Railway Department Posts

रेल्वेमध्ये विविध पदांची भरती करणारी यंत्रणा
————————————————————-
गट         :               भरती करणारी यंंत्रणा

अ                          केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)
१. भारतीय नागरी सेवा परीक्षा (आयसीएस)
२. स्पेशल क्लास रेल्वे अप्रेंटिस परीक्षा (एससीआरए)
ब                             रेल्वे सेवेत फक्त पदोन्नतीने
क/ड                       रेल्वे भरती मंडळ (आरआरबी) आणि भारतीय रेल्वे

रेल्वेतील पदभरती शैक्षणिक पात्रता, वय आदी माहिती :

ट्रान्सपोर्ट (ट्रॅफिक) विभाग :
         स्टेशन मास्टर :
रिक्त पदांपैकी ६० टक्के सरळसेवेने तर ४० टक्के विभागीय परीक्षेद्वारे भरतात.
                 शैक्षणिक पात्रता :
१. कोणत्याही विद्यापीठाची पदवी
२. रेल्वे ट्रान्सपोर्ट इन्स्टिट्यूटची रेल्वे वाहतूक आणि व्यवस्थापन (रेल्वे ट्रान्सपोर्ट अ‍ॅण्ड मॅनेजमेंट) शाखेतील पदविका                                 अतिरिक्त प्राधान्याची पात्रता समजली जाते.
         वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे
        भविष्यातील संधी : सहायक स्टेशन मास्टर, स्टेशन मास्टर, उपस्थानक अधीक्षक, स्थानक अधीक्षक पदावर पदोन्नतीच्या                          संधी उपलब्ध

        ट्रॅफिक सिग्नलर्स :
रिक्त पदांपैकी ७५ टक्के सरळसेवेने तर २५ टक्के पदोन्नतीने भरतात.
शैक्षणिक पात्रता : ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण
वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे
       भविष्यातील संधी : वरिष्ठ सिग्नलर/मुुख्य सिग्नलर/वायरलेस इन्स्पेक्टर (ट्रॅफिक) ग्रेड-।।/ग्रेड-।

गार्ड्स :
रिक्त पदांपैकी २५ टक्के सरळसेवेने तर ७५ टक्के पदोन्नतीने भरतात.
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही संविधानिक विद्यापीठाची पदवी
वयोमर्यादा : १८ ते २८ वर्षे
       भविष्यातील संधी : पॅसेंजर गार्ड्स/मेल गार्ड्स

ट्रॅफिक अप्रेंटिस :
रिक्त पदांपैकी ५० टक्के सरळसेवेने तर ५० टक्के पदोन्नतीने भरतात.
          शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विद्यापीठाची पदवी रेल ट्रान्सपोर्ट इन्स्टिट्यूटची रेल वाहतूक आणि व्यवस्थापन (रेल ट्रान्सपोर्ट                   अ‍ॅण्ड मॅनेजमेंट) शाखेतील पदविका अतिरिक्त प्राधान्याची पात्रता समजली जाईल.
वयोमर्यादा : २० ते २८ वर्षे
भविष्यातील संधी : उपमुख्य नियंत्रक/उपस्थानक अधीक्षक/ उप वॉर्ड मास्टर, ट्रॅफिक इन्स्पेक्टर/ मुुख्य नियंत्रक / स्थानक                       अधीक्षक/ यार्ड मास्टर / मुुख्य ट्रॅफिक इन्स्पेक्टर.
वाणिज्य विभाग :
तिकीट संग्राहक (टीसी) :
रिक्त पदांपैकी ५० टक्के सरळपणे तर ५० टक्के पदोन्नतीने भरतात.
शैक्षणिक पात्रता : ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण qकवा समतुल्य
वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे
        भविष्यातील संधी : वरिष्ठ तिकीट संग्राहक/प्रवासी तिकीट परीक्षक/वाहक प्रवासी तिकीट इन्स्पेक्टर/वाहक/मुुख्य तिकीट                          निरीक्षक
 वाणिज्य क्लार्क (कोचिंग  – गुड्स वर्क)
रिक्त पदांपैकी ५० टक्के सरळपणे तर ५० टक्के विभागीय स्पर्धा परीक्षेने भरतात.
            शैक्षणिक पात्रता : ५० टक्के गुणांसह दहावी qकवा समतुल्य
            वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे
            भविष्यातील संधी : वरिष्ठ वाणिज्य क्लार्क, मुुख्य वाणिज्य क्लार्क, प्रमुख वाणिज्य क्लार्क (गुड्स, पार्सल लगेज/बुqकग)
     चौकशी तथा आरक्षण क्लार्क :
           शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विद्यापीठाची पदवी
           वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे
            भविष्यातील संधी : ईसीआरसी-ग्रेड-।, आरक्षण पर्यवेक्षक ग्रेड-।।, ग्रेड-।
     सिनिअर कूक :
            शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेमधून कूकरी व्यावसायिक प्रशिक्षण
            वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे
     ट्रान्सपोर्ट (पॉवर) डिपार्टमेंट :
डिझेल असिस्टंट/ विद्युत असिस्टंट
            शैक्षणिक पात्रता :
१. दहावी उत्तीर्ण आणि
२. फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक, मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक, रेडिओ-टीव्ही मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मोटार                वाहन मेकॅनिक, वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर अ‍ॅण्ड कॉईल वाइंडर, डिझेल मेकॅनिक, हीट इंजिन या आयटीआय ट्रेडमधील                 कोणत्याही एका ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप किंवा
३. मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनीअरिंगमधील पदविका
           वयोमर्यादा : १८ ते २७ वर्षांदरम्यान
           भविष्यातील संधी : शन्टर्स, इंजिन टर्नर्स, गुड्स ड्रायव्हर्स

⦿ रेल्वेत निवड झालेल्या उमेदवारांना २ वर्षांचा उमेदवारी कालावधी असतो.
⦿ पदांच्या भरतीसाठी रेल्वे भरती बोर्ड जाहिरात प्रसिद्ध करते. इंग्रजी, हिंदी  आणि प्रादेशिक भाषेतील वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात                        प्रसिद्ध केली जाते.
⦿ रेल्वेमध्ये नोकरीसाठी वयोमर्यादा सवलत देण्यात आली असून, त्यात अनुसूचित जाती-जमातींसाठी ५ वर्षे, इतर मागास वर्गासाठी              ३ वर्षांची सवलत; विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता महिला यांना ३५ वर्षांपर्यंत, इतर मागास वर्गीयांसाठी ३८ वर्षे आणि अनुसूचित                जाती-जमातींसाठी ४० वर्षांपर्यंत वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

      टेलिकम्युनिकेशन इन्स्पेक्टर :
            शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमधील पदविका
            वयोमर्यादा : १८ ते २८ च्या दरम्यान
      आरपीएफ/आरपीएसएफमध्ये शिपाई (कॉन्स्टेबल) :
            पात्रता : दहावी उत्तीर्ण
             वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे (शारीरिक पात्रता : आरपीएफ उपनिरीक्षक पदासारखीच लागू आहे.)