Science – Career Opportunities

Chemistry

अ‍ॅनॅलिटिकल सायन्सचा अभ्यास पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना औषध कंपन्यांमध्ये खूप मागणी आहे. तर ऑर्गनिक केमिस्ट्री केलेल्या  विद्यार्थ्यांना केमिकल कंपन्यांमध्ये नोकरीच्या उत्तम संधी आहेत. इनोव्हेटिव्ह अभ्यासक्रम करीत असलेल्या  विद्यार्थ्यांना तीन महिने उद्योग क्षेत्रात अनुभव घेणे बंधनकारक असते. अशा वेळी त्याची उद्योगजगाशी थेट ओळख होते. तसेच कामाचा अनुभव येतो. त्यामुळे  विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण होताच पुढे नोकरी मिळते.

Botany

हा विषय घेतलेल्या  विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक कंपन्यांमध्ये चांगली मागणी आहे. कार्बन क्रेडिट्ससाठी या विद्यार्थ्यांना बोलावून घेतले जाते. ट्री अ‍ॅथॉरिटी म्हणून सरकारी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तर, विविध कामांसाठी आयटी कंपन्यांमध्येही या  विद्यार्थ्यांना मागणी आहे. इको टूरिझम क्षेत्रात नोकरी सहज उपलब्ध आहेत. तर डायटीशियन आणि न्युट्रीशन म्हणूनही तुम्ही करिअर करू  शकता.

Zoology

झुओलॉजीचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये चांगली मागणी आहे. अनेक विद्यार्थी पुढे संशोधन क्षेत्रातही जात आहेत. अ‍ॅग्रीकल्चरल, टेक्नॉलॉजी क्षेत्रातही या विद्यार्थ्यांना घेतले जात आहे. तसेच, डेअरी उत्पादन कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांना उत्तम पगाराच्या संधी आहेत.

Biotechnology

भारतात या क्षेत्रात पुढे अमर्याद करिअर संधी उपलब्ध आहेत. भारताची जैवविविधता आणि भौगोलिक वैविध्य पाहता या विषयातील संशोधनासाठी चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. विविध संशोधन संस्थांमध्ये विद्यार्थी संशोधन करीत आहेत, तर अनेकांनी स्वतःचे उद्योगही सुरू  केले आहेत. तसेच या क्षेत्रात उघडणाऱ्या नव्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी या विद्यार्थ्यांना मोठी मागणी आहे.
Posted in Career Opportunity s, SCIENCE.