Chemistry

अकरावी-बारावी करताना केमिस्ट्री विषय असेल तर पुढे पदवी घेतानाही तो निवडता येतो. पदवीनंतर ऑर्गनिक केमिस्ट्री आणि अ‍ॅनॅलिटीकल केमिस्ट्री या विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनही करता येते. शिवाय पुढे पीएच.डी.चीही सोय आहे. तसेच पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना यूजीसीने बायो अ‍ॅनॅलिटीकल सायन्स, न्युट्रसिटीकल सायन्स, बायो इन्फॉर्मेटिव्ह आदी इनोव्हेटिव्ह अभ्यासक्रमांचे काही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. विद्यार्थी पदवीनंतर त्यांचा विचार करू  शकतात.
विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी कोणती तयारी करावी?
केमिस्ट्री विषयात आवड असावी. पदवी करताना इन्स्ट्रूमेंटेशनसारखे काही अ‍ॅड ऑन अभ्यासक्रम विद्यार्थ्यासाठी उपलब्ध आहेत. शिकलेल्या अभ्यासक्रमाचा नोकरीकरिता वापर करताना हे अभ्यासक्रम उपयोगी पडणार असल्याने हे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. मुलाखतीच्या वेळी तुम्ही कुशल मनुष्यबळ म्हणून गणले जाता.
Posted in Courses s, SCIENCE.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *