स्पर्धा परीक्षेद्वारे होणार उच्च प्राथमिक शिक्षणातील केंद्र प्रमुखाची निवड

नागपूर : उच्च प्राथमिक शिक्षणातील केंद्रप्रमुख हे पद आतापर्यंत पदोन्नतीद्वारे भरले जात होते. मात्र, यापुढे या पदाची निवड स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला. त्यामुळे ज्येष्ठ शिक्षकांना आता विभागीय पात्रता परीक्षा व बुद्धिमत्ता चाचणी द्यावी लागणार आहे. दरम्यान, या निर्णयामुळे पदोन्नती मिळालेल्या राज्यातील एक हजारावर केंद्रप्रमुखांवर पदावनत होण्याची वेळ आली आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक ते उच्च प्राथमिक पातळीवर दहा शाळांमागे एका केंद्रप्रमुखाची नियुक्ती होते. या शाळांची जबाबदारी ज्येष्ठ शिक्षक असणाऱ्यास पदोन्नतीने मिळत होती. आता ही पदे शंभर टक्के पदोन्नतीने भरण्याऐवजी चाचणी घेऊन भरली जातील. पण या निर्णयानुसार १० जून २०१४ नंतर नियुक्त झालेल्या केंद्रप्रमुखांना पदावनत करण्याचेही ठरले आहे.

विभागीय स्पर्धा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन होणार आहे. ही चाचणी विषयनिहाय राहणार नसून वस्तुनिष्ठ स्वरूपाची राहणार आहे. ऑनलाइन होणाऱ्या या परीक्षेचा निकाल त्वरित मिळेल. २०० गुणांची ही चाचणी असून विशिष्ट स्तराची मर्यादा राहणार आहे.

शासननिर्णयाबाबत अधिक माहितीसाठी : Click Here

 

Posted in Career News.