भूषवले.

● नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत (रूरल ऑलिम्पिक) २१ वर्षांखालील संघाचे नेतृत्व करत असताना विराजच्या संघाने नेपाळचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
——————————————————
परिवहन विभागातर्फे ‘आरटीओ महाराष्ट्र’ अ‍ॅप

● राज्यातील वाहन चालकांना तक्रार करणे सोयीचे व्हावे, यासाठी परिवहन विभागाने ‘आरटीओ महाराष्ट्र’ हे नवीन अ‍ॅप चालकांच्या सेवेत दाखल केले. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याची माहिती देण्यासाठी अ‍ॅपमध्ये विशेष (एसओएस) बटणाची व्यवस्था आहे.

● विविध कामांसाठी नागरिक आरटीओमध्ये गर्दी करतात. त्यामुळे कार्यालयांबाहेर मोठ्या रांगा लागतात. परिणामी, रांगेपासून सुटका मिळवण्यासाठी ‘आरटीओ महाराष्ट्र’ हे अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे.

● अ‍ॅपमध्ये राज्यातील रिक्षा-टॅक्सी व अन्य वाहनांविरुद्ध तक्रार करण्यासाठी स्वतंत्र प्रणाली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करताना आपत्कालीन परिस्थितीत नातेवाइकांना माहिती देण्यासाठी अथवा त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी ‘एसओएस’ क्लिक ही सेवादेखील पुरवण्यात आली आहे.

● तसेच अ‍ॅपमुळे रिक्षा-टॅक्सी आणि खासगी वाहतूकदारांकडून होणार्‍या प्रवासी लुबाडणुकीच्या घटनांना आळा बसेल, असा विश्वास वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

——————————————————
पाकिस्तानच्या ‘मदर तेरेसा’ डॉ.रुथ फाऊ यांचे निधन

● पाकिस्तानमधून कुष्ठरोग दूर करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या जर्मन डॉक्‍टर रुथ फाऊ (वय 85 वर्षे) यांचे निधन झाले. पाकिस्तानच्या मदर तेरेसा म्हणून त्या प्रसिद्ध होत्या.

● डॉ. फाऊ या 1960 मध्ये सर्वप्रथम पाकिस्तानमध्ये आल्या होत्या. येथील कुष्ठरोग्यांची हलाखीची स्थिती पाहून त्या हेलावून गेल्या आणि त्यांनी कुष्ठरोग्यांवर उपचार करण्यासाठी कायमस्वरूपी पाकिस्तानमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता.

● नन असलेल्या डॉ. फाऊ यांनी 1962 मध्ये कराचीमध्ये मारी ऍडलेड लेप्रसी सेंटर स्थापन केले आणि नंतरच्या काळात या संस्थेचा पाकिस्तानात सर्वत्र विस्तार केला. त्यांनी आतापर्यंत पन्नास हजारांहून अधिक कुटुंबांवर उपचार केले आहेत.

● डॉ. फाऊ यांच्या अथक प्रयत्नांमुळेच कुष्ठरोगापासून मुक्त होणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने 1996 मध्ये जाहीर केले.

● डॉ. फाऊ यांनी सोसायटी ऑफ डॉटर्स ऑफ हार्ट ऑफ मेरी या संस्थेत प्रवेश केल्यानंतर त्यांना भारतात काम करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, व्हिसासंबंधी अडचण आल्याने त्या काही काळासाठी मध्येच कराचीत उतरल्या होत्या. येथील कुष्ठरोग्यांशी बोलताना त्यांना परिस्थितीची जाणीव झाली आणि त्या कायमस्वरूपी येथेच थांबल्या.

● तसेच त्यांना पाकिस्तानचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला हिलाल ए इम्तियाज 1979 मध्ये आणि हिलाल ए पाकिस्तान हा पुरस्कार 1989 मध्ये प्राप्त झाला होता. त्यांना 2015 मध्ये स्टॉफलर मेडलही प्रदान करण्यात आले होते.

चालू घडामोडी (९/१० ऑगस्ट २०१७)

भारतासह ८० देशांना कतारमध्ये व्हिसा-फ्री प्रवेश

● भारतासह युरोपातील डझनभर देश, लेबनन, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि यूएसमधील नागरिकांना कतार देशात ऑन अरायव्हल टुरिस्ट व्हिसा मिळणार असून ३३ देशातील नागरिकांना १८० दिवस (सहा महिने) तर उर्वरित ४७ देशातील नागरिकांना ३० दिवसांपर्यंत कतारमध्ये वास्तव्य करता येईल.

