Zoology

बारावीमध्ये बायोलॉजी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना बी.एससी.ला झुओलॉजी म्हणजेच प्राणिशास्त्र हा विषय घेता येतो. पुढे एमएससीसाठी एन्व्हार्यमेंटल सायन्स, कॉस्मटोलॉजी, बायो स्टॅटस्टिक्स, बायो इन्फर्मेटिक्स, ओशनोग्राफी, फिजिओलॉजी, एन्डो क्रायनोलॉजी, डेअरी सायन्सेस, सायटो जेनेटिक्स आदी विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. यानंतर पुढे पीएच.डी.ची सोयही उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी कोणती तयारी करावी?

हा विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान असणे आवश्यक असते. शिवाय आपल्या अभ्यासक्रमासह ते बायो टेक्नॉलॉजी, अ‍ॅनिमल सेलकल्चर, डीएमएलटी हे अ‍ॅड ऑन अभ्यासक्रम करू शकतात. अतिरिक्त ज्ञान मिळविण्यासाठी त्याचा फायदा होऊन पुढे नोकरीच्या ठिकाणी उपयोगी पडेल.

Posted in Courses s, SCIENCE.