मानवी रक्तवहन संस्था (Circulatory System)

रक्त (Blood)

रक्त ही मानवामध्ये असणारी द्रव संयोजी उती आहे. ते विविध पदार्थांचे परिवहन करण्याचे कार्य करते. मानवी शरीरातील रक्ताचे प्रमाण (Blood Volume) जवळपास ५ ते ५.५ लिटर म्हणजेच शरीराच्या वजनाच्या जवळपास ९ टक्के इतके असते. दर तासाला ३४० लिटर र्नत हृदयातून वहन केले जाते. रक्तामध्ये दोन प्रमुख घटक असतात.

१) रक्तद्रव्य (Plasma – ५५%)
यातील ९५ टक्के भाग द्रव असून उर्वरित ५ टक्के भाग Fibrin व इतर घनपदार्थापासून बनलेला असतो.

२) पेशी (Blood Cells – ४५%)

रक्तामध्ये मुख्यातः तीन प्रकारच्या पेशी आढळतात :

  • तांबड्या पेशी (RBC – Red Blood Cells)
  • पांढऱ्या पेशी (WBC – White Blood Cells)
  • रक्तबिंबिका (Platelets or Thrombocytes)

तांबड्या पेशी (RBC)

यांची एकूण संख्या ४ ते ६.५ दशलक्ष/घन मिमी असून तांबड्या पेशीची निर्मिती अस्थिमज्जा (Red Bone Marrow) येथे होत असते. यांचे सरासरी आयुष्यमान १२० दिवस असते.
कार्ये :

१) हिमोग्लोबिनच्या माध्यमातून शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करणे
२) पेशीतील कार्बनडाय ऑक्साईडचे शोषण करून त्यांचे फुफ्फुसांवाटे उत्सर्जन करणे.

  • हिमोग्लोबिन (Haemoglobin)

तांबड्या पेशीतील कार्यकारी घटक म्हणजे हिमोग्लोबिन होय. त्यांची निर्मिती लोह व प्रथिने या दोन घटकांपासून होत असते. यांचे प्राकृत प्रमाण १२ ते १६ ग्रॅम प्रति १०० मिली रक्त इतके असते.

हिमोग्लोबिनचा नाश करण्याचे काम यकृतपेशी करतात व त्यातील प्रथीन घटकांपासून पित्ताची निर्मिती होते. हे पित्त पित्ताशयात साठविले जाऊन नंतर मलमूत्रावाटे त्यांचे शरीराबाहेर उत्सर्जन केले जाते.

पांढऱ्या पेशी (WBC – Leucocytes)

यांची एकूण संख्या ४ ते ११ हजार इतकी असून यांची निर्मिती लसिकांग्रथी (Lymphocytes) मध्ये होत असते. पांढऱ्या पेशींचा आकार तांबड्या पेशींच्या (RBC) आकारापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतो.

  • प्रकार

पांढऱ्या पेशी चार प्रकारच्या असतात. त्यांचे प्रमाण भिन्न असते. ( Neutrophils ) ६० ते ६५ टक्के.त्याचा कार्यकाळ ८ ते १२ तास इतकाच असतो.
(Lymphocytes ) २५ ते २० टक्के (Eosinophils ) ४ ते ६ टक्के (Basophils) ० ते २ टक्के
कार्ये

शरीराची रोगप्रतिकारक्षमता निर्माण करण्याचे काम(Primary Defensive Mechanism of the body) पांढऱ्या पेशी करतात. शरीरात प्रवेशित रोगजंतूंचा नाश करण्ङ्माण्याचे काम या पेशी करतात. यांनाच सैनिकी पेशी असेही म्हणतात.

  • Fibrin

रक्तद्रवामध्ये (Plasma) आढळणारा जाळीसदृश घटक म्हणजे Fibrin होय.

  • कार्ये

रक्तस्कंदन प्रक्रियेतील सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे Fibrin होय. Fibrin शिवाय रक्तबिंबिका (Platelets) व Vit K हेदेखील रक्तस्कंदन प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक आहेत. रक्तस्कंदन (Blood Clotting) प्रक्रियेत Fibrin च्या जाळ्यात विविध पेशी अडकून रक्ताची गाठ निर्माण होते. त्यामुळे रक्तप्रवाह थांबतो.

रक्तबिंबिका (Platelets or Thrombocytes)

हिमोग्लोबिन, प्लाझमाप्रमाणे प्लेटलेट्स ह्यादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहेत. रक्त पातळ होऊ न देण्याचे तसेच रक्तवाहिण्यांना इजा झाल्यास रक्तस्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचे काम या प्लेटलेट्स करतात. या प्लेटलेट्स मुळातच एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात. त्यामुळे त्यांना प्लेटलेट्स हे नाव शास्त्रज्ञांनी दिले आहे. या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत थ्रोम्बोसाइट्स (Thrombocytes) ही संज्ञा वापरली आहे.

