दिव्यांगांसाठी विशेष विद्यालय स्थापन करणार

⦿ राज्यातील दिव्यांगाना सोईसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

⦿ दिव्यांगांना संगणकीय अपंगत्वाचे प्रमाणपत्र त्वरित मिळावे, यासाठी राज्यात मिशन ‘झीरो पेंडन्सी’ अभियान सुरू करणार आहे, तसेच मूकबधिर विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी विशेष महाविद्यालय स्थापन करण्याचा विचार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.

⦿ अपंग कल्याण आयुक्तालय, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, यशदा यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित ‘आत्ममग्नता जाणीव जागृती कार्यशाळे’चे उद्घाटन बडोले यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते.

पुण्याचा अभिषेक डोग्रा ‘नीट’मध्ये राज्यात पहिला

⦿ वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झालेल्या ‘नीट’च्या निकालात पुण्यातील अभिषेक डोग्रा हा राज्यात पहिला, तर पुण्यातील रुचा हेर्लेकर ही देशात ३३ वे स्थान मिळवून राज्यात दुसरी आली आहे.

⦿  देशपातळीवर पंजाबच्या नवदीप सिंगने अव्वल क्रमांक पटकावला. त्याने ७००पैकी ६९७ गुण मिळविले.

⦿ मध्य प्रदेशच्या अर्चित गुप्ताने दुसरा आणि मनीष मुलचंदानीने तिसरा क्रमांक मिळविला.

⦿ देशातील अंदाजे ११ लाख ३८ हजार विद्यार्थ्यांनी ‘नीट २०१७’ची परीक्षा दिली.

⦿ भारतातील सुमारे ४७० वैद्यकीय महाविद्यालयांमधील ६५ हजार १७० एमबीबीएस जागा आणि २५ हजार ७३० दंतवैद्यक (बीडीएस) जागांसाठी प्रवेशप्रक्रिया याच परीक्षेतील गुणांच्या आधारे होईल.

⦿ नीट परीक्षा ही ७२० गुणांची असून, त्यापैकी ३६० गुण हे जीवशास्त्र व प्रत्येकी १८० गुण हे भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांसाठी आहेत.

⦿ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या प्रवेशासाठी ४२५ पेक्षा अधिक गुणांची गरज असते.

रोमानिआच्या अभ्यासक्रमात रामायण, महाभारताचा समावेश

भारत आणि रोमानिआ देशांत अत्यंत चांगले व मजबूत संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये सातत्याने सांस्कृतिक देवाण-घेवाण होत असते. त्याचाच प्रत्यय आता पुन्हा एकदा आला आहे. रोमानिआच्या अकरावीच्या अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारतातील काही भागांचा समावेश करण्यात आल्याची माहिती रोमानिआचे राजदूत राडू ओक्टावियन डोबरे यांनी याची माहिती दिली.

  • दोन्ही देशांमध्ये सुरूवातीपासूनच चांगले संबंध असून गेल्या काही वर्षांपासून ते आणखी मजबूत झाले आहेत. दोन्ही देशातील नागरिकांमध्ये पूर्वीपेक्षा संपर्क चांगला वाढला आहे. दोन्ही देशांदरम्यान अत्यंत निकटचे सांस्कृतिक संबंध आहेत.
  • रोमानिआत दोन बॉलिवूड चॅनेल्स २४ तास प्रसारित होतात याची माहितीही त्यांनी दिली.
  • दोन्ही देशातील संबंध आणखी निकट आणण्यासाठी पर्यटनाचे मोठे स्थान असून भारताच्या पर्यटन नकाशावर रोमानिआला पाहायचे आहे.