ताशी ६०० कि.मी. वेगाने धावणारी एससी मॅग्लेव जगातील सर्वात वेगवान रेल्वे

⦿ जपानच्या या रेल्वेचे नाव आहे एससी मॅग्लेव. ताशी ६०० कि.मी. वेगाने धावणारी हे रेल्वे डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच समोरून निघून जाते.

⦿ सर्वात वेगाने धावण्याचे वर्ल्ड रेकॉर्ड या रेल्वेच्या नावावर आहे. २०१५ मध्ये या रेल्वेने ६०३ कि.मी.चे अंतर एका तासात कापत नवा विक्रम केला होता.

⦿  त्यावेळी ही रेल्वे ११ सेकंदांत १.८ कि.मी.चे अंतर कापत होती. ही रेल्वे मॅग्नेटिक सिस्टीमवर आधारित आहे.

⦿ अशा प्रोजेक्टसाठी खर्चही खूप येतो. मॅग्नेटिक लेविएटेशनमध्ये (चुंंबकीय उत्क्रांती) रेल्वे रूळ आणि चाके यात चुंबकीय दबाव असतो.

⦿ जेव्हा रेल्वे धावत असते तेव्हा ती रुळाच्या १ ते ६ इंच वरून जात असते. अगदी वेगात असणाऱ्या या रेल्वेला जवळून कॅमेऱ्यात टिपणेही अवघड आहे.

‘जीसॅट-१७’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

⦿ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने २९ जूनला अंतराळ मोहिमेत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अत्याधुनिक संचार उपग्रह जीसॅट १७ चे फ्रेंच गयानामधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ‘एरियन- ५’ या प्रक्षेपकाच्या माध्यमातून जीसॅट १७ हे अंतराळात झेपावले.

⦿ जीसॅट १७ हा अत्याधुनिक दूरसंचार उपग्रह आहे. या उपग्रहाचे वजन ३,४७७ किलो असून या उपग्रहामध्ये दूरसंचार सेवेसाठी नॉर्मल सी बँड, एक्स्टेंडेड सी बँड आणि सी बँड आहे. याशिवाय हवामानाविषयीची माहिती आणि शोधमोहीम आणि मदतकार्य करण्यासाठी या उपग्रहाचा वापर करता येणार आहे. यासाठी उपग्रहामध्ये उपकरणेही लावण्यात आली आहे.

⦿ फ्रेंच प्रक्षेपक एरियन-५ वीए २३८ च्या माध्यमातून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.

⦿ जून महिन्याच्या सुरुवातीलाच इस्रोने जीएसएलव्ही-मार्क ३ च्या साह्याने जीसॅट-१९ हे उपग्रह अंतराळात पाठवले होते. या यशस्वी प्रक्षेपणानंतर गेल्या आठवड्यात इस्रोने ३१ नॅनो उपग्रह अंतराळात पाठवले होते. यातील २९ उपग्रह हे १४ देशांचे होते यापाठोपाठ जीसॅट १७चेही यशस्वी प्रक्षेपण झाले आहे.

 

इस्रोकडून एकावेळी तब्बल 31 उपग्रह अवकाशात प्रक्षेपित

⦿  एकापेक्षा अधिक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यासंदर्भातील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करत इस्रोने  २३ जूनला “पीएसएलव्ही सी 38′ च्या सहाय्याने तब्बल 31 उपग्रह अवकाशात सोडले. श्रीहरीकोटा येथील “सतीश धवन अवकाश केंद्रा’वरुन हे प्रक्षेपण करण्यात आले. पीएसएलव्हीचे हे तब्बल 40 वे उड्डाण आहे.

⦿ प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रहांपैकी कार्टोसॅट 2 हा उपग्रह सर्वांत महत्त्वाचा आहे.

⦿ सर्व उपग्रह अवकाशात सोडण्यात आल्यानंतर पी एस 4 या वाहनास तब्बल 10 वेळा अवकाश कक्षा पूर्ण कराव्या लागतील, असे सिवान यांनी सांगितले.

⦿ प्रक्षेपित करण्यात आलेल्या 31 उपग्रहांबरोबरच इतर दोन “पेलोड’ ही अवकाशात सोडण्यात आले आहेत. अवकाशात काही “प्रयोग’ करण्यासाठी हे पेलोड सोडण्यात आल्याचे या प्रकल्पाचे संचालक बी जयकुमार यांनी यावेळी स्पष्ट केले.

⦿ या उपग्रहांमध्ये तब्बल 14 देशांच्या 29 “नॅनो उपग्रहां’चा समावेश आहे. या उपग्रहांसमवेतच कार्टोसॅट 2 ई हा उपग्रहही प्रक्षेपित करण्यात आला आहे.

⦿ कार्टोसॅट 2 ई हा “पृथ्वी निरीक्षणा’साठी अवकाशात सोडण्यात आला आहे. 712 किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह कार्टोसॅट 2 या उपग्रहांच्या मालिकेमधील सहावा उपग्रह आहे.

⦿ याशिवाय, तमिळनाडू राज्यातील कन्याकुमारी जिल्ह्यामधील नूरुल इस्लाम विद्यापीठामधील विद्यार्थ्यांनी तयार केलेला एक उपग्रहही याचवेळी अवकाशात सोडण्यात आला आहे.

या देशांचे उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले –
ऑस्ट्रिया, बेल्जियम, चिले, झेक प्रजासत्ताक, फिनलॅंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, लात्विया, लिथुआनिया, स्लोव्हाकिया, ब्रिटन आणि अमेरिका

 रशियाकडे जगातील सर्वात मोठे मालवाहू विमान

► अँटीनोव एएन २२५ हे जगातील  सर्वात मोठे मालवाहू म्हणजे कार्गो विमान क्वचितच आकाशात उडले आहे. 
► १९८० साली रशियाने हे कार्गो विमान तयार केले आहे व आता एअरोस्पेस इंडस्ट्री कार्पोरेशन ऑफ चायनामध्ये या विमानाला नवे रूप दिले जात आहे. त्यानंतर हे विमान नियमित उड्डाणे करेल असे समजते. 
► २० वर्षांपूर्वी त्यावेळच्या सोविएत रशियाचा एक भाग असलेल्या युक्रेनमध्ये हे विमान तयार केले गेले आहे. त्या वेळी त्याला ७० लाख पौंड म्हणजे ६३ कोटी रूपये खर्च आला होता. हे विमान ६४० टन वजनाचा माल वाहून नेऊ शकते.
► हे विमान नॉनस्टॉप १५५०० मैल उडू शकते व त्याचा कमाल वेग आहे ताशी ८५० मैल. या विमानात १५०० लोक बसू शकतात .
► आज जगात जे सर्वात मोठे प्रवासी विमान आहे त्यापेक्षा ही क्षमता तिप्पट आहे. १ लाख ९० हजार किलो वजनाचा एकच आयटम एअरलिफ्ट करून या विमानाने जागतिक रेकॉर्ड नोंदविले आहे. 
► २१ डिसेंबर १९८८ रोजी त्याने पहिले उड्डाण केले होते. नासाने अंतराळ  यानासाठी या विमानाचा वापर केला होता. 
► या विमानाची उंची १८.१ मीटर, लांबी ८४ मीटर व पंखांची लांबी ९०५ मीटर आहे. या विमानाचे वजन २ लाख ८५ हजार किलो आहे व त्याला सहा इंजिन आणि ३२ टायर्स आहेत.