दैनंदिन प्रश्नावली (२३ फेब्रुवारी २०१८)

१. आम आदमी पक्षाच्या दोन आमदारांद्वारे दिल्लीचे मुख्य सचिव …………… यांना मारहाण करीत अपमानजनक वागणूक देण्यात आली.
अ) विशेष प्रकाश
ब) अंशू प्रकाश
क) आशुतोष जैन
ड) पर्थासार्थी मिश्रा

२. कर्जप्रकरणी बँकांसोबत दगाबाजी करण्याचा आरोप असलेला रोटोमॅक ग्रुप ऑफ कंपनीजच्या मालकाचे नाव काय?
अ) विक्रम कोठारी
ब) संजय बंसल
क) अमित तिवारी
ड) नवीन आत्रेय

३. अलीकडे स्वदेशी बनावटीचे मध्यम अंतरावर मारा करण्याची क्षमता असलेल्या मिसाईलची यशस्वी चाचणी घेतली गेली. २ हजार कि.मी. पर्यंतची मारक क्षमता असलेल्या या मिसाईलचे नाव काय?
अ) पृथ्वी-२
ब) आकाश- २
क) अग्नी-३
ड) वायू -३

४. अलीकडेच समोर आलेल्या ११,३०० कोटी रुपयांच्या पीएनबी लोन घोटाळ्यात सहभागी कुठल्या दागिने निर्मात्या कंपनीचे सीएफओ, व्हायस प्रेसिडेंट आणि बोर्ड मेंबरने त्यागपत्र दिले?
अ) गीतांजली जेम्स
ब) पी.पी. ज्वेलर्स
क) तनिष्क
ड) रुद्र आभूषण

५. क्रिकेटच्या तीन फॉर्मेटमध्ये पाच बॉलमध्ये तीन विकेट घेणाऱ्या भारतीय खेळाडूचे नाव काय आहे?
अ) आर. अश्विन
ब) मोहित शर्मा
क) भुवनेश्वर कुमार
ड) रवींद्र जडेजा

६. चीनच्या वन बेल्ट, वन रोड परियोजनेला आव्हान देण्यासाठी भारताने किती देशांसोबत मिळून एक स्थायी स्वरूप योजनेची निर्मिती केली?
अ) ३
ब) ४
क) ५
ड) ६

७. अलीकडे लोकसंख्या निदेशालयाच्या अहवालात किती भारतीय भाषा लुप्त होण्याची शंका जाहीर करण्यात आली?
अ) ४०
ब) ४२
क) ५०
ड) ५५

८. अलीकडे कुठल्या राज्यातील शिक्षा निदेशालयाने सर्व शासकीय शाळांमध्ये राष्ट्रगीताआधी गायत्री मंत्र म्हणणे अनिवार्य केले आहे?
अ) महाराष्ट्र
ब) मध्य प्रदेश
क) हरियाणा
ड) राजस्थान

९. अलीकडे कुठल्या शासकीय विभागाद्वारे जवळपास ९० हजार पदांकरिता असलेली वयोमर्यादा वाढविण्यात आली आहे?
अ) गृह मंत्रालय
ब) भारतीय सेना
क) दिल्ली पोलीस
ड) भारतीय रेल्वे

१०. अलीकडे कुठल्या देशात सरप्लस अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर तेथील सर्व नागरिकांना शासनाद्वारे १५ हजार रुपये दिले जाण्याची घोषणा करण्यात आली?
अ) कुवैत
ब)सिंगापूर
क) सौदी अरेबिया
ड) फिनलँड


उत्तरे : १-ब, २-अ, ३-क, ४-अ, ५-क, ६-अ, ७-ब, ८-क, ९-ड, १०-ब.

Posted in DAILY QUIZ.