Subjects In Arts. (कला शाखेतील विषय)

दिवसेंदिवस कला शाखेतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. कला शाखेतून चांगल्या विषयांतून बी.ए.ची पदवी संपादन करता येते. मात्र, पदवी शिक्षणासाठी कनिष्ठ महाविद्यालयाची परीक्षा उत्तीर्ण असावी लागते.

पुरातत्त्वशास्त्र (Archaeology)

या विषयाची पदवी संपादन करायची असेल तर बारावीनंतर इतिहास विषय घेणे अत्यावश्यक आहे. इतिहास हा विषय पुरातत्त्वशास्त्राचा पाया आहे.

अर्थशास्त्र (Economics)

यात वस्तूंची उत्पादन, त्यांचा पुरवठा, आर्थिक धोरणे, आर्थिक नियोजन, राज्याचे अर्थकारण यांचा अभ्यास केला जातो. कला शाखेप्रमाणे वाणिज्य आणि विज्ञान शाखेतूनही अर्थशास्त्राची पदवी संपादन करता येते. पदवी संपादन केल्यावर पुढे पदविका संपादन करता येते.

भूगोल (Geography)

या शाखेत पृथ्वीचा अभ्यास केला जातो. कला शाखेप्रमाणे विज्ञान शाखेतून भूगोलाचा अभ्यास करता येतो. फक्त बी.ए. इन जिऑग्राफीऐवजी बी.एस्सी. इन जिऑग्राफीची पदवी मिळते. त्यानंतर पुढे एम.ए. वा एम.एस्सी.ही करता येते.

इतिहास  (History)

इतिहास या विषयातून पदवी संपादन केल्यावर बी.ए. इन हिस्ट्रीची पदवी मिळते. त्यानंतर याच विषयातून एम.ए. करता येते.

भाषा (Language)

बऱ्याचशा महाविद्यालयांतून इंग्रजी, हिंदी, मराठी, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, रशियन यासारख्या अनेक भाषा शिकविल्या जातात. या विषयातून स्पेशलायझेशनही करता येते.

 तत्त्वज्ञान (Philosophy)

वेगवेगळ्या तत्त्ववेत्त्यांचा, विचारवंतांच्या विचारांचा अभ्यास यात केला जातो. यातून बी.ए. करता येते. बी.ए. झाल्यावर मग अगदी सहजच एम.ए. करता येते.

राज्यशास्त्र (Political science)

राज्यशास्त्रात राजकारण, विविध राज्यांची धोरणे, राजकारणाची सुरुवात, लोकशाहीतून राजकारण, विविध पक्ष यांचा अभ्यास यात करता येतो. या विषयातून बी.ए.ची पदवी संपादन केल्यावर याच विषयातून एम.ए. करता येते.

मानसशास्त्र (Psychology)

मानसशास्त्राची बी.ए.ची पदवी अथवा ऑनर्स कोर्सनंतर मास्टर्स डिग्री पूर्ण करता येते.

लोक प्रशासन (Public Administration)

प्रत्येक राज्याच्या राजकीय धोरणांचा अभ्यास पब्लिक अ‍ॅडमिनिस्टे्रशनमधून करता येतो. या विषयासह एम.ए. झाल्यावर याच विषयातून एम.बी.ए.चा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो.

समाजशास्त्र (Sociology)

मानवी जीवनाचा, समाजाचा अभ्यास, समाजाची नीतिमूल्ये ही समाजशास्त्रात प्रामुख्याने शिकवली जातात. या विषयातून बी.ए. करता येते.

Posted in ARTS, Courses a.