यूपीएससी परीक्षा स्वरूप 

पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत
———————————–
पूर्वपरीक्षा : (४०० गुण)
पूर्वपरीक्षेमध्ये सामान्य अध्ययन व कलचाचणी असे दोन पेपर असतात. दोन्हीही पेपर वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात. २०१५ मधील अधिसूचनेनुसार कलचाचणी हा पेपर पात्रता स्वरूपाचा करण्यात आला आहे. सामान्य अध्ययन आणि कलचाचणी या दोन्ही पेपरमधील प्रश्न इंग्रजी व हिंदी या दोन भाषांमध्ये दिलेले असतात. २००७ पासून पूर्वपरीक्षेस निगेटिव्ह मार्किंग लागू झाले आहे. चुकीच्या प्रत्येक उत्तरादाखल मिळालेल्या गुणामधून १/३ (०.३३ किंवा ३३ टक्के) इतके गुण वजा केले जातात.
पूर्वपरीक्षा स्वरूप :
पेपर                                         प्रश्नसंख्या     गुण          कालावधी 
सामान्य अध्ययन – १               १००              २०० गुण        २ तास
सी-सॅट – पेपर – २                       ८०               २०० गुण         २ तास
—————————————————————————————–
एकूण गुण                                                     ४००  गुण
पूर्वपरीक्षा अभ्यासघटक 
सामान्य अध्ययन पेपर १ :
⦿ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या चालू घडामोडी
⦿ भारतीय इतिहास व राष्ट्रीय चळवळ
⦿ भारताचा व जगाचा भौतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल
⦿ भारतीय राज्यव्यवस्था व शासन
⦿ आर्थिक व सामाजिक विकास
⦿ पर्यावरणीय परिस्थिती सामान्य विज्ञान
⦿ सामान्य विज्ञान
कलचाचणी पेपर २ :
⦿ आकलन आणि इंग्रजी भाषा आकलन क्षमता
⦿ व्यवस्थापकीय अभिवृत्ती परीक्षण
⦿ तार्किक क्षमता व विश्लेषण क्षमता
⦿ सामान्य बौद्धिक क्षमता
⦿ पायाभूत अंकगणित
⦿ माहितीचे विश्लेषण
⦿ मराठी व इंग्रजी भाषा आकलन
मुख्य परीक्षा : (२३५० गुण)
दुसरा टप्पा मुख्य परीक्षेचा आहे. ही मुख्य परीक्षा १७५० गुणांची असते. त्यामध्ये इंग्रजी भाषा हा पेपर अनिवार्य असतो व दुसरा पेपर भाषेचा असतो. यामध्ये कुठलीही भाषा निवडता येते. या दोन्ही पेपरसाठी प्रत्येकी ३०० गुण आहेत. मात्र या दोन्ही विषयाचे गुण केवळ उत्तीर्णसाठी ग्राह्य धरले जातात. साधारणत: ३५ टक्के गुण त्यामध्ये असणे आवश्यक आहे. या गुणांची मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये गणना केली जात नाही. जे गुण मुख्य परीक्षेसाठी ग्राह्य धरले जातात त्यामध्ये पेपर-१ हा निबंधलेखनाचा असतो त्याला २५० गुण असतात.
अ)    पात्रता पेपर –
    पेपर  ‘अ’ – भारतीय भाषा – ३०० गुण
    पेपर  ‘ब’ – अनिवार्य इंग्रजी – ३०० गुण
सामान्य अध्ययनांचे एकूण चार पेपर असतात. या प्रत्येक पेपरला २५० एवढे गुण असतात व हे सर्व पेपर वस्तुनिष्ठ स्वरूपात आहेत. यातील सामान्य अध्ययन(२) या पेपरसाठी भारतीय वारसा, संस्कृती, जागतिक इतिहास-भूगोल आणि समाज इत्यादी घटकांचा समावेश आहे. सामान्य अध्ययन (३) या पेपरमध्ये शासन, राज्यघटना, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध आदी घटकांचा समावेश आहे.
सामान्य अध्ययन (४) यामध्ये तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, विकास, जैव वैविधता, पर्यावरण, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आदी घटकांचा समावेश आहे. सामान्य अध्ययन (५) यामध्ये नैतिक मूल्य, एकात्मता आणि प्रवृत्ती याचा अंतर्भाव आहे.
ब)  गुणानुक्रमासाठी ग्राह्य धरले जाणारे  विषय  –
    अनिवार्य विषय – प्रत्येक पेपरचा कालावधी ३ तास.
पेपर १ – निबंध (२५० गुण)
पेपर २ – भारतीय वारसा, संस्कृती इतिहास व भारत व जगाचा भूगोल (२५० गुण)
पेपर ३ – शासन, राज्यघटना, राजकारण, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध (२५० गुण)
पेपर ४ – अर्थव्यवस्था, पर्यावरण, विज्ञान व तंत्रज्ञान (२५० गुण)
पेपर ५ – नैतिकता, निष्ठा व कल/दृष्टिकोन (२५० गुण)
वैकल्पिक विषय –
पेपर ६ –  वैकल्पिक विषय (पेपर-१) (२५० गुण)
पेपर ७ – वैकल्पिक विषय (पेपर-२) (२५० गुण)
वैकल्पिक विषय : कृषी, पशु विज्ञान, मानववंशशास्त्र, वनस्पती शास्त्र, रसायन शास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकिशास्त्र, वाणिज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विद्युत अभियांत्रिकी, भूगोल, भूगर्भशास्त्र, भारतीय इतिहास, कायदा, व्यवस्थापन, गणित, इत्यादींचा समावेश आहे.
वैकल्पिक भाषा विषय : मराठी, हिंदी, गुजराती, आसामी, बंगाली, बोडो, डोग्री, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, नेपाली, ओरिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ, तेलुगु, उर्दू व इंग्रजी.
मुलाखत : (२७५ गुण)
मुलाखतीसाठी २७५ गुण आहेत. तुमचा बायोडेटा हाच तुमचा मुलाखतीचा अभ्यासक्रम आहे. मुख्य परीक्षेच्या अर्जामध्ये नमूद केलेली व्यक्तिगत माहिती आणि तुमचा बायोडाटा हीच मुलाखतीची सर्वसाधारण चौकट असते. बायोडेटामध्ये नोंदवलेल्या प्रत्येक शब्दाचा सूक्ष्म अभ्यास करा. तुमच्या छंदांवर विशेष लक्ष असू द्या. अनेकदा छंदाविषयी प्रश्न विचारले जातात. मुलाखत तुमच्या व्यक्तिमत्त्व विकासाची चाचणी आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेद्वारे तुमच्या ज्ञानाची परीक्षा झालेली असते. मुलाखतीतून प्रशासकीय पदांसाठी तुम्ही किती योग्य आहात हे तपासले जाते. व्यक्तिमत्त्वाचा विकास हा काही दिवसांचा अभ्यास नसतो, ती एक दीर्घकालीन प्रक्रिया असते. यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न केले पाहिजेत. मुलाखतीमध्ये विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जातात. यासाठी उमेदवारांनी पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून केला पाहिजे.
———————————————————————————————————————-