Non Technical Cadre Exams.

अतांत्रिक पदवीधर
———————————
पदनिहाय शैक्षणिक पात्रता 

⦿ कमर्शियल अ‍ॅप्रेन्टिस
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
⦿ ट्रॅफिक अ‍ॅप्रेन्टिस
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
⦿ गुड्स गार्ड
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
⦿ ज्युनियर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. संगणकावर हिंदी, इंग्रजी टंकलेखन करता येणे आवश्यक.
⦿ सीनियर क्लार्क कम टायपिस्ट
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. संगणकावर हिंदी, इंग्रजी टंकलेखन करता येणे आवश्यक.
⦿ असिस्टंट स्टेशन मास्तर
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.

वरील पदांसाठी वयोमर्यादा :
१८ ते ३२ वर्षे. अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांसाठी ५ वर्षे तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्षे सवलत.

लेखी परीक्षेचे स्वरूप :
⦿ वरील सर्व पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाते.
⦿ कमर्शियल अ‍ॅप्रेंंटिस, ट्रॅफिक अ‍ॅप्रेंटिस आणि गुड्स गार्ड या पदांसाठी ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाते.
⦿ ज्युनिअर अकाऊंटस् असिस्टंट कम टायपिस्ट, सीनिअर क्लार्क कम टायपिस्ट या पदांसाठी ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून टंकलेखन कौशल्ये चाचणी घेतली जाते.
⦿ असिस्टंट स्टेशन मास्तर पदासाठी ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अभियोग्यता चाचणी (अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट) आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाते.

भाषेची निवड :
⦿ ऑनलाइन परीक्षेसाठी मराठी, गुजराती, कानडीबरोबरच इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषांतून प्रश्नपत्रिका असतात.
⦿ शैक्षणिक पात्रतेच्या स्तरानुसार लेखी परीक्षेचा दर्जा असतो. परीक्षा बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते.
⦿ ९० मिनिटांच्या कालावधीची १०० गुणांची ही परीक्षा असून त्यात प्रामुख्याने अंकगणित, सामान्य अध्ययन, सामान्य बुद्धिमत्ता आणि तार्किक स्वरूपाच्या प्रश्नांचा समावेश असतो.
⦿ लेखी परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग पद्धती असून प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा केले जातात.

लेखी परीक्षेसाठी महाराष्ट्रातील केंद्रे :
अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मडगाव, मुंबई, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, नवी मुंबई, पंढरपूर, परभणी,पिंपरी चिंचवड, पुणे, रायगड, रत्नागिरी, संगमनेर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ. उमेदवारांना या केंद्रांची प्राधान्यक्रमाने ऑनलाइन अर्जात नोंद करावी लागते.

(सूचना : रेल्वे भरती बोर्डाच्या जाहिरातीनुसार निवड प्रक्रिया, परीक्षा केंद्रांत काहीअंशी बदल होऊ शकतो )