● शेजारी आखाती राष्ट्रांनी टाकलेल्या दोन महिन्यांच्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर कतार सरकारने हवाई वाहतूक आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

● सुरक्षा आणि आर्थिक निकष, त्याचप्रमाणे देशाच्या क्रयशक्तीवरुन ही विभागणी करण्यात आली असून भारतासह तब्बल ८० देशातील नागरिकांना कतारने व्हिसा-फ्री प्रवेश जाहीर केला आहे.

● सौदी अरेबिया, इजिप्त, बहारेन आणि यूएईने ५ जून रोजी कतारवर बहिष्कार लादला होता. इराणशी जवळीक साधल्याचा आणि दहशतवादाला पाठिंबा दिल्याचा आरोप करत कतारशी या देशांनी वाहतुकीचे संबंध तोडले.

—————————————————
दीपक मिश्रा भारताचे नवे सरन्यायाधीश होणार

● सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा भारताचे नवे सरन्यायाधीश होणार आहेत. कायदा व न्याय मंत्रालयाने अधिकृतरीत्या ही घोषणा केली. विद्यमान सरन्यायाधीश जे. एस. खेहर हे 27 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर दीपक मिश्रा हे त्यांची जागा घेतील.

● दीपक मिश्रा यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना याच वर्षी मे महिन्यांत फाशीची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणानंतर ते प्रकाशझोतात आले होते.

● तसेच 63 वर्षीय दीपक मिश्रा यांची सर्वसामान्यांमध्ये ‘प्रो सिटीझन जज’ अशी ओळख आहे.

—————————————————
विश्व पोलीस फायर क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

● अमेरिकेत सुरू असलेल्या विश्व पोलीस व फायर क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला दोन सुवर्ण, एक रौप्यपदक मिळाले. त्यात कोल्हापूरच्या जयश्री बोरगी, मुंबईची सोनिया मोकल यांनी अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्ण, तर मुंबईच्याच रवींद्र जगताप याने कुस्तीत रौप्यपदक पटकाविले.

● लॉस एंजिल्स येथे सुरू असलेल्या स्पर्धेत जयश्री बोरगी हिने 5 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. त्यापाठोपाठ सोनिया मोकल हिने 800 मीटर धावणे स्पर्धेत देशाला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले.

● तसेच 71 किलोगटात ग्रीको रोमन प्रकारात मुंबईच्या रवींद्र जगतापने रौप्यपदक मिळवून दिले.

● सन 2015 मध्ये अमेरिकेतील फेअर फॅक्स राज्यातील व्हर्जिनिया येथे झालेल्या स्पर्धेत जयश्री बोरगी हिने 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. त्यासह तिने भारतीय पोलीस दलातील धावपटू रहमान याने नोंदविलेला 11.31.29 ही विक्रमी वेळही मोडत 11.03.21 अशी वेळ नोंदवत 5000 मीटर व 10000 मीटर धावण्यात सुवर्ण, तर 5000 मीटर चालण्यात रौप्यपदकाची कमाई केली होती.

● अशा प्रकारची कामगिरी करणारी ती पोलीस दलातील एकमेव महिला धावपटू ठरली आहे.

—————————————————
‘भारत छोडो’ चळवळीला ७५ वर्ष पूर्ण

● ९ ऑगस्ट हा भारताच्या स्वातंत्र्यामधील प्रवासाचा एक अतिशय ऐतिहासिक दिवस आहे. ९ ऑगस्ट हा क्रांतिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिवशी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘चले जाव’ चा नारा लावण्यात आला.

● भारत छोडो चळवळ (Quit India Movement), ज्याला ‘भारत ऑगस्ट चळवळ’ म्हणून देखील ओळखतात, ही अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुंबई सत्रात ८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू करण्यात आलेली नागरी असहकार चळवळ होती.

● समितीचे नेतृत्व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केले होते. या दिवशी महात्मा गांधी यांनी मुंबई मधील गोवालिया टॅंक मैदानावरच्या त्यांच्या भारत छोडो भाषणात ‘करो या मरो (Do or Die)’ चा नारा दिला.

● भारत छोडो आंदोलनातील आक्रमक स्वरूप मिळण्यास प्राथमिक घटक म्हणजे सर स्टाफोर्ड क्रिप्सच्या परती विरोधात बापूंचा निषेध हा होता.

