Indian Forest Service (IFS)

भारतीय वन सेवा 

Indian Forest Service (IFS)

——————————————————————–
ही परीक्षा भारतीय प्रशासकीय सेवेसारखीच अखिल भारतीय परीक्षा दर्जा प्राप्त असलेली सेवा आहे. या परीक्षेद्वारे भारतीय वन अधिकारी या वर्ग-अ पदी निवड केली जाते.
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीप्राप्त कोणतीही व्यक्ती ही परीक्षा देऊ शकते.
वयोमर्यादा  :  OPEN – 21 वर्षे ते 32 वर्षे,
                      OBC –  21 वर्षे ते 35 वर्षे
                      SC/ST – 21 वर्षे पूर्ण (कमाल वयोमर्यादा नाही)
किती वेळा ही परीक्षा देता येते?
 OPEN – 6 वेळा
 OBC – 9 वेळा
SC/ST –  मर्यादा नाही
 परीक्षेचे स्वरूप कसे असते?
अ) पूर्वपरीक्षा –
भारतीय वनसेवेसाठी पूर्वपरीक्षा व नागरी सेवा परीक्षेची पूर्वपरीक्षा ही एकच असते. यासाठी नागरी सेवा परीक्षेचे जे स्वरूप आहे तेच स्वरूप येथे आहे.
 ब) मुख्य परीक्षा – 
पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना मुख्य परीक्षेसाठी बोलावण्यात येते. ही लेखी स्वरूपाची असते. यामध्ये 6 पेपर असतात –
⦿ पेपर 1 – इंग्रजी – 300 गुण 3 तास
⦿ पेपर 2 – सामान्य ज्ञान – 300 गुण 3 तास
⦿ पेपर 3 – वैकल्पिक विषय 1 (भाग 1) – 300 गुण – 3 तास
⦿ पेपर 4 – वैकल्पिक विषय 1 (भाग 2) – 300 गुण – 3 तास
⦿ पेपर 5 – वैकल्पिक विषय 2 (भाग 1) – 300 गुण – 3 तास
⦿ पेपर 6 – वैकल्पिक विषय 2 (भाग 2) – 300 गुण – 3 तास
       या परीक्षेसाठी उपलब्ध असलेल्या विषयांमधूनच तुम्हाला दोन विषयांची वैकल्पिक विषय म्हणून निवड करावी लागते.
क) मुलाखत –
या परीक्षेसाठी मुलाखतीचे 300 गुण असतात. मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या गुणांची बेरीज करून गुणवत्ता यादीद्वारे निवड केली जाते.

Central Armed Police Exam (Group-A)

केंद्रीय पोलीस परीक्षा (वर्ग-अ)

Central Armed Police Exam (Group-A) 

——————————————————————————————————————————
  या परीक्षेमध्ये असिस्टंट कमांडट या पदासाठी निवड केली जाते. ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेतली जाते.
 या परीक्षेद्वारे पुढील सेवांसाठी निवड केली जाते –
⦿ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल – Central Industrial Security Force (CISF)
⦿ सीमा सुरक्षा दल – Border Security Force (BSF)
⦿ केंद्रीय राखीव पोलीस दल – Central Reserve Police Force (CRPF)
⦿ इंडो तिबेटन सीमा सुरक्षा दल – Indo-Tibetean Border Police (ITBP)
⦿ सशस्त्र सुरक्षा बल – Sashstra Seema Bal (SSB)
परीक्षेसाठी पात्रता  :
 मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीप्राप्त कोणतीही व्यक्ती ही परीक्षा देऊ शकते.
 या परीक्षेसाठी वयोमर्यादा :
 खुला वर्ग – 21 ते 25 वर्षे
 इतर मागासवर्गीय – 21 ते 28 वर्षे
 अनुसूचित जाती/जमाती – मर्यादा नाही, किती वेळा ही परीक्षा देता येते?
 खुला वर्ग – 3 वेळा,  इतर मागासवर्गीय – 6 वेळा
 अनुसूचित जाती/जमाती – मर्यादा नाही
परीक्षेचे टप्पे  :
अ) पूर्वपरीक्षा – सामान्य अध्ययनाची 250 गुण असलेली ही परीक्षा असते. यामध्ये 125 बहुपर्यायी प्रश्न असतात. 2 तास वेळ यासाठी उपलब्ध असतो.
ब) मुख्य परीक्षा – मुख्य परीक्षा ही 200 गुणांची असते. यामध्ये निबंध, उतार्‍यावरील प्रश्न, सामान्य अध्ययनावरील प्रश्न असतात. यासाठी 3 तास वेळ असतो. मुख्य परीक्षा ही लेखी स्वरूपाची असते.
सूचना – पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा एकाच दिवशी होते. पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा दोन्ही उत्तीर्ण झालेल्यांना मुलाखतीसाठी दिल्लीला बोलावले जाते.
 क) शारीरिक परीक्षा – मुलाखतीसाठी बोलावलेल्या परीक्षार्थींना शारीरिक परीक्षा पास होणे अनिर्वाय असते. यामध्ये 100 मीटर शर्यत, 800 मीटर शर्यत, गोळाफेक, लांब उडी इत्यादींचा समावेश होतो. त्यानंतर मेडिकल परीक्षा घेण्यात येते.
ड) मुलाखत – शारीरिक व मेडिकल परीक्षा पास झालेल्या परीक्षार्थींना मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखतीमध्ये बायोडाटा, चालू घडामोडी, आंतरिक सुरक्षा इत्यादींवर प्रश्न विचारले जातात. मुलाखतीसाठी 150 गुण असतात. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत यातील गुणांची बेरीज करून गुणवत्ता यादीद्वारे निवड केली जाते.