प्लेटलेट्स या मोठ्या हाडांतील रक्तमज्जेत (Bone marrow) असणानाऱ्या मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात. त्यांचे रक्तातील आयुष्यमान सर्वसाधारण ५-९ दिवसांचे असते. जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (Spleen) आणि यकृत (Liver) यामध्ये नाश पावतात.

  • कार्य

एखादी जखम झाल्यास रक्त वाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानीदेखील होऊ शकते. अशा वेळेस जखमी झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायब्रिन एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचे (Blood Coagulation) काम करतात. त्यामुळेच प्लेटलेट्सना मानवी शरीराची कवचकुंडले म्हटले जाते.

  • प्लेटलेट्सची संख्या

सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते. संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्राव अधिक होतो. म्हणजे नाकातून, हिरड्यांमधून, थुंकीतून रक्त पडते. त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रजःस्राव अधिक प्रमाणात होतो. जखम झाल्यास रक्तस्राव आटोक्यात येत नाही.
प्लेटलेट्स कमी होण्याची कारणे – डेंग्यू, मलेरियाचा ताप – आनुवंशिक आजार – केमोथेरपी

रक्तगट (Blood Group)

१९०१ मध्ये कार्ल लँडस्टिनर यांनी रक्तगट शोधून काढले. रक्तांमध्ये आढळणारे अ व इ हे Antigens तसेच ‘‘Rh’ Factor यांच्या आधारे त्यांनी रक्तगट निश्चित केले.

क्र.       रक्तगट कोणास रक्त देतात कोणाकडून रक्त घेतात
१. अ, अइ अ, ज
२. इ, अइ इ, ज
३. अइ अइ अ, इ, अइ, ज
४.          ज     ज, अ, इ,           अइ            ज

यापैकी ‘AB’ रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला इतर कोणत्याही रक्तगटाचे रक्त चालत असल्याने त्यांना वैश्विक ग्राहक (Universal Receipient) असे म्हणतात. तर ‘जर रक्तगटाची व्यक्ती इतर कोणालाही रक्त देऊ शकत असल्याने त्यांना वैश्विक दाता (Universal Donar) असे म्हणतात.

मानवी हृदय (Human Heart)

मानवी हृदय हा एक स्नायुमय अवयव आहे. हे रुधिराभिसरण संस्थेचे महत्त्वाचे इंद्रिय आहे. सबंध शरीरास आकुंचन-प्रसरणाद्वारे रक्तपुरवठा करण्याचे काम हृदय करते. मानवी हृदय हे दोन्ही फुफ्फुसामध्ये आणि छातीच्या मागे स्थित असते. काहीसे तिरकस आणि डावीकडे असते. याचा आकार साधारपणे त्रिकोणीकृती असून प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या मुठीइतका असतो. हृदयाचे वजन साधारणपणे ३६० ग्रॅ‘ असते.

ऑक्सिजन आणि कार्बनडाय ऑक्सईड या दोन्ही वायूंचे परिवहन करण्यासाठी हृदयाला वेगवेगळे कप्पे असतात- डावा कप्पा आणि उजवा कप्पा (Right and Left Compartments). यामुळे ऑक्सिजन आणि कार्बनडाय ऑकसाइडमुळे रक्त एकमेकात मिसळत नाहीत. डाव्या भागात ऑक्सिजन युक्त रक्त असते. या भागामुळे हृदयाकडून शरीराला ऑक्सिजनचा कार्यक्षमतेने पुरवठा करणे शक्य होते.

हृदयाच्या डाव्या आणि उजव्या भागांचे पुन्हा प्रत्येकी दोन भाग पडतात. अशा प्रकारे हृदयाचे चार कप्पे असतात. वरच्या कप्प्याना अलिंद (Atrium) असे म्हणतात तर खालच्या कप्प्याना जवनिका किंवा नीलय (Ventricle) असे म्हणतात.

धमनी (Artery)

धमन्या हृदयाकडून शरीराकडे रक्ताचे वहन करतात. यांना रोहिणी असेही म्हणतात. या धमन्यांवर हृदयाकडून जास्त दाब प्रयुक्त होतो. हा ताण सहन करण्यासाठी धमण्यांच्या भित्तिका जाड आणि लवचीक असतात. त्या कमी स्थितिस्थापक असून त्यांना झडपा (Valves) नसतात.

प्रमुख महाधमनी (Aorta) अनेक लहान स्नायुमय धमण्यांमध्यें (Arteries) विभागलेली असते. प्रत्येक स्नायुमय धमनीपासून अनेक पातळ भिंतीच्या नलिका निघतात. त्यांना धमनिका (Arterioles) असे म्हणतात.

