आंतरराष्ट्रीय परिषदा आणि अहवाल

‘अजेंडा 2030 फॉर चिल्ड्रेन : एंड व्हायलन्स सोल्यूशन्स’ शिखर परिषद

 • स्वीडनच्या स्टॉकहोम शहरात 14 आणि 15 फेब्रुवारी या दोन दिवसात ‘अजेंडा 2030 फॉर चिल्ड्रेन : एंड व्हायलन्स सोल्यूशन्स’ शिखर परिषद पार पडली.
 • परिषदेत मांडण्यात आलेल्या मुद्द्यांमध्ये बालकांवर होणार्‍या हिंसाचाराला रोखण्यासाठी वापरात आणल्या जाणार्‍या उपाययोजना याबाबत चर्चा करण्यात आली.

स्पष्ट करण्यात आलेली माहिती :

 • जागतिक स्तरावर, 2-17 वर्षे वयोगटातील 1 अब्ज बालके म्हणजेच दर दोनमध्ये एक बालक या प्रमाणात गेल्या वर्षात शारीरिक, लैंगिक किंवा भावनिक हिंसाचार किंवा दुर्लक्ष अशा प्रकारांना बळी पडले.
 • 10 ते 19 वर्षे वयोगटातील बालकांमध्ये ‘हिंसाचार’ हे मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे, ज्यामध्ये दर 100000 बालकांपैकी 7 असा या वयोगटातील वैश्विक मृत्युदर आहे. त्यांच्या जीवनात, 5 पैकी 1 शारीरिक शोषणास, तर 3 पैकी 1 भावनात्मक शोषणास बळी पडतात. जवळपास 18% मुली आणि 8% मुले लैंगिक अत्याचाराला बळी पडतात.
 • लहानपणी हिंसाचार अनुभवत असल्यास मुलं, त्यांचे कुटुंबिय आणि समुदाय यांच्या आरोग्यवर आणि संपूर्ण जीवनात त्याचा परिणाम दिसून येतो.
 • पुरावे असे दर्शवतात की हिंसाचाराचा परिणाम हा मृत्यू आणि जखम याही पलीकडे दिसून येतात. कारण जी बालके हिंसेचे बळी पडले, त्यांच्यात धूम्रपान, मद्यपान आणि अमली पदार्थांचा गैरवापर होतो आणि उच्च-जोखीम असलेल्या लैंगिक वर्तनास बळी पडतात. याशिवाय ते आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात आणि आयुष्यात अनेक आजारांना बळी पडण्याची शक्यता असते. अशा आजारांमध्ये चिंता, नैराश्य, हृदयासंबंधित रोग, कर्करोग आणि एड्स यांचा समावेश होतो.

WHO चा पुढाकार :

 • जागतिक आरोग्य संघटना (WHO) अशा प्रकारांना रोखण्यासाठी जागतिक योजना तयार करीत आहे आणि त्याच्या 13 व्या ‘जनरल प्रोग्राम ऑफ वर्क 2019-2023’ मध्ये अंतर्भूत करणार.
 • पुराव्यावर आधारित उपाययोजनांमध्ये WHO च्या नेतृत्वात चालू असलेल्या ‘INSPIRE’ पुढाकाराच्या सात धोरणांचा समावेश असणार. ते म्हणजे –
 1. अंमलबजावणी आणि कायद्याची अंमलबजावणी
 2. नियम आणि नैतिक मूल्ये बदलने
 3. सुरक्षित वातावरण
 4. पालक आणि काळजी घेणार्‍यांची मदत
 5. उत्पन्न आणि आर्थिक सशक्तिकरण
 6. प्रतिसादात्मक सेवांची तरतुद
 7. शिक्षण आणि जीवन कौशल्य
 8. WHO याबाबत चाललेल्या जागतिक प्रयत्नांमध्ये सहभागी होणार असून बालकांवर होणार्‍या सर्व प्रकारच्या हिंसाचाराला दूर करण्यासाठी जागतिक प्रतिबद्धतांना प्रोत्साहन देईल.

‘शाश्वत जैव इंधन’ विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद

शाश्वत जैव इंधन विषयावर नवी दिल्लीत 26-27 फेब्रुवारी 2018 रोजी एक आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेचे आयोजन मिशन इनोव्हेशन आणि बायोफ्यूचर प्लॅटफॉर्म यांच्या वतीने भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाकडून केले गेले.

