SPECIAL COURSES IN COMMERCE

वाणिज्य शाखेशी संबंधित विशेष अभ्यासक्रम :
………………………………………………………..

चार्टर्ड अकाउंटंट (Chartered accountant) :

द इन्स्टिट्यूूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ही संस्था या विषयाशी निगडित अभ्यासक्रम चालवते. बारावी उत्तीर्ण कोणत्याही ज्ञानशाखेतील उमेदवार या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.
सविस्तर माहिती : www.icai.org

कंपनी सेक्रेटरी (Company Secretary):

द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया या संस्थेने कंपनी सेक्रेटरीशिपचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम त्रिस्तरीय आहे.
फाउंडेशन कोर्स कोणत्याही शाखेच्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला करता येतो. आता या संस्थेने पदवीनंतरचा तीन वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू केला आहे.
सविस्तर माहिती : www.icsi.org

कॉस्ट अ‍ॅण्ड वर्क अकाउंटंट – (CWA) :

इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अ‍ॅण्ड वर्क अकाउंटंट ऑफ इंडिया या क्षेत्रातील अभ्यासक्रम चालवते.
तो फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल असा त्रिस्तरीय आहे. फाउंडेशन अभ्यासक्रम बारावी उत्तीर्ण विद्यार्थी करू शकतात. इंटरमिजिएट अभ्यासक्रमास कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधर थेट अर्ज करू  शकतात.
सविस्तर माहिती : www.icwai.org

चार्टर्ड फायनान्शिअल अ‍ॅनॅलिस्ट (Chartered Financial Analyst):

पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, इंटरनॅशनल फायनान्स अ‍ॅण्ड रिसर्च या क्षेत्रांत करिअर घडवण्यासाठी संबंधित उमेदवार आपले कौशल्य वापरू शकतात. माहिती तंत्रज्ञानाचे कौशल्य अवगत केल्यास संधी आणखी वाढू शकते.
चार्टर्ड फायनान्शिअल अ‍ॅनॅलिस्ट होण्यासाठी आयसीएफएआय (इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड फायनान्शिअल अ‍ॅनॅलिसिस ऑफ इंडिया) या संस्थेचा त्रिस्तरीय अभ्यासक्रम करावा लागतो.
हा अभ्यासक्रम प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन पद्धतीनेही करता येतो.
सविस्तर माहिती : www.icfai.org

बँकिंग (Banking):

वाणिज्य शाखेच्या पार्श्वभूमीसोबत एमबीए, सीए, सीएफए (चार्टर्ड फायनान्शिअल अकाउंटंट) अशा पदव्या असल्यास या क्षेत्रात उच्च श्रेणीच्या संधी मिळू शकतात. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी आता गृह, शैक्षणिक, घरगुती वस्तू कर्ज, म्युच्युअल फंड, कॅपिटल मार्केट, विमा अशा क्षेत्रांत भूमिका विस्तारल्याने त्यांना तज्ज्ञ उमेदवारांची गरज मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे.
गुंतवणूक :
या क्षेत्रात रिसर्च अ‍ॅनॅलिस्ट, इन्व्हेस्टमेंट बँकर, म्युच्युअल फंड एक्झिक्युटिव्ह, कॅपिटल मार्केट मॅनेजर, फायनान्शिअल प्लॅनर, अ‍ॅसेट मॅनेजर, व्हेंचर कॅपिटॅलिस्ट आदी करिअर संधी मिळू शकतात.
विमा क्षेत्र : भारतात हे क्षेत्र गतीने वाढत आहे. या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर विशिष्ट कालावधीच्या अनुभवानंतर उमेदवारांना उत्तमोत्तम करिअर संधी उपलब्ध होऊ शकतात. अ‍ॅक्चुरिअल सोसायटी ऑफ इंडियामार्फत घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. विमा क्षेत्रात काम करण्यासाठी परवान्याची गरज भासते.
Posted in Courses c.