उपयुक्त एम.ए. (इंग्रजी) 

कला शाखेतील इंग्रजी वाङ्मयाच्या पदवीला निश्चितपणे चांगली मागणी आहे. कला शाखेला प्रवेश घेऊन एम.ए.(इंग्रजी) करून इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून चांगले करीअर करता येते.  लोकांना इंग्रजीचे महत्व पटायला लागले आहे आणि गावोगाव इंग्रजी माध्यमांच्या शाळाही उघडल्या जायला लागल्या आहेत. सध्या इंग्रजी शिक्षकांची विलक्षण चणचण भासत आहेच, पण इंग्रजीची गरज मात्र वाढत चाललेली आहे. पदवीच्या शिक्षणात जवळजवळ सेंकड इअरपर्यंत इंग्रजी सक्तीचे आहे. त्यामुळे इंग्रजीच्या प्राध्यापकांना केवळ कला शाखेतच नव्हे तर वाणिज्य, विज्ञान, संगणक शास्त्र आणि वैद्यकीय अभियांत्रिकी याही शाखांमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी आहेत. तेव्हा साहित्याविषयी आवड असणार्‍या विद्यार्थ्यांनी इंग्रजी वाङ्मयाचा अभ्यास करण्याचा पर्याय डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.

सध्या ७५ ते ८० टक्के गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना विज्ञान, संगणक अशा विद्या शाखांना प्रवेश मिळणे अशक्य झाले आहे. परंतु त्यामुळे निराश होऊन हे विद्यार्थी अन्य कुठल्या तरी शाखेला प्रवेश घेऊन दिशाहीन वाटचाल करायला लागतात. अशा विद्यार्थ्यांना  इंग्रजी वाङ्मयातून मिळणाऱ्या संधीद्वारे उत्तम करिअर घडविता येते.

Posted in ARTS, Courses a.