परिषदेचे स्वरूप :

 • परिषदेत जैवइंधन क्षेत्रातील संशोधकांना एकत्र आणले गेले. वर्तमान ज्ञान, माहितीचा आढावा घेणे, माहिती आणि सर्वोत्तम कार्यपद्धती याबाबत माहिती सामायिक करणे आणि पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या कृतीसाठी एकत्र येणे यासारखी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न केले गेले. या कार्यक्रमात उद्योग व गुंतवणूकदार, विविध देशांतील वरिष्ठ सरकारी अधिकारी, विशेषज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि इतर प्रतिनिधी यांचा सहभाग होता.
 • परिषदेत सहभागी देशांद्वारे बनवलेल्या जैव-अर्थव्यवस्थेच्या विकासाला स्पष्टपणे समजून घेतले गेले आणि या क्षेत्रात येणार्‍या आव्हानांबाबत जागरूकता निर्माण केली गेली.
 • परिषदेच्या शेवटी बायोफ्यूचर प्लॅटफॉर्म समूह आणि मिशन इनोव्हेशनमधील सदस्य देशांशी सल्लामसलत करून तयार करण्यात आलेले “शाश्वत जैव इंधन विषयक दिल्ली घोषणापत्र” स्वीकारण्यात आले.

काय आहे मिशन इनोव्हेशन (MI) ?

 • मिशन इनोव्हेशन (MI) हा 22 देश आणि युरोपीय संघाचा एक वैश्विक पुढाकार आहे, जो जागतिक पातळीवर स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात अभिनवतेला प्रोत्साहन देत आहे. पुढाकाराचा एक भाग म्हणून, भागीदार देशांनी पाच वर्षांमध्ये स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात संशोधन आणि विकास दुप्पट करण्याचे वचन दिलेले आहे.
 • शाश्वत जैवइंधन हा सात अग्रगण्य अभिनवतेसंबंधी आव्हानांपैकी एक आहे आणि त्यात ब्राझील, कॅनडा आणि चीन या देशांसोबत भारत सह-नेतृत्व करीत आहे. शाश्वत जैव इंधनाच्या विकासामध्ये येणार्‍या प्रमुख आव्हानांना हाताळण्यासाठी सहभागी देश एकत्र कार्य करीत आहेत.

‘एव्हरी चाइल्ड अलाइव्ह’ अहवाल

बाळाचा जन्म अजूनही दरिद्री देशांमध्ये धोकादायक परिस्थितीत होतो : UNICEF

 

 • UNICEF ने नवजाताचा मृत्युदर याविषयी प्रसिद्ध केलेल्या ‘एव्हरी चाइल्ड अलाइव्ह’ अहवालानुसार, जगातल्या सर्वाधिक दरिद्री देशांमध्ये जन्माला आलेले बाळ, त्यामध्ये सर्वाधिक आफ्रिकेत, आजही मृत्यूच्या “अत्याधिक चिंताजनक” धोक्यांचा सामना करत आहे. हे धोके सर्वात श्रीमंत देशाच्या तुलनेत 50 पटीने अधिक असू शकते.
 • जगभरात दरवर्षी 10 लाख नवजात बालक त्यांच्या जन्माच्या पाहिल्याच दिवशी मृत्युमुखी पडतात.

ठळक बाबी :