यूपीएससी परीक्षा स्वरूप 

पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत
———————————–
पूर्वपरीक्षा : (४०० गुण)
पूर्वपरीक्षेमध्ये सामान्य अध्ययन व कलचाचणी असे दोन पेपर असतात. दोन्हीही पेपर वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात. २०१५ मधील अधिसूचनेनुसार कलचाचणी हा पेपर पात्रता स्वरूपाचा करण्यात आला आहे. सामान्य अध्ययन आणि कलचाचणी या दोन्ही पेपरमधील प्रश्न इंग्रजी व हिंदी या दोन भाषांमध्ये दिलेले असतात. २००७ पासून पूर्वपरीक्षेस निगेटिव्ह मार्किंग लागू झाले आहे. चुकीच्या प्रत्येक उत्तरादाखल मिळालेल्या गुणामधून १/३ (०.३३ किंवा ३३ टक्के) इतके गुण वजा केले जातात.
पूर्वपरीक्षा स्वरूप :
पेपर                                         प्रश्नसंख्या     गुण          कालावधी 
सामान्य अध्ययन – १               १००              २०० गुण        २ तास
सी-सॅट – पेपर – २                       ८०               २०० गुण         २ तास
—————————————————————————————–
एकूण गुण                                                     ४००  गुण
पूर्वपरीक्षा अभ्यासघटक 
सामान्य अध्ययन पेपर १ :
⦿ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या चालू घडामोडी
⦿ भारतीय इतिहास व राष्ट्रीय चळवळ
⦿ भारताचा व जगाचा भौतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल
⦿ भारतीय राज्यव्यवस्था व शासन
⦿ आर्थिक व सामाजिक विकास
⦿ पर्यावरणीय परिस्थिती सामान्य विज्ञान
⦿ सामान्य विज्ञान
कलचाचणी पेपर २ :
⦿ आकलन आणि इंग्रजी भाषा आकलन क्षमता
⦿ व्यवस्थापकीय अभिवृत्ती परीक्षण
⦿ तार्किक क्षमता व विश्लेषण क्षमता
⦿ सामान्य बौद्धिक क्षमता
⦿ पायाभूत अंकगणित
⦿ माहितीचे विश्लेषण
⦿ मराठी व इंग्रजी भाषा आकलन
मुख्य परीक्षा : (२३५० गुण)
दुसरा टप्पा मुख्य परीक्षेचा आहे. ही मुख्य परीक्षा १७५० गुणांची असते. त्यामध्ये इंग्रजी भाषा हा पेपर अनिवार्य असतो व दुसरा पेपर भाषेचा असतो. यामध्ये कुठलीही भाषा निवडता येते. या दोन्ही पेपरसाठी प्रत्येकी ३०० गुण आहेत. मात्र या दोन्ही विषयाचे गुण केवळ उत्तीर्णसाठी ग्राह्य धरले जातात. साधारणत: ३५ टक्के गुण त्यामध्ये असणे आवश्यक आहे. या गुणांची मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये गणना केली जात नाही. जे गुण मुख्य परीक्षेसाठी ग्राह्य धरले जातात त्यामध्ये पेपर-१ हा निबंधलेखनाचा असतो त्याला २५० गुण असतात.
अ)    पात्रता पेपर –
    पेपर  ‘अ’ – भारतीय भाषा – ३०० गुण
    पेपर  ‘ब’ – अनिवार्य इंग्रजी – ३०० गुण
सामान्य अध्ययनांचे एकूण चार पेपर असतात. या प्रत्येक पेपरला २५० एवढे गुण असतात व हे सर्व पेपर वस्तुनिष्ठ स्वरूपात आहेत. यातील सामान्य अध्ययन(२) या पेपरसाठी भारतीय वारसा, संस्कृती, जागतिक इतिहास-भूगोल आणि समाज इत्यादी घटकांचा समावेश आहे. सामान्य अध्ययन (३) या पेपरमध्ये शासन, राज्यघटना, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध आदी घटकांचा समावेश आहे.