या हृदयातील शुद्ध रक्त इतर अवयवांकडे वाहून नेतात. याला अपवाद फुफ्फूस धमनी असून त्यातून अशुद्ध रक्त फुफ्फुसाकडे वाहून नेले जाते.

शिरा (Veins)

धमनीकेशिका (Arterioles) एकत्र येऊन त्यांच्यापासून शिरा तयार होतात. शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडून रक्त गोळा करून हृदयाकडे आणण्याचे कार्य शिरा करतात. त्यांना नीला असेही म्हणतात. रक्तकेशिका (Venules) एकत्र येऊन शिरा तयार होतात. या इतर अवयवांकडून अशुद्ध रक्त हृदयाकडे आणतात. त्याला अपवाद फुफ्फूस शिरा असून त्या फुफ्फुसाकडून शुद्ध रक्त हृदयाकडे वाहून आणतात.

शिरांवर उच्च रक्तदाब नसल्यामुळे भित्तिका जाड असण्याची आवश्यकता नसते. त्यांच्यामध्ये झडपा असतात, ज्या रक्त उलट दिशेने जाण्यासाठी मज्जाव करतात.

केशिका (Capillaries)

धमन्या उतीपर्यंत पोेचल्यानंतर त्यांना शाखा, उपशाखा फुटतात. त्यांच्या अतिशय लहान नलिकांना रक्तकेशिका म्हणतात. या अत्यंत बारीक, एकस्तरीय आणि पातळ भिंती असलेल्या नलिका आहेत. यांचा शरीरपेशींशी प्रत्यक्ष संबंध असतो. रक्त आणि आसपासच्या पेशींमध्ये पदार्थांची देवाण-घेवाण या रक्तकेशीकांच्या पातळ भित्तिकांमार्फत होते. केशिकांमुळे संप्रेरके, उत्कृष्ट पदार्थ, अन्नघटक, ऑक्सिजन इत्यादी पदार्थांचे उतींबरोबर देवाण-घेवाण करण्याचे कार्य होते.

लसिका (Lymph)

ज्या वेळी रक्त रक्तकेशिकांमधून वाहते त्या वेळी रक्तद्रवातून पाण्याचा काही अंश, प्रथिने आणि काही विरघळलेली द्रव्ये गाळली जाऊन उतींमधील पोकळ्यांत जमा होतात. यापासून उतीद्रव तयार होतो. हा रक्तद्रवासारखाच असतो. फक्त यामध्ये कमी प्रमाणात प्रथिने असतात; कारण रक्तकेशिकांच्या भित्तिकेतून रक्तद्रवातील प्रथिने जाऊ शकत नाहीत. या द्रवातील काही भाग लहान मार्गामध्ये लसिका वाहिनीत शिरतो. या द्रवाला लसिका म्हणतात. हा फीकट पिवळ्या रंगाचा द्रव ङ्क्नत एकाच दिशेने म्हणजेच उतींकडून हृदयाकडे वाहतो.

रक्तदाब (Blood Pressure)

धमन्यांतून रक्त वाहत असताना त्यांच्या भित्तिकांवर पडणारा रक्ताचा दाब म्हणजे रक्तदाब होय. रक्तदाबाच्या उच्चतम व नीचतम अशा दोन पातळ्या असतात. नीलयाच्या आकुंचनाच्या वेळी धमण्यातील रक्तावर असणारा दाब म्हणजे वरचा रक्तदाब (Systolic Pressure) तर नीलयाच्या शिथिलीकरणाच्या वेळी धमण्यातील रक्तावर असणारा दाब म्हणजे खालचा रक्तदाब (Diastolic Pressure) होय. या रक्तदाबाची सामान्य पातळी १२०/८० मिमी पारदस्तंभ इतकी असते.

रक्तदाब स्फिग्मोमॅनोमीटर या यंत्राद्वारे मोजला जातो. यातील चेंबरमध्ये पारा असून त्यावरील दाब वाढवत नेल्यास पारदस्तंभाची पातळी वाढत जाते. उच्च रक्तदाबाला हायपरटेंशन (Hypertension) असे म्हणतात.

नाडीगती (Pulse Rate)

एका मिनिटातील हृदयाच्या ठोक्याची संख्या म्हणजे हृदयगती किंवा नाडीगती होय. सामान्यत: हृदय १ मिनिटात ७२ वेळा आकुंचन-प्रसरण पावते. म्हणजेच नाडी ७२ प्रतिमिनीट इतकी असते. ही नाडी मनगटाजवळ अंगठ्याच्या मुळाशी Radial Artery धमनीवर मोजली जाते.

Posted in IMPORTANT TOPICS.