 • जपान, आइसलँड आणि सिंगापूर या देशांना जन्मासाठी सर्वात सुरक्षित देश ठरविण्यात आले आहे, जेथे जन्माला आलेल्या पहिल्या 28 दिवसांमध्ये प्रत्येक हजार बाळांमध्ये मृत्युचे केवळ एक प्रकरण समोर येते.
 • नवजात मृत्युदरात सर्वाधिक कमतरता जपानमध्ये आहे. त्यानंतर आइसलँड, सिंगापूर, फिनलँड, एस्टोनिया, स्लोवेनिया, सायप्रस, बेलारूस, दक्षिण कोरिया, नार्वे आणि लेक्समबर्ग या देशांचा क्रमांक लागतो. या देशांमध्ये प्रशिक्षित आरोग्य व्यावसायिकांची संख्या अपेक्षेत अधिक आहे.
 • उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये सरासरी नवजात मृत्युदर प्रत्येक हजार जन्मामध्ये 3 एवढा आहे, तर कमी उत्पन्न श्रेणीतील देशांमध्ये हे प्रमाण 27 एवढे आहे.
 • जपान, आइसलँड आणि सिंगापूर या देशांमध्ये जन्मलेल्या बाळांच्या वाचण्याच्या संधी अधिक असतात, जेव्हा की पाकिस्तान, मध्य आफ्रिका प्रजासत्ताक आणि अफगाणिस्तान या देशांमधली परिस्थिती अगदी उलट आहे.
 • सन 2016 मध्ये भारतात प्रत्येक 1,000 जिवंत जन्मांमध्ये नवजात मृत्युदर 25.4 होता. श्रीलंकेत हा दर 127, बांग्लादेशात 54, नेपाळमध्ये 50, भुटानमध्ये 60 आणि पाकिस्तानमध्ये 45.6 असा होता.
 • बांग्लादेश, इथियोपिया, गिनी-बिसाऊ, भारत, इंडोनेशिया, मालावी, माली, नायजेरिया, पाकिस्तान आणि टांजानिया या देशांना बाळाच्या जन्मावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करणार्‍या देशांमध्ये ठेवण्यात आले आहे. या दहा देशांमध्ये जगभरात नवजात बाळांच्या मृत्युची अर्ध्याहून अधिक प्रकरणे समोर येतात.
 • 184 देशांमध्ये झालेल्या अभ्यासानुसार, 80% बाळांच्या मृत्युचे कारण कोणतेही गंभीर बिमारी नसते. बहुतेक बाळांच्या मृत्युचे कारण म्हणजे वेळेआधी जन्म, प्रसव दरम्यान जटिलता, बिमारीला योग्यरित्या प्रतिबंध न झाल्यास आणि न्यूमोनिया होणे.
 • माता आणि बाळाला चांगल्या सुविधा देऊन मृत्युदर कमी करता येऊ शकतो. यामध्ये स्वच्छ पाणी, जन्माच्या पहिल्या तासात स्तनपान, माता-बाळ यांचा संपर्क अश्या बाबी आवश्यक ठरतात. जन्मानंतर 28 दिवस नवजाताच्या जिवंत राहण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका वठवतात.
 • सर्वाधिक मृत्युदर असणार्‍या 10 देशांमध्ये आफ्रिकेमधील आठ देश आणि दोन दक्षिण आशियामधील देशांचा समावेश आहे. या 10 देशांमध्ये दुसर्‍या क्रमांकावर मध्य आफ्रिका प्रजासत्ताक तर अफगाणिस्तान आणि सोमालिया अनुक्रमे तिसर्‍या व चौथ्या क्रमांकावर आहेत. या देशांमध्ये संघर्ष, नैसर्गिक आपत्ती, अस्थिरता आणि कुशासन या सारख्या समस्यांचा प्रभाव आरोग्यप्रणालीवर नेहमीच पडतो आणि धोरण निर्माता प्रभावी धोरण तयार करण्यास अपयशी ठरलेत.
 • जगभरात जवळजवळ 26 लक्ष बाळांचा जन्म एका महीन्याच्या आत होतो. तर जवळजवळ 26 लक्ष बाळांचा जन्मच मृत होतो. जगभरात दररोज जवळजवळ 7000 नवजातांचा मृत्यू होतो. त्यामध्ये 80% प्रकरणे प्रशिक्षित डॉक्टर, परिचारक यांच्यामार्फत स्वस्त, गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा प्रदान करून, प्रसवाआधी माता आणि प्रसवानंतर बाळाचे पोषण, स्वच्छ पाणी यासारख्या मूलभूत उपाययोजनांनी बाळाचे जीवन वाचवले जाऊ शकते.

अहवालात भारत :

 • सन 2016 मधील आकड्यांचा तुलनेत पाहता नवजात मृत्युदरात भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
 • भारतात मागील वर्षात 6,40,000 नवजातांचा मृत्यू झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. हा नवजात मृत्युदर प्रत्येक हजारामध्ये 25.4 एवढा होता. याप्रमाणे जगभरात जन्म झाल्यानंतरचा काही काळ किंवा दिवसांमध्ये मृत्युचे प्रमाण 24% एवढे होते. आकड्यांनुसार याबाबतीत पाकिस्तान दुसर्‍या क्रमांकावर आहे.
 • कमी मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये नवजात मृत्युदरात पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे. भारत यामध्ये 12 वा आहे. मात्र केनिया, बांग्लादेश, भुटान, मोरक्को आणि कांगो हे देश या बाबतीत भारत आणि पाकिस्तानहून अधिक चांगल्या स्थितीत आहेत.
Posted in IMPORTANT TOPICS.