दैनंदिन प्रश्नावली (२२ फेब्रुवारी २०१८)

१. अलीकडे भारत आणि इराणने किती करारांवर स्वाक्षरी केल्या?
अ) ८
ब) ९
क) १०
ड) ११

२. नीती आयोगाद्वारे अलीकडेच पारित करण्यात आलेल्या लिंग गुणोत्तर संदर्भातील अहवालानुसार भारतातील २१ राज्यांपैकी किती राज्यांमध्ये लिंग गुणोत्तरात घट नोंदविण्यात आली?
अ) १७
ब) १८
क) १९
ड) २०

३. लोकसंख्या नियंत्रण कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात किती याचिका दाखल करण्यात आल्या आहेत?
अ) ८
ब) ६
क) ५
ड) ३

४. महाराष्ट्र शासनाने हायपरलूप सेवेकरिता कुठल्या कंपनीसोबत करार केला?
अ) लार्सन अँड टुब्रो
ब) टाटा मॅन्युफॅक्चरर्स
क) वर्जिन ग्रुप
ड) अदानी ग्रुप

५. अलीकडे कुठल्या क्रिकेटरला दक्षिण अफ्रिकेत ‘मॅन ऑफ द सिरीज’ किताबाने सन्मानित करण्यात आले?
अ) रोहित शर्मा
ब) विराट कोहली
क) एम. एस. धोनी
ड) रवींद्र जडेजा

६. अलीकडे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार प्लाज्मा तरंगांमध्ये खालीलपैकी कुठला घटक मिसळल्यानंतर ऑरोराचा उदय होतो?
अ) न्युट्रॉन
ब) प्रोटोन
क) इलेक्ट्रॉन
ड) वायुयुक्त ढग

७. अलीकडे प्रकाशित लिंग गुणोत्तराच्या आकडेवारीनुसार कुठल्या राज्यात प्रति १ हजार पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण सर्वांत कमी नोंदविण्यात आले?
अ) गुजरात
ब) हरियाणा
क) बिहार
ड) उत्तर प्रदेश

८. कुठल्या राज्याद्वारे सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात १३ जिल्ह्यांतील पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी ३७ हजार कोटी रुपयांची रक्कम उपलब्ध करून देण्यात आली?
अ) उत्तर प्रदेश
ब) राजस्थान
क) महाराष्ट्र
ड) मध्य प्रदेश

९. अलीकडे अमेरिकेने कुठल्या देशावर नवीन आर्थिक प्रतिबंध लावले आहेत?
अ) रशिया
ब) उत्तर कोरिया
क) सीरिया
ड) जॉर्डन

१०. अलीकडे होंडुरासच्या राष्ट्रपतिपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली?
अ) हेरंड एस. जोकिंस
ब) जुआन ऑरलँडो हर्नान्डेज
क) जोनाथन डोक्विन
ड) युवान अर्चेंको


उत्तरे : १-ब, २-अ, ३-ड, ४-क, ५-ब, ६-क, ७-अ, ८-ब, ९-अ, १०-ब.

Posted in DAILY QUIZ.