—————————————————

गृहमंत्रालयाने संपूर्ण आसामला AFSPA अंतर्गत ‘अस्थिर’ क्षेत्र घोषित केले

● गृहमंत्रालयाने संपूर्ण आसाम राज्याला सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (AFSPA) अंतर्गत एक महिन्यासाठी ‘अस्थिर’ क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
● याशिवाय, आसामलगतचा मेघालयाचा सीमावर्ती भाग आणि अरुणाचल प्रदेशातील तीन जिल्ह्यांनादेखील ३ ऑगस्ट २०१७ पासून दोन महिन्यांसाठी AFSPA अंतर्गत ‘अस्थिर’ क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

● ULFA, NDFB आणि इतर बंडखोर गटांनी चालविलेल्या विविध हिंसक कारवायांनंतर हा आदेश काढला गेला.

—————————————————

 अभिनव बिंद्रा लिखित ‘ए शॉट अॅट हिस्ट्री’ पुस्तकाचे अनावरण

● ‘ए शॉट अॅट हिस्ट्री : माय ऑबसीव्ह जर्नी टू ऑलिंपिक गोल्ड’ या शीर्षकाच्या पुस्तकाचे अनावरण झाले आहे. या पुस्तकाचे लेखक अभिनव बिंद्रा आणि रोहित ब्रिजनाथ हे आहेत.

● भारताला वैयक्तिक स्वरुपात पहिले सुवर्णपदक मिळवून देणार्‍या अभिनव बिंद्रा या नेमबाजाचे २०१२ लंडन ऑलिंपिकमधील अनुभव या पुस्तकात लिहिलेले आहेत

—————————————————

एशियन ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेत भारताला २ रौप्य आणि ६ कांस्यपदके

● फिलीपीन्सच्या प्यर्टो प्रिंसेसा येथे खेळल्या गेलेल्या एशियन ज्युनियर बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०१७ स्पर्धेच्या अंती भारताने २ रौप्य आणि ६ कांस्यपदकांची कमाई केली.

रौप्यपदक विजेते : सतेंदर रावत (८०+ किलो) आणि मोहित खताना (८० किलो)

कांस्यपदक विजेते : अंकित नरवाल (५७ किलो), भावेश कट्टामणी (५२ किलो), सिद्धार्थ मलिक (४८ किलो), विनीत दहिया (७५ किलो), अक्षय सिवाच (६० किलो) आणि अमन शेहरावत (७० किलो)

—————————————————

ICC कसोटी क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा प्रथम स्थानी

● ICC कसोटी क्रिकेट क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारतीय गोलंदाज रवींद्र जडेजाने प्रथम स्थान प्राप्त केले आहे. जडेजानंतर बांग्लादेशच्या साकिब उल हसन याचा क्रमांक लागतो.

● याशिवाय फलंदाजच्या यादीत स्टीव्ह स्मिथ आणि ज्योए रूट यांना अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान तसेच चेतेश्वर पुजाराला तिसरे आणि विराट कोहलीला पाचवे स्थान मिळाले आहे.

● गोलंदाजांच्या यादीत रवींद्र जडेजा, जिमी अँडरसन आणि रविचंद्रन अश्विन यांचा प्रथम तीनमध्ये समावेश आहे

—————————————————

विश्व बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडू टॉप टेनमध्ये

● ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि जगात आठव्या क्रमांकाचा खेळाडू किदम्बी श्रीकांत यांना २१ ऑगस्टपासून ग्लास्गो येथे होणार्‍या बीडब्ल्यूएफ विश्व बॅडमिंटन स्पर्धेसाठी अनुक्रमे चौथे आणि आठवे मानांकन प्राप्त झाले आहे.

● विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेची २०१३ आणि २०१४ ची कांस्यपदक विजेती सिंधू हिला ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिन मारिन हिच्यानंतर स्थान देण्यात आले आहे.

● २०१५ मध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक मिळवणार्‍या आणि जगातील १६ व्या क्रमांकाच्या भारताच्या सायना नेहवाल हिला १२ वे मानांकन प्राप्त झाले आहे.

● चीन तायपेची जगातील नंबर वन खेळाडू ताइ जू यिंग ही स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे जपानच्या अकाने यामागुची आणि कोरियाची सुंग जी ह्युन यांना अनुक्रमे पहिले आणि दुसरे मानांकन प्राप्त झाले आहे.

● इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सलग विजेतेपद पटकाविणार्‍या आठव्या मानांकित श्रीकांतचा मानांकनात दोन वेळा ऑलिम्पिक विजेत्या चीनच्या लिन डेननंतर क्रमांक लागतो. तसेच इतर भारतीयांमध्ये अजय जयराम आणि बी.साई प्रणीत यांना अनुक्रमे १३ व १५ वे मानांकन प्राप्त झाले आहे.

 

चालू घडामोडी (७ ऑगस्ट २०१७)

बढत्यांमधील आरक्षण रद्द
● सरकारी कर्मचाऱ्यांना बढत्यांमध्ये सरसकट ३३ टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा १७ वर्षांपूर्वीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने अवैध ठरवून रद्दबातल केला.

● राज्य सरकारने याबाबतचा निर्णय मे २००४ मध्ये घेतला होता. त्यानुसार भटके-विमुक्त, विशेष मागासवर्गीय आदी प्रवर्गात या बढत्या दिल्या जातात, परंतु न्यायालयाने बढत्यांमध्ये आरक्षणाचा निर्णय अवैध ठरवला. तर यापूर्वीच्या अशा बढत्यांमध्येही १२ आठवड्यांत आवश्‍यकतेनुसार बदल करण्याचे आदेशही दिले.

● ‘मॅट’नेही यापूर्वी राज्य सरकारचे संबंधित परिपत्रक अवैध ठरवले होते. या निर्णयाविरोधात कर्मचारी संघटनांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या.

● राज्य सरकार या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. त्यासाठी निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी प्रमुख सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी केल्यानंतर न्यायालयाने आपल्या आदेशाला तीन महिन्यांची स्थगिती दिली

—————————————————
अर्थतज्ज्ञ राजीव कुमार निती आयोगाचे नवे उपाध्यक्ष

● निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अर्थतज्ज्ञ डॉ. राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. अरविंद पानगढिया यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारने राजीव कुमार यांना उपाध्यक्षपदावर संधी दिली आहे. तर दिल्लीतील एम्समधील बालरोगतज्ज्ञ डॉ. विनोद पॉल यांची निती आयोगाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

● १ ऑगस्ट रोजी पानगढिया यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. ३१ ऑगस्ट रोजी ते आयोगातील पदभार सोडतील.

● डॉ. कुमार हे सध्या ‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’ येथे कार्यरत आहेत. अर्थविषयक पुस्तकांचे लिखाणही त्यांनी केले आहे. याशिवाय ‘फिक्की’चे ते माजी महासचिवदेखील आहेत.

● लखनौ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले असून २००६ ते २००८ या कालावधीत ते केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्यदेखील होते. एशियन डेव्हलपमेंट बँक, अर्थ आणि उद्योग मंत्रालयातील कामाचा त्यांना दांडगा अनुभव आहे.

——————————————————

पॅरिस हवामान करारातून अमेरिकेची अधिकृत माघार

● पॅरिस येथे २०१५ मध्ये मान्य करण्यात आलेल्या हवामान करारातून माघार घेत असल्याचा इरादा अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांना कळवला आहे.

● पॅरिस करारात कायम राहण्याबाबत ट्रम्प यांनी अनेक जागतिक नेत्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. अमेरिकेने पॅरिस करारातून माघार घेतली हे खरे असले तरी ४ नोव्हेंबर २०२० पर्यंत अमेरिकेला यातून पूर्णपणे माघार घेता येणार नाही.

● तापमान वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या कार्बन उत्सर्जनात चीननंतर अमेरिकेचा जगात दुसरा क्रमांक आहे. ट्रम्प यांनी पॅरिस हवामान करारातून माघार घेण्याची घोषणा केली तेव्हा त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला होता

 

चालू घडामोडी (५ ऑगस्ट २०१७)

व्यंकय्या नायडू देशाचे नवे उपराष्ट्रपती

● लोकसभा, राज्यसभेत आज उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान पार पडले. सकाळी १० ते ५ पर्यंत मतदान प्रक्रिया झाली. यानंतर मतमोजणीला सुद्धा सुरुवात करण्यात आली. यात एनडीएचे व्यंकय्या नायडू यांना ५१६ मतांनी विजयी घोषित करण्यात आले आहे.

● राष्ट्रपतिपदापाठोपाठ उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बाजी मारली आहे. एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी मोठया मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. पहिल्या फेरीपासून व्यंकय्या नायडू आघाडीवर होते.

● एकूण 771 लोकप्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला. व्यंकय्या नायडू यांना 516 तर, विरोधी पक्षांचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांना 244 मते मिळाली. 11 मते बाद गेली.

● ११ ऑगस्टरोजी नायडू यांचा शपथविधी होणार आहे. विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ १ ऑगस्टला संपला आहे.
———————————————————

अभिनेता अक्षय कुमार उत्तर प्रदेशचा स्वच्छतादूत
● अभिनेता अक्षय कुमारची ‘टॉयलेट एक प्रेम कहाणी’ या चित्रपटाची चर्चा प्रदर्शनापूर्वीच सुरू झाली आहे, हा चित्रपटाची कथा स्वच्छतेवर विशेषतः घरात शौचालय असण्यावर आधारित आहे.