सामान्य अध्ययन (४) यामध्ये तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, विकास, जैव वैविधता, पर्यावरण, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आदी घटकांचा समावेश आहे. सामान्य अध्ययन (५) यामध्ये नैतिक मूल्य, एकात्मता आणि प्रवृत्ती याचा अंतर्भाव आहे.
ब)  गुणानुक्रमासाठी ग्राह्य धरले जाणारे  विषय  –
    अनिवार्य विषय – प्रत्येक पेपरचा कालावधी ३ तास.
पेपर १ – निबंध (२५० गुण)
पेपर २ – भारतीय वारसा, संस्कृती इतिहास व भारत व जगाचा भूगोल (२५० गुण)
पेपर ३ – शासन, राज्यघटना, राजकारण, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध (२५० गुण)
पेपर ४ – अर्थव्यवस्था, पर्यावरण, विज्ञान व तंत्रज्ञान (२५० गुण)
पेपर ५ – नैतिकता, निष्ठा व कल/दृष्टिकोन (२५० गुण)
वैकल्पिक विषय –
पेपर ६ –  वैकल्पिक विषय (पेपर-१) (२५० गुण)
पेपर ७ – वैकल्पिक विषय (पेपर-२) (२५० गुण)
वैकल्पिक विषय : कृषी, पशु विज्ञान, मानववंशशास्त्र, वनस्पती शास्त्र, रसायन शास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकिशास्त्र, वाणिज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विद्युत अभियांत्रिकी, भूगोल, भूगर्भशास्त्र, भारतीय इतिहास, कायदा, व्यवस्थापन, गणित, इत्यादींचा समावेश आहे.
वैकल्पिक भाषा विषय : मराठी, हिंदी, गुजराती, आसामी, बंगाली, बोडो, डोग्री, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, नेपाली, ओरिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ, तेलुगु, उर्दू व इंग्रजी.
मुलाखत : (२७५ गुण)
मुलाखतीसाठी २७५ गुण आहेत. तुमचा बायोडेटा हाच तुमचा मुलाखतीचा अभ्यासक्रम आहे. मुख्य परीक्षेच्या अर्जामध्ये नमूद केलेली व्यक्तिगत माहिती आणि तुमचा बायोडाटा हीच मुलाखतीची सर्वसाधारण चौकट असते. बायोडेटामध्ये नोंदवलेल्या प्रत्येक शब्दाचा सूक्ष्म अभ्यास करा. तुमच्या छंदांवर विशेष लक्ष असू द्या. अनेकदा छंदाविषयी प्रश्न विचारले जातात. मुलाखत तुमच्या व्यक्तिमत्त्व विकासाची चाचणी आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेद्वारे तुमच्या ज्ञानाची परीक्षा झालेली असते. मुलाखतीतून प्रशासकीय पदांसाठी तुम्ही किती योग्य आहात हे तपासले जाते. व्यक्तिमत्त्वाचा विकास हा काही दिवसांचा अभ्यास नसतो, ती एक दीर्घकालीन प्रक्रिया असते. यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न केले पाहिजेत. मुलाखतीमध्ये विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जातात. यासाठी उमेदवारांनी पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून केला पाहिजे.
———————————————————————————————————————-

Civil Service Exam. (Central Group)