● उघड्यावर शौचाला जाण्याला प्रतिबंध करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने अनेक योजना आखल्या आहेत, यासाठी त्यांनी अक्षय कुमारची ‘ब्रॅंड ऍबेसिडर’ म्हणून नियुक्ती केली आहे.

● लखनौ येथे झालेल्या स्वच्छता मोहिमेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनीच याबाबत घोषणा केली.
———————————————————
तीन भारतीय-अमेरिकींची डोनाल्ड ट्रम्प प्रशासनात नियुक्ती : सिनेटन

● अमेरिकन सरकारच्या तीन महत्वाच्या जागांवर तीन भारतीय-अमेरिकनांना नियुक्त करण्याचा सिनेटने एकमुखाने निर्णय घेतला, यातील एक नियुक्ती ही डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील बौद्धिक संपदेवर आहे.

● ट्रम्प प्रशासनात नील चॅटर्जी हे फेडरल एनर्जी रेग्युलेटरी कमीशनचे सदस्य बनले असून विशाल अमीन हे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी एन्फोरसमेंट कोआॅर्डिनेटर झाले आहेत.

● १९८६ पासून विदेश सेवेत अधिकारी असून निक्की हॅलेनंतर ते राजदूतपदाची संधी मिळालेले दुसरे भारतीय-अमेरिकन ठरले आहेत, हॅले या साऊथ कॅरोलिनामध्ये दोन वेळा गव्हर्नर होत्या व सध्या त्या संयुक्त राष्ट्रांत अमेरिकेच्या राजदूत आहेत.

● अमेरिका आणि भारत यांच्यात बौद्धिक संपदेवरून तीव्र स्वरुपाचे मतभेद असून कृष्णा अर्स यांना पेरुच्या राजदुताची जबाबदारी दिली गेली आहे.

———————————————————
‘मिशन वन मिलियन’ मोहिमेची सुरुवात

● फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेनिमित्त ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ फुटबॉल क्रांती निर्माण करण्यात येणार आहे. याबाबत तावडे यांनी माहिती दिली.

● ऑक्टोबर महिन्यात होत असलेल्या १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी यजमान भारत सज्ज असून, या स्पर्धेनिमित्त ८ सप्टेंबरला महाराष्ट्रात सुमारे १० लाख शालेय विद्यार्थी फुटबॉल खेळतील.

● या वेळी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे (विफा) उपाध्यक्ष विश्वजीत कदम, विफाचे उपाध्यक्ष छत्रपती मालोजी राजे भोसले यांचीही उपस्थिती होती.

● ‘मोहीम ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ अंतर्गत राज्यातील ३० हजारांहून अधिक शाळांमध्ये सुमारे १ लाख फुटबॉलचे वाटप करण्यात आले आहे, तसेच शालेय-महाविद्यालयीन स्तरीय, विद्यापीठस्तरीय विशेष फुटबॉल स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार आहे.
———————————————————
भारतातील तब्बल ४०० भाषा नष्ट होण्याची भीती; इंग्रजीचा धोका मात्र नाही

● भारतातील ७८० भाषांपैकी ४०० येत्या ५० वर्षांत नामशेष होण्याची शक्यता आहे, असे ज्येष्ठ भाषाअभ्यासक गणेश एन. देवी यांनी म्हटले.

● इंग्रजी भाषेमुळे भारतातील हिंदी, मराठी, बांगला आणि तेलगू या मुख्य भाषांना धोका नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले असून पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे आॅफ इंडियाच्या (पीएसएआय) ११ खंडांच्या गुरुवारी येथे झालेल्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

● जगातील सहा हजार भाषांपैकी चार हजार भाषा येत्या ५० वर्षांत नष्ट होण्याच्या स्थितीत आहेत, या चार हजार भाषांपैकी ४०० भारतातील आहेत.

● इंग्रजीचे प्रभुत्व हिंदी, बांगला, मराठी, तेलगू, कन्नड, मल्याळम, गुजराती व पंजाबी या मोठ्या भाषांना नष्ट करून टाकेल, हा समज निराधार आहे, कारण जगातील पहिल्या तीस भाषांमध्ये त्या आहेत, भारतातील ७८० भाषांपैकी ४०० येत्या ५० वर्षांत नामशेष होण्याची शक्यता आहे, असे गणेश एन. देवी यांनी म्हटले.