केंद्रीय लोकसेवा परीक्षा

———————————————————-
शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व परीक्षेच्या संधी :
यूपीएससी परीक्षेसाठी कुठल्याही विषयातील किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे असते. खुल्या प्रवर्गासाठी 32 वर्ष एवढी वयाची अट असून त्यांना 6 वेळा परीक्षा देता येते. अनुसूचित जातीच्या उमेदवारांना वयाच्या 37 वर्षांपर्यंत परीक्षा देता येते. त्यांना कितीही वेळा परीक्षेला बसता येऊ शकते. इतर मागासवर्गीयांसाठी 35 वर्ष वयाची अट असून 9 वेळा परीक्षेची संधी आहे.
——————————————————————————————
 नागरी सेवा परीक्षा केंद्रीय वर्ग-अ
    Civil Service Exam (Central Group)
 केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेद्वारे पुढील सेवांसाठी निवड केली जाते.
⦿ भारतीय प्रशासकीय सेवा – Indian Administrative Service (IAS)
⦿ भारतीय विदेश सेवा –  Indian Foreign Service
⦿ भारतीय पोलीस सेवा – Indian Police Service
⦿ भारतीय महसूल सेवा – Indian Revenue Service (Income Tax)
⦿ भारतीय महसूल सेवा (कस्टम व एक्साईज) – Indian Revenue Service (Custom and Excise)
⦿ भारतीय लेखा व वित्त सेवा – Indian Audit and Account Service (IAAS)
⦿ भारतीय रेल्वे सेवा – Indian Railway Service
⦿ भारतीय माहिती सेवा – Indian Information Service
⦿ भारतीय पोस्ट सेवा – Indian Postal Service
⦿ भारतीय संरक्षण महसूल सेवा – Indian Defence Estates Service
⦿ भारतीय संरक्षण लेखा सेवा – Indian Defence Account Service
परीक्षेचे स्वरूप 
 ही परीक्षा 3 टप्प्यांमध्ये घेतली जाते.
 अ) पहिला टप्पा –
पूर्वपरीक्षा
मुख्य परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांची चाळणी या परीक्षेद्वारे केली जाते. ही परीक्षा 400 गुणांची आहे. यामध्ये सामान्य अध्ययन – 200 गुण.
◊ नागरी सेवा कल चाचणी (Civil Service Aptitude Test) – 200 गुण.
◊ सामान्य अध्ययनामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चालू घडामोडी यांसारख्या विषयांवरील बहुपर्यायी प्रश्न असतात.
◊  सामान्य अध्ययन – 100 प्रश्‍न-200 गुण-2 तास वेळ.
◊  नागरी सेवा कल चाचणी (CSAT) यामध्ये उतार्‍यावरील प्रश्न, अंकगणित, आकलन क्षमता, निर्णयक्षमता यांसारखे प्रश्न विचारले जातात.
◊  नागरी सेवा कल चाचणी – 80 प्रश्‍न-200 गुण-2 तास वेळ.
◊ नागरी सेवा कल चाचणीच्या पेपरमध्ये किमान 65 गुण मिळवणे आवश्यक आहे. 65 हून अधिक गुण मिळवलेल्यांचा फक्त सामान्य अध्ययनावरील गुणांआधारे मुख्य परीक्षेसाठी निवड केली जाते.
 ब) दुसरा टप्पा –
मुख्य परीक्षा –
मुख्य परीक्षा ही 1750 गुणांची लेखी परीक्षा आहे. यामध्ये 250 गुणांचे एकूण 7 पेपर असतात.
◊ पेपर 1 – निबंध-250-3 तास
◊ पेपर 2 – इतिहास, भूगोल, समाजशास्त्र – 250 गुण -3 तास
◊ पेपर 3 – राज्यशास्त्र, प्रशासन, आंतरराष्ट्रीय संबंध – 250 गुण -3 तास
◊ पेपर 4 – अर्थशास्त्र, आंतरिक सुरक्षा, शास्त्र-तंत्रज्ञान इ. – 250 गुण -3 तास
◊ पेपर 5 – नीतिमत्ता – 250 गुण -3 तास
◊ पेपर 6 – वैकल्पिक विषय (भाग-1) – 250 गुण -3 तास
◊ पेपर 7 – वैकल्पिक विषय (भाग 2) – 250 गुण -3 तास
या परीक्षेसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे मान्यता असलेल्या विषयांपैकी एका विषयाची तुम्हाला वैकल्पिक विषय म्हणून निवड करता येते.
क) तिसरा टप्पा –
मुलाखत –
ही मुलाखत 275 मार्कांची असते. मुलाखतीमध्ये तुम्हाला तुमचा बायोडाटा, पदवी, वैकल्पिक विषय, तुमचे राज्य यासंबंधित प्रश्न विचारले जातात.
मुख्य परीक्षा व मुलाखत यांची बेरीज करून 2025 पैकी मार्कांची गुणवत्ता यादी जाहीर होते. यामध्ये गुणवत्ता यादीत आलेल्यांची त्यांच्या गुणवत्ता क्रमांकाप्रमाणे विविध सेवांसाठी निवड केली जाते.
————————————————————————————————–